Prophet Remarks Row Protest: 'लोकशाहीत हिंसेला स्थान नाही', देशभरात सुरू असलेल्या गदारोळावर केंद्रीय मंत्र्यांची प्रतिक्रिया
Prophet Remarks Row Protest: "लोकशाहीत हिंसेला स्थान नाही. संवादातून समस्या सोडवता येतात, तेव्हा दगडफेक आणि जाळपोळ यांना जागा नसते.'', असं केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले आहेत.
Prophet Remarks Row Protest: "लोकशाहीत हिंसेला स्थान नाही. लोकशाहीत प्रत्येकाला आपले म्हणणे मांडण्याची संधी मिळाली पाहिजे आणि जेव्हा संवादातून समस्या सोडवता येतात, तेव्हा दगडफेक आणि जाळपोळ यांना जागा नसते.'', असं केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) म्हणाले आहेत. भाजपच्या दोन निलंबित प्रवक्ते-नेत्यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ देशभरात मुल्सिम समाज आणि विवध पक्षाच्यावतीने आंदोलन करण्यात आले. यामध्ये देशातील अनेक राज्यात या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. यावरच उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) लखनौ येथे एका कार्यक्रमात बोलताना अनुराग ठाकूर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
अनुराग ठाकूर म्हणाले की, नेता असो वा संघटना, आगीत तूप टाकण्याचं काम करू नये. याने जनतेचे तसेच राज्याचेही नुकसान होते. कायदा व सुव्यवस्था हा राज्याचा विषय असून तो राखण्यासाठी कठोर पावले उचलावीत, असे केंद्रीय मंत्री म्हणाले. ते म्हणाले की, जगात सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असलेल्या भारताची प्रगती वेगाने होत आहे.
तत्पूर्वी, ठाकूर यांनी लखनौ येथील केडी सिंग बाबू स्टेडियममध्ये स्वच्छता कार्यक्रमात सहभाग घेऊन परिसर स्वच्छतेसाठी हातभार लावला. त्यांनी हजरतगंज ते केडी सिंग बाबू स्टेडियमपर्यंतच्या 'फिट इंडिया रन'ला हिरवा झेंडा दाखवला आणि तरुणांमध्ये आरोग्य जागरूकता वाढवण्यासाठी त्यात सहभागी झाले. लखनौ हजरतगंज भागात असलेल्या बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांच्या पुतळ्याला केंद्रीय मंत्र्यांनी पुष्पहार अर्पण केला. नंतर त्यांनी केडी सिंग बाबू स्टेडियम लखनऊ येथे नेहरू युवा केंद्र आणि क्रीडा प्राधिकरणाच्या कार्यक्रमात हजेरी लावली.
इतर महत्वाच्या बातम्या:
Prayagraj Violence : प्रयागराज हिंसाचारप्रकरणी मोठी कारवाई, मुख्य आरोपी जावेद पंपच्या घरावर चालवला बुलडोझर
Varun Gandhi: 'देशसेवा करू इच्छिणाऱ्या तरुणांना आत्महत्या करावी, असं का वाटतेय? वरुण गांधींचं भाजप टीकास्त्र
Prophet Controversy: 'इस्लामिक कट्टरपंथीयांकडून माझ्या कुटुंबाच्या जीवाला धोका', कुटुंबियांसह दिल्ली सोडल्यानंतर नवीन जिंदाल यांची प्रतिक्रिया