एक्स्प्लोर

Karnataka Election 2023: कर्नाटकात प्रचारासाठी भाऊ-बहिण मैदानात, कसा असेल राहुल आणि प्रियांका गांधींचा संपूर्ण प्रचाराचा कार्यक्रम?

राहुल गांधी यांच्या आज कर्नाटकात दोन सभा आणि एक रोड शोअसणार आहे. तर प्रियांका गांधी यांचे कर्नाटक प्रचारासात चार कार्यक्रम असतील.

Karnataka Election 2023: कर्नाटक विधानसभा निवडणूक 2023 (Karnataka Election) च्या निवडणुकांना अवघे काही दिवसच उरले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आता राजकीय पक्षांचा कर्नाटकात जोरदार प्रचार सुरू झाला आहे. काँग्रेस पक्षही या प्रचारात निवडणुकांची जोरदार तयारी करत असल्याचं पहायला मिळत आहे. 

कर्नाटकातील प्रचारासाठी  गांधी बहिण-भाऊ(Rahul and Priyanka Gandhi) मैदानात उतरल्याचं पहायला मिळत आहे. राहुल गांधी आज (2 मे) रोजी कर्नाटकात दोन जाहीर सभा आणि रोड शो करणार आहेत. तसेच, पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांचे चार कार्यक्रम असतील. ज्यात एक जाहीर सभा आणि तीन रोड शो समाविष्ट आहेत. सध्या राज्यातील सत्तेची सूत्रे भाजपकडे आहेत. दुसरीकडे ही निवडणूक कोणत्याही परिस्थितीत जिंकण्यासाठी काँग्रेसने आपली पूर्ण ताकद मैदानात उतरवली आहे.

राहुल गांधी यांचे कार्यक्रम 

कर्नाटकात राहुल गांधी आज आपली संपूर्ण ताकद लावणार असल्याचं चित्र पहायला मिळत आहे. या प्रचाराची सुरुवात तीर्थहल्ली येथून सकाळी 11.30 वाजता झाली. इथे राहुल गांधी जनसंवाद देखील साधणार आहेत. यानंतर राहुल गांधी हासन मधील हरिहर येथे एक जनसंवाद करतील. त्यानंतर चिकमगलूर येथे दुपारी 03.15 वाजता राहुल गांधी एक रोड शो करतील. 

प्रियांका गांधी यांचे कार्यक्रम

प्रियांका गांधी कर्नाटक प्रचारादरम्यान पक्ष आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढवणार असल्यांचं चित्र पहायला मिळत आहे. त्यांचे चार लागोपाठ कार्यक्रम असतील. ज्याची सुरुवात मंड्या येथून दुपारी 12 वाजता झाली.  प्रियांका गांधी इथे एका जाहीर सभेला देखील संबोधित करतील. यानंतर  प्रियांका गांधी सलग तीन रोड शो करतील. ज्याची सुरुवात चिंतामणी येथे 04:00 वाजता होईल. त्यानंतर होस्कोटे संध्याकाळी 05:15 वाजता एक रोड शो होईल आणि सीव्ही रमण नगर येथे संध्याकाळी 07:15 वाजता एक रोड शो असेल. 

कर्नाटकमध्ये भाजप, काँग्रेस आणि जेएस पक्षामध्ये  तिरंगी लढत होणार आहे. कर्नाटक राज्यात 10 मे रोजी विधानसभेच्या 224 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. या निवडणूकांचा  निकाल 13मे रोजी  लागणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Karnataka Election Survey: बेरोजगारी, गरीबी, टीपू सुल्तान.... कर्नाटक निवडणुकीतील सर्वात मोठा मुद्दा कोणता? सर्वेक्षणातून खुलासा

महत्त्वाच्या बातम्या

बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
पुण्यात 18 वर्षीय तरुणीने उचललं टोकाचं पाऊल; राहत्या घरीच जीवन संपवलं, आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर
पुण्यात 18 वर्षीय तरुणीने उचललं टोकाचं पाऊल; राहत्या घरीच जीवन संपवलं, आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर

व्हिडीओ

Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
पुण्यात 18 वर्षीय तरुणीने उचललं टोकाचं पाऊल; राहत्या घरीच जीवन संपवलं, आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर
पुण्यात 18 वर्षीय तरुणीने उचललं टोकाचं पाऊल; राहत्या घरीच जीवन संपवलं, आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर
धुमाकूळ घालणाऱ्या अस्वलाला भरपावसात पकडलं; वन विभागाच्या टीमचं धाडस, लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला
धुमाकूळ घालणाऱ्या अस्वलाला भरपावसात पकडलं; वन विभागाच्या टीमचं धाडस, लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला
Kolhapur Crime: रेकॉर्डवरील गुन्हेगारावर कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार; आरोपींच्या 12 तासात मुसक्या आवळल्या
रेकॉर्डवरील गुन्हेगारावर कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार; आरोपींच्या 12 तासात मुसक्या आवळल्या
नवऱ्यानं सोशल मीडियावर फोटो टाकला, पोलिसांना क्लू मिळाला, 22 वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात बायकोला बेड्या; थेट गुजरातमधून अटक
नवऱ्यानं सोशल मीडियावर फोटो टाकला, पोलिसांना क्लू मिळाला, 22 वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात बायकोला बेड्या; थेट गुजरातमधून अटक
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जुलै 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जुलै 2026 | शुक्रवार 
Embed widget