एक्स्प्लोर

Prakash Ambedkar on Narendra Modi : देशावर कर्जाचा डोंगर उभा करतील अन् संन्यास घेतो म्हणून निघून जातील, प्रकाश आंबेडकरांचा पीएम मोदींवर घणाघात

Prakash Ambedkar : सध्याचे सरकार डाकूंचे सरकार आहे. देशावर कर्ज 100 रुपयांपैकी 24 रुपयांचे होते. या डाकू सरकारने हे कर्ज 84 रुपयांवर नेले. 2014 ते 2024 या कालावधीत 24 रुपयावरुन 84 रुपयांवरती नेले. जागतिक बँकेने भारताला इशारा दिलाय.

Prakash Ambedkar : "सध्याचे सरकार डाकूंचे सरकार आहे. देशावर कर्ज 100 रुपयांपैकी 24 रुपयांचे होते. या डाकू सरकारने हे कर्ज 84 रुपयांवर नेले. 2014 ते 2024 या कालावधीत 24 रुपयावरुन 84 रुपयांवरती नेले. जागतिक बँकेने भारताला इशारा दिलाय. आपला पगार समजा 10 हजार आहे आणि बँकेचा 10 हजारांचा हफ्ता असेल तर आपली चूल कशी पेटणार ? आपली चूल देखील पेटू शकणार नाही.", असं वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणाले. इचलकरंजी येथे वंचित बहुजन आघाडीची सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते. 

देशावर कर्ज उभा करुन मी सन्यास घेतो असे सांगतील

प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणाले, सनातन्यांना पुन्हा सत्तेत आणले तर दरवर्षी कर्ज वाढत राहणार आहे. सध्या देशावर 84 रुपयांचे कर्ज आहे. हे 2026 ला 100 रुपयांचे कर्ज करतील. देशावर कर्ज उभा करुन मी सन्यास घेतो असे सांगतील. देशाला बुडवून हे सन्यास घेतील. देशाला बुडवणाऱ्या व्यक्तीला पुन्हा पंतप्रधान म्हणून संधी द्यायची का? हे ठरवा, असं आवाहन प्रकाश आंबेडकरांनी केलंय. 

पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणाले, मी वायफळ बोलत नाही, चुकीचं काही बोलत नाही. मोदींच्या सरकारने इथल्या एअरफोर्सची वाट लावली. मनमोहन सिंगांच्या काळात 135 विमाने फ्रांसकडून विकत घ्यायची होती. सनातन वाल्यांनो किती राफेल आले सांगा आणि किती विकत घ्यायचे होते तेही सांगा. केवळ 35 विमाने आली. उरलेले 100 विमानं कधी येणार आहेत? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. 

देशाच्या संरक्षण व्यवस्थेशी खेळणाऱ्या व्यक्तीला पुन्हा पंतप्रधान करता कामा नये

ज्यांनी या देशाची संरक्षणाशी खेळलय. त्यांना पुन्हा पंतप्रधान करता कामा नये हे लक्षात घ्या. निवृत्त सैनिकांना माझं आव्हान आहे. सामान्य माणसाला लष्करातील कॉनवेची माहिती द्या. मी त्यांना आवाहन करतो, लष्करात असताना किती गाड्यांचा ताफा असतो आणि तेवढ्याच गाड्या का ठेवतात? याची माहिती सर्वसामान्य माणसाला द्या. पुलवामामध्ये त्यांनी तसं का केलं नाही, हे विचारा. मोदींना आम्ही विचारतो की, 80 गाड्यांचा ताफा कसा झाला. ज्या मेजरने 80 गाड्यांचा ताफा केला. त्याची चौकशी करा. 

पंतप्रधान देशाला बुडवत आहेत. 

एका बाजूला देशाला बुडवणारा पंतप्रधान आणि दुसऱ्या बाजूने धारकऱ्यांच्या माध्यमातून दंगली पेटवल्या जात आहेत. सर्व दंगली धारकऱ्यांकडून घडवल्या जात आहेत,असा माझा आरोप आहे. एकदा आपल्याकडे पैसा राहिला नाही तर एकवेळ अशी येईल की, घरदार विकायची वेळ येईल, अंसही प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) नमूद केलं. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Maha Vikas Aghadi : वंचितला पाच ते सहा जागा सोडण्यासाठी पवार-ठाकरे आग्रही, काँग्रेस आणि राऊत मात्र तीनच जागेवर ठाम

