एक्स्प्लोर

Pune Car Accident: मोठी बातमी : सुषमा अंधारेंनी अखेर सुनील टिंगरेंचं नाव घेतलं, पोर्शे अपघातप्रकरणात आरोपांची वात पेटवली!

Pune Accident Case, Ajay Taware and Sunil Tingare: ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेत अनेक सवाल उपस्थित केले आहेत.

Pune Car Accident Case, Ajay Taware and Sunil Tingare: डॉक्टर अजय तावरे (Ajay Taware) हा रक्ताचे नमुने बदलणे, यापुरते मर्यादित नाहीत. गेल्या दहा वर्षात तावरेंनी काय-काय पाहिलं, मंत्रालयाचा सहाव्या मजल्यावर सत्ता बदलावेळी काय घडलं?, हे सगळं तावरेंकडून समोर येऊ शकतं, असा दावा ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. आज पत्रकार परिषद घेत सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी   पुण्याच्या कल्याणीनगरमधील पोर्शे कार अपघातावरुन (Pune Car Accident) सरकारवर टीकास्त्र साधलं.

सुषमा अंधारे यांनी आज आमदार सुनील टिंगरे यांचंही नाव घेतलं. ज्या पद्धतीने या प्रकरणामध्ये अनेक ग्लॅमरस नेम-फेम असणारे आणि बडे प्रस्थ दाखल झाले. हे बडे प्रस्थ मध्यरात्री पोलीस स्थानकात का दाखल झाले होते?, जर खरंच सुनील टिंगरेंनी अजय तावरेंची शिफारस केली होती. मग टिंगरेंनी त्यातून वॉकआऊट करण्याचा प्रयत्न का केला? होय, मी शिफारस केली होती, असं टिंगरे ठामपणे का सांगितले नाही?, शिफारस पत्र व्हायरल झाल्यानंतर त्यावर खुलासा करण्याची गरज आणि वेळ टिंगरेंवर का आली?, असे अनेक सवाल सुषमा अंधारे यांनी यावेळी उपस्थित केले. 

निकालानंतर धक्कादायक खुलासे करणार-

4 जूनला निकाल आहे. कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी आणि पोलिसांवरचा ताण कमी व्हावा म्हणून पोर्शे कार प्रकरण आणि आरोग्य खात्यातला सावळा गोंधळ या संबंधीचे काही धक्कादायक खुलासे निकालानंतर करेन. पण तोवर डॉ अजय तावरेच्या जीविताच्या सुरक्षिततेची काळजी वाटते, असं सुषामा अंधारे म्हणाल्या.

अजय तावरेंसाठी सुनील टिंगरेची शिफारस-

अजय तावरेंसाठी आमदार सुनील टिंगरे यांच्याकडून 2023 मध्ये शिफारस करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तावरे यांची ससूनच्या अधीक्षकपदी नियुक्ती करावी, अशा आशयाचे पत्र सुनील टिंगरे यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना लिहिले होते. 

अग्रवाल पिता-पुत्रांकडून कायद्याची ऐशीतैशी-

बड्या बापाच्या लेकाला वाचवण्यासाठी पोलिसांपासून ते शासकीय रुग्णालयातील प्रशासकीय यंत्रणाही कामाला लागल्याचं आता पोलिस (Police) तपासातून समोर आलंय. मात्र, पोलिसांवर दबाव टाकून राजकीय नेतेमंडळीही याप्रकरणात हस्तक्षेप करत होते. त्यातच, अपघाताच्या दिवशी वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे (Sunil Tingare) यांनी मध्यरात्री पोलीस ठाण्यात पोहोचले होते. त्यामुळे, राजकीय दबाव आणि पैशांच्या जोरावर अग्रवाल पिता-पुत्रांकडून कायद्याची ऐशीतैशी करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, माध्यमव समाज माध्यमांच्या दबावानंतर आता पोलीस तपास वेगाने सुरू आहे. 

