एक्स्प्लोर

Prayagraj Violence : प्रयागराज हिंसाचारप्रकरणी मोठी कारवाई, मुख्य आरोपी जावेद पंपच्या घरावर चालवला बुलडोझर 

Prayagraj Violence : 10 जून रोजी शुक्रवारच्या नमाजानंतर झालेल्या हिंसाचारात जावेद अहमदचे नाव समोर आले आहे.  प्रयागराज हिंसाचार प्रकरणात जावेद पंपसोबत त्याची पत्नी आणि मुलगी यांचाही सहभाग असल्याचे सांगण्यात येत आहे.

Prayagraj Violence : उत्तर प्रदेशमधी प्रयागराज येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणी योगी सरकारने कठोर पावले उचलली आहेत. हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी जावेद पंप याच्या घरावर बुलडोझरची कारवाई सुरू झाली आहे. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जावेद पंप याचा आलिशान बंगला बुलडोझरने जमीनदोस्त केला जाणार आहे. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे. तत्पूर्वी जावेदच्या घरावर नोटीस चिकटवून आज सकाळी 11 वाजता बुलडोझर कारवाईची माहिती देण्यात आली.  

10 जून रोजी शुक्रवारच्या नमाजानंतर झालेल्या हिंसाचारात जावेद अहमदचे नाव समोर आले आहे.  प्रयागराज हिंसाचार प्रकरणात जावेद पंपसोबत त्याची पत्नी आणि मुलगी यांचाही सहभाग असल्याचे सांगण्यात येत आहे. रविवारी जावेद पंपवर करण्यात आलेली कारवाई ही यापूर्वी दिलेल्या नोटीसच्या आधारे करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. सकाळी 11 वाजेपर्यंत घर रिकामे करण्याचे आदेश पीडीए अधिकाऱ्यांकडून देण्यात आले. मात्र, दुपारी 12.45 वाजता पोलीस आणि प्रशासनाच्या कडेकोट बंदोबस्तात बुलडोझरची कारवाई सुरू झाली.

पोलिसांनी जावेद पंप याचे घर रिकामे केले  असून यावेळी सुरक्षा उपकरणांसह पोलीस तैनात करण्यात आले आहेत. प्रयागराज येथील जेके आशियाना कॉलनीत जावेद पंप याचा बंगला आहे. पोलीस आशियाना कॉलनीतील रस्त्यावरून फ्लॅग मार्च काढत आहेत. यासोबतच सुरक्षा कर्मचारी आणि अधिकारी घराच्या आवारातील परिस्थितीचा आढावा घेत आहेत.  

प्रयागराज हिंसाचार प्रकरणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी  अधिकाऱ्यांना कडक सूचना दिल्या आहेत. "दंगलखोरांवर कडक कारवाई करावी. हिंसाचारात झालेल्या नुकसानीची भरपाई दंगलखोरांकडून वसूल करण्यात यावी. योगी आदित्यनाथ यांच्या सूचनेनंतर आज जावेद पंप याच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आले आहेत.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात

बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार

मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी

कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारणZero Hour : निवडणुकीचा प्रचार शिगेला, प्रचाराचा सखोल आढावा झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?

Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट

Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय

Embed widget