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump : अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प राजवटीचे साईड इफेक्ट सुरुच! आता 1 लाख भारतीयांवर नवीन टांगती तलवार, सर्व फेडरल कार्यालयाकडून अहवाल मागवला
अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प राजवटीचे साईड इफेक्ट सुरुच! आता 1 लाख भारतीयांवर नवीन टांगती तलवार, सर्व फेडरल कार्यालयाकडून अहवाल मागवला
India vs England : टी-20 मालिकेदरम्यान टीम इंडियाला दुहेरी तगडा झटका; एकाचवेळी दोघांना दुखापत, 'या' 2 खेळाडूंची एन्ट्री
टी-20 मालिकेदरम्यान टीम इंडियाला दुहेरी तगडा झटका; एकाचवेळी दोघांना दुखापत, 'या' 2 खेळाडूंची एन्ट्री
"विकीच्या आवाजात दम नाही, शरद केळकर हवा होता", 'छावा'च्या ट्रेलरवर निगेटिव्ह प्रतिसाद, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
परी म्हणून की सुंदरा... खूपच ग्लॅमरस आहे राजेश खन्नाची नात, आजी डिंपल कपाडियासोबतचा फोटो व्हायरल
परी म्हणून की सुंदरा... खूपच ग्लॅमरस आहे राजेश खन्नाची नात, आजी डिंपल कपाडियासोबतचा फोटो व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Ajit Pawar Republic Day : देशभरात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह, पालकमंत्री अजित पवारांकडून ध्वजारोहणMohan Bhagwat Bhiwandi Full Speech : प्रजासत्ताक दिनानिमित्त मोहन भागवत यांचं भिवंडी येथे भाषणNarhari Zirwal On Hingoli Gurdian Minister : गरीब आहे म्हणून गरीब जिलह्याचं पालकमंत्रिपद दिलं- नरहरी झिरवाळMega Block At Central Railway : मध्य रेल्वेवरील मेगाब्लॉक अजून सुरुच, प्रवाशांचे हाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प राजवटीचे साईड इफेक्ट सुरुच! आता 1 लाख भारतीयांवर नवीन टांगती तलवार, सर्व फेडरल कार्यालयाकडून अहवाल मागवला
अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प राजवटीचे साईड इफेक्ट सुरुच! आता 1 लाख भारतीयांवर नवीन टांगती तलवार, सर्व फेडरल कार्यालयाकडून अहवाल मागवला
India vs England : टी-20 मालिकेदरम्यान टीम इंडियाला दुहेरी तगडा झटका; एकाचवेळी दोघांना दुखापत, 'या' 2 खेळाडूंची एन्ट्री
टी-20 मालिकेदरम्यान टीम इंडियाला दुहेरी तगडा झटका; एकाचवेळी दोघांना दुखापत, 'या' 2 खेळाडूंची एन्ट्री
"विकीच्या आवाजात दम नाही, शरद केळकर हवा होता", 'छावा'च्या ट्रेलरवर निगेटिव्ह प्रतिसाद, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
परी म्हणून की सुंदरा... खूपच ग्लॅमरस आहे राजेश खन्नाची नात, आजी डिंपल कपाडियासोबतचा फोटो व्हायरल
परी म्हणून की सुंदरा... खूपच ग्लॅमरस आहे राजेश खन्नाची नात, आजी डिंपल कपाडियासोबतचा फोटो व्हायरल
Gautam Gambhir and Suryakumar Yadav : कसोटीत काही केल्या डाळ शिजेना, वनडेतही अग्नीपरीक्षा होणार, पण टी-20 मध्ये कॅप्टन सूर्या आणि गंभीर गुरुजींची जोडी जमली! एकदा आकडेवारी बघाच
कसोटीत काही केल्या डाळ शिजेना, वनडेतही अग्नीपरीक्षा होणार, पण टी-20 मध्ये कॅप्टन सूर्या आणि गंभीर गुरुजींची जोडी जमली! एकदा आकडेवारी बघाच
Nashik Accident : नाशिक अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून आर्थिक मदत; गिरीश महाजनांनी धनादेश सुपूर्द करताच कुटूंबियांना अश्रू अनावर
नाशिक अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून आर्थिक मदत; गिरीश महाजनांनी धनादेश सुपूर्द करताच कुटूंबियांना अश्रू अनावर
Dhule: दलित वस्तीचा निधी पळवल्याचा आरोप करत जि.प समोरच आत्मदहनाचा प्रयत्न, प्रजासत्ताकदिनी अंगावर पेट्रोल ओतताच..
दलित वस्तीचा निधी पळवल्याचा आरोप करत जि.प समोरच आत्मदहनाचा प्रयत्न, प्रजासत्ताकदिनी अंगावर पेट्रोल ओतताच..
Tilak Varma : टी-20 क्रिकेटमध्ये नाबाद 338 धावांचा पाऊस! तिलक वर्माचा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत असाही भीम पराक्रम
टी-20 क्रिकेटमध्ये नाबाद 338 धावांचा पाऊस! तिलक वर्माचा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत असाही भीम पराक्रम
Embed widget