संबंधित बातमी:

मोठी बातमी : अजय तावरेला थेट मंत्रालयाच्या सहाव्या मजल्याचं संरक्षण, त्यांच्या जीवाला धोका, सुषमा अंधारेंचा खळबळजनक आरोप

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुणे हादरले! बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून भावाने मुलाच्या वडिलांना संपवले, येरवड्यातील भयंकर घटना
पुणे हादरले! बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून भावाने मुलाच्या वडिलांना संपवले, येरवड्यातील भयंकर घटना
Varun Dhawan on Rohit Sharma : हिटमॅनने धुतले, टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा काटा काढला; वरुण धवनने फक्त दोन शब्दात मीठ चोळले!
हिटमॅनने धुतले, टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा काटा काढला; वरुण धवनने फक्त दोन शब्दात मीठ चोळले!
AFG vs BAN :  लढले, रडले अन् भिडले, अफगाणिस्तानकडून बांगलादेशी वाघांची शिकार, टेचात सेमीफायनलमध्ये धडक
राशिद खान अन् नवीन-उल-हकचा धडाका, अफगाणिस्ताननं बांगलादेशला पराभूत करत इतिहास रचला
Rashid Khan : 'तुमची मान अजिबात खाली जाऊ देणार नाही'; राशिद खानने विश्वविक्रमवीरला दिलेला शब्द खरा करून दाखवला
'तुमची मान अजिबात खाली जाऊ देणार नाही'; राशिद खानने विश्वविक्रमवीरला दिलेला शब्द खरा करून दाखवला
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Om Birla vs K Suresh :लोकसभा अध्यक्षपद निवडणुकीसाठी के सुरेश,ओम बिर्लांनी भरला अर्जNilesh Lanke Family : लेकामुळे आज दिल्लीत आलो! निलेश लंके यांच्या आई-वडिलांची भावुक प्रतिक्रियाRahul Gandhi: विरोधक एनडीएच्या अध्यक्षपदाच्या उमेदवाराला पाठिंबा देतीलABP Majha Headlines : 12 PM : 25 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुणे हादरले! बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून भावाने मुलाच्या वडिलांना संपवले, येरवड्यातील भयंकर घटना
पुणे हादरले! बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून भावाने मुलाच्या वडिलांना संपवले, येरवड्यातील भयंकर घटना
Varun Dhawan on Rohit Sharma : हिटमॅनने धुतले, टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा काटा काढला; वरुण धवनने फक्त दोन शब्दात मीठ चोळले!
हिटमॅनने धुतले, टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा काटा काढला; वरुण धवनने फक्त दोन शब्दात मीठ चोळले!
AFG vs BAN :  लढले, रडले अन् भिडले, अफगाणिस्तानकडून बांगलादेशी वाघांची शिकार, टेचात सेमीफायनलमध्ये धडक
राशिद खान अन् नवीन-उल-हकचा धडाका, अफगाणिस्ताननं बांगलादेशला पराभूत करत इतिहास रचला
Rashid Khan : 'तुमची मान अजिबात खाली जाऊ देणार नाही'; राशिद खानने विश्वविक्रमवीरला दिलेला शब्द खरा करून दाखवला
'तुमची मान अजिबात खाली जाऊ देणार नाही'; राशिद खानने विश्वविक्रमवीरला दिलेला शब्द खरा करून दाखवला
Nilesh Lanke: आय निलेश ज्ञानदेव लंके.... निलेश लंकेंनी फाडफाड इंग्रजीत घेतली खासदारकीची शपथ
I Nilesh Dnyandev Lanke.... निलेश लंकेंनी फाडफाड इंग्रजीत घेतली खासदारकीचा शपथ
Premachi Goshta Serial Update : मुक्तासाठी सागर घेणार महागडा ड्रेस, सावनीचा होणार जळफळाट; 'प्रेमाची गोष्ट' मध्ये आज काय पाहाल?
मुक्तासाठी सागर घेणार महागडा ड्रेस, सावनीचा होणार जळफळाट; 'प्रेमाची गोष्ट' मध्ये आज काय पाहाल?
Rohit Sharma, Rarshid Khan : सेनापती लढले अन् सोनेरी इतिहास रचला! रोहित शर्मा अन् राशिद खानचा एकाच दिवसात ऑस्ट्रेलियावर वर्मी घाव
सेनापती लढले अन् सोनेरी इतिहास रचला! रोहित शर्मा अन् राशिद खानचा एकाच दिवसात ऑस्ट्रेलियावर वर्मी घाव
मोठी बातमी : शपथेवेळी बाळासाहेब ठाकरेंचं स्मरण, नागेश पाटील आष्टीकरांची शपथ संसदेत थांबवली!
मोठी बातमी : शपथेवेळी बाळासाहेब ठाकरेंचं स्मरण, नागेश पाटील आष्टीकरांची शपथ संसदेत थांबवली!
Embed widget