घड्याळ नकोच! उदयनराजेंनंतर आता आणखी एक संभाव्य उमेदवार 'कमळ' चिन्हावर आग्रही! भाजप-राष्ट्रवादीची अडचण
उदयन राजे यांची साताऱ्यातील उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे. विशेष म्हणजे ते भाजपच्या कमळ याच चिन्हावरून निवडणूक लढवणार आहेत.
धाराशीव : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सत्ताधारी महायुतीडून (Mahayuti) जागावाटपाा तिढा सोडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामध्ये सर्वांत जास्त चर्चा होती ती साताऱ्याची. कारण या जागेवर अजित पवार (Ajit Pawar) यांची राष्ट्रवादी (NCP) तसेच भाजपने दावा सांगितला होता. या जागेवर आता उदयनराजेंना (Udyanraje) उमेदवारी मिळाल्याचे जवळपास स्पष्ट झाले असून ते भाजपच्याच (BJP) चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत. दरम्यान, उदयनराजेंची दिल्लीवारी यशस्वी झाल्यानंतर आता भाजपचे धाराशीवचे (Dharashiv) संभाव्य उमेदवार प्रविण परदेशी (Pravin Pardeshi) हेदेखील भाजपच्याच चन्हावर निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत.
भाजपच्या चिन्हावरच निवडणूक लढवण्यावर ठाम
सूत्रांच्या माहितीनुसार उदयनराजे भोसले यांच्यानंतर आता धाराशीवचे भाजपचे संभाव्य उमेदवार प्रविण परदेशी हे घड्याळाच्या चिन्हावर न लढता भाजप चिन्हावर लढण्यास आग्रही आहेत. धाराशीव ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला येऊ शकते. असे झाल्यास येथून भाजपाच्या नेत्याला राष्ट्रवादीच्या चिन्हावरून निवडणूक लढवण्यास आग्रह केला जाऊ शकतो. मिळालेल्या माहितीनुसार या जागेसाठी माजी सनदी अधिकारी प्रविण परेदशी यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. असे झाल्यास राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर परदेशी यांनी लढावं अशी अट घालण्यात येऊ शकते. परदेशी मात्र भाजपच्या कमळ या निवडणूक चिन्हासाठीच आग्रही आहेत. राष्ट्रवादी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची आज (28 मार्च) महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत परदेशी यांच्या भूमिकेबाबत सखोल चर्चा होण्याची शक्यता आहे.
राणाजगजितसिंह पाटलांच्या नावाचीही चर्चा
धाराशीव या जागेवर महायुतीतील भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अजित पवार यांची राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी दावा सांगितलेला आहे. मात्र ही जागा भाजपच्याच वाट्याला येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जागेसाठी माजी सनदी अधिकारी प्रविण परदेशी यांच्या नावाचा विचार चालू आहे. ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात. परदेशी यांच्या नावासह राणाजगजितसिंह पाटील यांच्याही नावाची चर्चा चालू आहे. ते भाजपचे तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांनी 2019 सालची लोकसभा निवडणूक राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढवली होती. या निवडणुकीत त्यांना साडे चार लाखांपेक्षाही अधिक मतं मळाली होती. आता ते भाजपत आहेत. त्यामुळे त्यांच्या नावाचीही सध्या येथे चर्चा आहे.
महाविकास आघाडीकडून ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी
दरम्यान, या जागेसाठी महायुतीने ओमराजे निंबाळकर यांना उमेवारी दिली आहे. उमेदवारीची अधिकृत घोषणा झाल्यानंतर त्यांच्याकडून जोमात प्रचार केला जातोय. त्यामुळे महायुतीकडून नेमकं कोणाला उमेदवारी मिळणार, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.