Pune Loksabha : मुरलीधर मोहोळ यांना पुणे लोकसभेचं तिकीट, जगदीश मुळीक काय निर्णय घेणार?
Lok Sabha Election 2024 : मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांना भाजपने लोकसभेची उमेदवारी दिल्यानंतर आता जगदीश मुळीक (Jagdish Mulik) काय करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Pune Lok Sabha 2024 : भाजपने (BJP) लोकसभेसाठीच्या (Lok Sabha Election 2024) उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये महाराष्ट्रातील (Maharashtra) 20 नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. या यादीत भाजपने मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांना खासदारकीसाठी तिकीट दिलं आहे. पुण्याचे माजी महापौर, भाजपचे सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांच्यावर भाजपने मोठी जबाबदारी दिली आहे. मला खात्री आहे पुणे लोकसभामधून मोठ्या मताधिक्याने निवडून येईन, मी भाजपचा कार्यकर्ता म्हणून पक्ष नेतृत्वाला धन्यवाद, असं म्हणत मोहोळ यांनी पक्षश्रेष्ठींचे आभार मानले आहेत. दरम्यान, पुण्यातून लोकसभेसाठी जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांचंही नाव चर्चेत होतं
मुरलीधर मोहोळ यांना पुणे लोकसभेची उमेदवारी
लोकसभेचं तिकीट मिळाल्यानंतर मुरलीधर मोहोळ यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, पुणे लोकसभेसाठी महायुतीचा उमेदवार कोण असणार अशी चर्चा सुरू होती. मला खात्री आहे मी पुणे लोकसभामधून मोठ्या मताधिक्याने निवडून येईल. मी भाजपचा कार्यकर्ता म्हणून पक्ष नेतृत्वाला धन्यवाद देईन की लोकसभा उमेदवार म्हणून मला संधी दिली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, जे पी नड्डा, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मी आभारी आहे, असं म्हणत त्यांनी महायुतीतील सर्व नेत्यांचे आभार मानले आहेत.
मोहोळ यांनी पक्षाचे आभार मानले
व्यक्ती म्हणून माझं नाव आलं असलं तरी पक्ष सर्व सामान्य कार्यकर्त्याला नेता करतो. 1992-93 साली अध्यक्ष होतो. लोक प्रतिनिधी म्हणून काम केलं. महापौर म्हणून काम केलं, राजकीय पार्श्वभूमी नसलेला कार्यकर्ता लोकसभा उमेदवार होतो, हे फक्त भाजपमध्येच होऊ शकते, असंही मुरलीधर मोहोळ म्हणाले.
मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवण्याचा निर्धार
मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर होताच त्यांनी विजयाचा आणि मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवण्याचा निर्धार केला आहे. यावेळी ते म्हणाले की, सांस्कृतिक जडणघडण, शहराचे भविष्य डोळ्यासमोर ठेवून काम करणार. मोदींनी काम केलं, पुणेकरांच्या स्वप्नात असलेली मेट्रो सुरू झाली, चांदणी चौक प्रकल्प अनेक गोष्टी भाजपकडून मिळाल्या. पुन्हा एकदा खासदार हा पुण्याचा महायुतीचा होईल आणि मोदीजी यांना पुन्हा प्रधानमंत्री करणार, अशी इच्छा मोहोळ यांनी बोलून दाखवली आहे.
जगदीश मुळीकांनी घेतली फडणवीसांची भेट
पुणे लोकसभा मतदारसंघात मुरलीधर मोहोळ आणि जगदीश मुळीक (Jagdish Mulik) हे प्रबळ दावेदार मानले जात होते. पण, भाजपने अखेर जगदीश मुळीक यांचं तिकीट कापत मुरलीधर मोहोळ यांनी लोकसभेची उमेदवारी दिली आहे. महत्त्वाचं म्हणजे अगदी काही दिवसांपूर्वीच लोकसभेच्या तिकीटासाठी जगदीश मुळीक यांनी उपमु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती.दररम्यान, मुळीक यांनी मोहोळ यांचं तिकीट कर्न्फम झाल्याची कुणकुण लागल्याने त्यांनी फडणवीसांची भेट घेतल्याचं सांगितलं जात होतं.
पुणे भाजपमध्ये वाद?
पुणे लोकसभेवरून (Pune Loksabha) भाजपमध्ये अंतर्गत वाद रंगल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होती. मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) आणि जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांच्या लोकसभेच्या उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरु असल्याचं बोललं जात होत. या प्रकरणी आणि लोकसभा उमेदवारी या विषयांवरून जगदीश मुळीक यांनी काही दिवसांपूर्वी फडणवींसांची भेट घेतली होती. सह्याद्री अतिथीगृहावर देवेंद्र फडणवीस आणि जगदीश मुळीक यांच्यामध्ये चर्चा झाली. पुणे लोकसभेला पुण्याची माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्या नावाची चर्चा सुरू झाल्यानंतर पुणे भाजपमधील वाद उफाळून आल्याचं बोललं जात होतं.
मुरलीधर मोहोळ विरुद्ध जगदीश मुळीक वाद
मुरलीधर मोहोळ यांच्यामध्ये लोकसभेच्या तिकीटावरून चढाओढ सुरु असल्याचं सांगण्यात येत होते. इतकंच काय तर मोहोळ आणि मुळीक दोन्ही समर्थकांकडून अनेक वेळा भावी खासदारांचे बॅनरदेखील झळकवण्यात आले होते. यावरून वाद सुरु असल्याचं बोललं जात होतं. पण, आता मुरलीधर मोहोळ यांना भाजपने लोकसभेची उमेदवारी दिल्यानंतर आता जगदीश मुळीक काय करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :