Prakash Ambedkar on PM Modi : पंतप्रधानाचं कार्यालय वसुलीचं कार्यालय झालंय, प्रकाश आंबेडकरांचे पीएम मोदींवर सनसनाटी आरोप
Prakash Ambedkar, Akola : मोदी सगळ्यात मोठे हप्ता बहादूर आहेत. मोदींनी ईडी लावली. सीबीआय लावली. आयबी मागे लावली. इनकम टॅक्स विभाग मागे लावला.
Prakash Ambedkar, Akola : "मोदी सगळ्यात मोठे हप्ता बहादूर आहेत. मोदींनी ईडी लावली. सीबीआय लावली. आयबी मागे लावली. इनकम टॅक्स विभाग मागे लावला. यंत्रणा येत होत्या. नोटीस दिल्या, रेड केल्या. पण एकाला आतमध्ये घातलं का? ", असं वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणाले. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांची सभा पार पडली. यावेळी त्यांनी स्फोटक भाषण केलं.
17 लाख हिंदू कुटुंब देश सोडून गेली
प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणाले, 17 लाख हिंदू कुटुंब देश सोडून बाहेर गेली. ही माहिती खोटी आहे सांगावं, त्यांना मी कुठेही चॅलेंज करायला तयार आहे. पंतप्रधानाचं कार्यालय मानवतेचं कार्यालय न राहता हे आता वसुलीचं कार्यालय झालंय हे आपण लक्षात घ्या. भाजप आणि नरेंद्र मोदी मुसलमानाच्या विरोधात नाहीयेत. पण ते दाखवण्यासाठी आज मुसलमानाच्या विरोधात आहेत. पण खऱ्या अर्थानं मोदी इथल्या हिंदूच्या विरोधात आहेत,असं विधान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी अकोल्यात केलय.
राज्यघटना म्हणते ज्याचा जन्म भारतात झाला तो भारतीय नागरिक
प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) पुढे बोलताना म्हणाले, स्मार्टसिटी म्हणजे शहरातील कचरा रोज उचलला पाहिजे. स्मार्ट सिटी म्हणजे विना खड्ड्याचा रस्ता असतो. कापसाला भाव नाही. याच्याकडे लक्ष न देता, सरकार फालतू गोष्टींमध्ये लक्ष घालू लागलं आहे. या गावातील भटक्या विमुक्त जातीतील व्यक्तीतील लोकांना सांगितलं तर तो पूर्वीच्या काळात जेलमध्येच असायचा. कागदपत्र नसले तर तुम्ही जेलमध्ये टाकू. राज्यघटना म्हणते ज्याचा जन्म भारतात झाला तो भारतीय नागरिक आहे. हे म्हणतात, कागद दाखवा. असंतोष कसा वाढेल, माणसात भिती कशी राहिलं, असा प्रयत्न सुरु केले आहेत.
कंटाळून 17 लाख कुटुंबाने भारतीय नागरिकत्व सोडलं
मोदी 2014 मध्ये पीएम झाले. तुम्ही गुगलवर चेक करा 2014 पासून किती भारतीय कुटुंबाने भारतीय नागरिकत्व सोडलं तर तुम्हाला आकडे दिसतील. 2014 पासून 17 लाख हिंदू कुटुंब ज्यांची संपत्ती 50 कोटींपेक्षा जास्त आहे, त्यांना नामोहरम करण्यात आलं. बेजार करण्यात आलं. मेंटली टॉर्चर करण्यात आलं. म्हणून कंटाळून 17 लाख कुटुंबाने भारतीय नागरिकत्व सोडलं आणि परदेशाचे नागरिकत्व घेतलं, असंही आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) सांगितलं.
इतर महत्वाच्या बातम्या