एक्स्प्लोर

Lok Sabha Election: प्रियंका गांधी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार? तेलंगणातून निवडणूक लढवण्याची शक्यता

Lok Sabha Election: प्रियांका गांधी या इंदिरा गांधी यांच्या पावलावर पाऊल ठेवत राजकारणात एंट्री करु शकतात. त्याच्या उमेदवारीवरुन आता राजकिय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगत आहे.

Lok Sabha Election: लोकसभेच्या 2024 निवडणूकांसाठी (Loksabha Election) काँग्रेस चांगलीच तयारी करत असल्याचं पहायला मिळत आहे. असं म्हटलं जात आहे की आता येणाऱ्या लोकसभा निवडणूकांसाठी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासाठी इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांच्या पावलावर पाऊल ठेवत तेलंगणातून (Telangana) निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आता राजकिय वर्तुळात सुरू आहे.

न्यु इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, काँग्रेस आगामी येऊ घातलेल्या लोकसेभेच्या निवडणूकांसाठी प्रियांका गांधी यांना उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मेडक किंवा महबूबनगर या जिल्ह्यातून प्रियांका गांधींना उमेदवारी दिली जाऊ शकते. 

इंदिरा गांधींचा वारसा

जर काँग्रेसने प्रियांका गांधींच्या नावावर शिक्कामोर्तब केले तर त्या तेलंगणातील निवडणूकांपासून आपल्या राजकिय कारकिर्दीला सुरुवात करतील. तेलंगणा हे राज्य गांधी परिवारासाठी नवीन नाही आहे. 1980 मध्ये इंदिरा गांधींनी मेडकमधून निवडून येत सत्तेत पुनरागमन केले होते. 1980 निवडणूक इंदिरा गांधींसाठी सोपी नव्हती. त्याच्याआधी आणीबाणीच्या काळानंतर 1977 मध्ये  लागलेल्या निवडणूकांमध्ये काँग्रेसचा दाणून पराभव झाला होता. स्वत: इंदिरा गांधी या उमेदवार म्हणून पराभूत झाल्या होत्या. 

काँग्रेस आता पुन्हा एकदा वाईट काळातून जात आहे. त्यामुळेच प्रियांका गांधींना यावेळेस मेडक मधून तिकीट देण्याची तयारी सध्या काँग्रेसमध्ये सुरु असल्याचं म्हटलं जात आहे. ज्याप्रमाणे इंदिरा गांधींना लोकांनी स्विकारलं होतं त्यातप्रमाणे लोकं प्रियांका गांधींना देखील स्विकारतील असा विश्वास पक्षातून वर्तवण्यात येत आहे. 

महबूबनगरच्या देखील चर्चा 

मेडक जिल्ह्यासह तेलंगणा राज्यातील महबूबनगरच्या देखील चर्चा रंगत आहेत. महबूबनगरमधून सुद्धा प्रियांका गांधींना उमेदवारी दिली जाऊ शकते. खरतंर मेदक मतदारसंघ हा भारत राष्ट्र समिती(बीआरएस) चा बालेकिल्ला आहे. बीआरएसचे नेते आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी 2009 मध्ये महबूबनगरमधून विजयी होत लोकसभेत आपली जागा मिळवली. यांनंतर 2014 च्या निवडणूकांमध्ये मेदक लोकसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली आणि विजय मिळवला. 

यासोबतच मेडक हा केसीआरचा बालेकिल्ला आहे. 2014 मध्ये, पक्षाने मेडक लोकसभा मतदारसंघांतर्गत येणारे सर्व 7 विधानसभा मतदारसंघ जिंकले होते. 2018 मध्ये बाआरएसने सहा जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे अशा परिस्थितीत प्रियांका गांधींचा मेडक मतदारसंघातून होणारा राजकारणातील प्रवेश धोकादायक ठरण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

विधानसभा निवडणुकांवर देखील परिणाम होण्याची शक्यता

या वर्षाच्या अखेरिस तेलंगणा राज्यात विधानसभेच्या निवडणूका होणार आहेत. काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जर प्रियांका गांधींच्या राजकारणातील प्रवेशाची घोषणा केल्यास त्या परिणाम मतदारांवर होऊ शकतो. तसेच विधानसभेतील सकारात्मक प्रतिसाद हा लोकसभेत चांगले परिणाम देण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

SCO Meet: "कलम 370 इतिहासजमा, आता लवकर जागे व्हा"; भारताचे बिलावल भुट्टो यांना सडेतोड उत्तर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rahul Gandhi On Amit Shah Sabha : राहुल गांधींचा मोदी-शाहांवर गंभीर आरोप; धारावीच्या जमिनीसाठी..Who is Sajjad Nomani : व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चर्चेत आलेले सज्जाद नोमानी कोण आहेत? #abpमाझाDhananjay Munde Parli : बहीण-भाऊ स्टार प्रचारक, तरीही मोठी सभा का नाही? परळीत काय घडतंय?Piyush Goyal Mumbai : मविआवर सडकून टीका ते भाजपचा पुढील प्लॅन; पियूष गोयल यांच्यासोबत बातचीत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
×
Embed widget