Prithviraj Chavan on Udayanraje Bhosale : राष्ट्रवादीने 3 वेळेस खासदार करुन पाठवलं, एकदाही आम्हाला भेटायला परत आला नाही, पृथ्वीराज चव्हाणांचा उदयनराजेंवर हल्लाबोल
Prithviraj Chavan, Satara Meeting : ही निवडणूक महत्वाची आहे. आपली राज्यघटना शिल्लक राहणार आहे की नाही? लोकशाही टिकणार आहे की नाही? याचा फैसला या निवडणुकीतून होणार आहे. राष्ट्रवादीने 3 वेळेस खासदार करुन पाठवलं, एकदाही आम्हाला भेटायला परत आला नाही. आम्ही इथं मत देणार नाहीत.
खोक्यांचा बाजार केला, काही जणांना राज्यसभा दिली
पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) म्हणाले, तीन पक्ष एकत्र आले आहेत, त्यामुळे आता मताधिक्य वाढलं पाहिजे. महागाई, बरोजगारी, शेतकरी आत्महत्या, भ्रष्ट्राचार, नैतिक भ्रष्ट्राचार हे महत्वाचे मुद्दे आहेत. ऑपरेशन लोटसच्या नावाखाली नैतिक भ्रष्ट्राचार केलाय. नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातील सरकार पाडलं. खोक्यांचा बाजार केला, काही जणांना राज्यसभा दिली. आज इंडिया आघाडीच्या वतीने शशिकांत शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. अचानक उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांना निवडून देण्याचे काम आपण करुयात, असंही चव्हाण यांनी स्पष्ट केलं.
पाटण तालुक्यातील लोक उड्या मारत आहेत
पुढे बोलताना चव्हाण (Prithviraj Chavan) म्हणाले, डोंगरी भागतील उमेदवार आहे. तुमच्यासाठी प्रामाणिकपणे काम करतील. पाटण तालुक्यातील काही लोक उड्या मारत आहेत. पण सर्व लोक शशिकांत शिंदे यांच्या पाठिशी आहेत. पवार साहेबांनी सर्व महाराष्ट्र ढवळून काढलाय. त्यामुळे या निवडणुकीत गद्दारांना त्यांची जागा दाखवली जाईल. तिन्ही पक्ष एकत्र आले पाहिजेत. फुले-शाहू -आंबेडकरांचा विचार जिवंत ठेवायचा आहे. या साताऱ्यात एकदाही जातीवादी विचारांचा खासदार झाला नव्हता.
इतर महत्वाच्या बातम्या
Yash : खिशात 300 रुपये घेऊन सोडलं घर, आज एका चित्रपटासाठी घेतोय 200 कोटी रुपयांपेक्षा अधिक मानधन; वाचा 'रॉकी भाई'ची स्ट्रगल स्टोरी