Prithviraj Chavan on NCP : राष्ट्रवादीने आमचं सरकार पाडलं नसतं तर आम्ही मराठा आरक्षण टिकवलं असतं : पृथ्वीराज चव्हाण
पृथ्वीराज चव्हाणांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटानेही जहरी टीका केली. पृथ्वीराज चव्हाणानां सुपारी देऊनच महाराष्ट्रात पाठविले होते. जर आम्ही निवडणुका एकत्र लढणार नव्हतो, तर अशा सरकारमध्ये राहण्यात काही अर्थ नव्हता, असं उत्तर खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी दिलं.
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) आमचं सरकार पाडलं नसतं तर आम्ही नक्कीच मराठा आरक्षण (Maratha reservation) टिकवलं असतं, असं खळबळजनक वक्तव्य माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी केलं. ते पुण्यात (Pune Maharashtra) बोलत होते. पृथ्वीराज चव्हाणांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटानेही जहरी टीका केली. पृथ्वीराज चव्हाणानां सुपारी देऊनच महाराष्ट्रात पाठविले होते. जर आम्ही निवडणुका एकत्र लढणार नव्हतो, तर अशा सरकारमध्ये राहण्यात काही अर्थ नव्हता, असं उत्तर खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी दिलं.
पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले? (Prithviraj Chavan on NCP)
"मी मुख्यमंत्री असताना सहकार क्षेत्रात घेतलेल्या निर्णयामुळे 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने आमचं सरकार पाडलं. जर त्यावेळी आमचं सरकार पडलं नसतं तर आम्ही नक्कीच मराठा आरक्षण टिकवलं असतं. मला खात्री आहे की माझं सरकार जर पडलं नसतं, तर आम्ही दोघे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आम्ही एकत्रित निवडणुकीला सामोरे गेलो असतो आणि 2014 मध्ये भाजपऐवजी आमचेच सरकार आले असते", असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
आम्ही सत्तेत असतो तर मराठा आरक्षणाचा प्रश्नदेखील मार्गी लावला असता, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचा पलटवार (NCPs answer to Prithviraj Chavan)
पृथ्वीराज चव्हाण हे राजकारणी आहेत असा माझा आतापर्यंतचा समज होता. त्यांना हल्ली विनोद का सुचतो ते काही कळत नाही. सत्ता गेल्यानंतर आरक्षण टिकले नाही असे म्हणण्याला अर्थ नाही. त्यांची असे बोलण्यामागची भूमिका काय हे माहिती नाही, असा हल्लाबोल अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला.
चव्हाणांना सुपारी देऊन पाठवलं (Sunil Tatkare on Prithviraj Chavan)
पृथ्वीराज चव्हाणानां सुपारी देऊनच पाठविले होते. जर आम्ही निवडणुका एकत्र लढणार नव्हतो, तर अशा सरकारमध्ये राहण्यात काही अर्थ नव्हता. पृथ्वीराज चव्हाणांच्या काळात आघाडीची लय बिघडली. आघाडी सरकारमध्ये विलासराव हे सर्वोत्तम मुख्यमंत्री होते. पृथ्वीराज चव्हाणांमुळेच राष्ट्रवादी काँग्रेस चौथ्या क्रमांकावर गेली, असाही घणाघात सुनील तटकरे यांनी केला.
Prithviraj Chavan vs Sunil Tatkare VIDEO : पृथ्वीराज चव्हाण आणि सुनील तटकरे नेमकं काय म्हणाले?