एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Maha Vikas Aghadi : वंचितला पाच ते सहा जागा सोडण्यासाठी पवार-ठाकरे आग्रही, काँग्रेस आणि राऊत मात्र तीनच जागेवर ठाम

Maharashtra Maha Vikas Aghadi Seat Sharing : शनिवारी महाविकास आघाडीची जागावाटपावर चर्चा होणार असली तरी त्यामध्ये अंतिम निर्णय होण्याची शक्यता नाही. वंचितच्या वतीने प्रकाश आंबेडकरांनी चर्चेला यावं असं शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची इच्छा आहे. 

मुंबई : महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा (Maharashtra Maha Vikas Aghadi Seat Sharing) अद्याप सुटला नसून वंचितला किती जागा द्यायच्या यावरून घोडं अडल्याची चर्चा आहे. शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे प्रकाश आंबेडकरांना (Prakash Ambedkar) पाच ते सहा जागा द्याव्यात अशा मताचे आहेत. तर नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण आणि संजय राऊत हे वंचितला तीनच जागा द्यायच्या मताचे आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 

वंचितच्या प्रकाश आंबेडकरांना किती जागा द्यायच्यात यावरून महाविकास आघाडीत दोन गट असल्याचं दिसतंय.9 मार्च रोजी महाविकास आघाडीची जागावाटपासंदर्भात एक बैठक होणार आहे. त्या बैठकीतही अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता नसल्याचं सांगण्यात येतंय. त्यामुळे मविआची आणखी एक बैठक होऊन येत्या पाच ते सहा दिवसांनंतर यावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीने वंचितला किती जागा द्यायच्या यावर 14 किंवा 15 मार्चच्या सांगलीतील सभेपूर्वी अंतिम निर्णय घ्यावा असा अप्रत्यक्ष अल्टिमेटम प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीला दिला आहे. 

प्रकाश आंबेडकरांसोबत थेट चर्चा (Maharashtra Maha Vikas Aghadi Seat Sharing) 

महाविकास आघाडीची वंचितसोबतची पुढची बोलणी थेट प्रकाश आंबेडकरांशीच होणार आहे. या आधी वंचितच्या वतीने पक्षाचे नेते मविआच्या बैठकीला जायचे. आतामहाविकास आघाडीकडून प्रकाश आंबेडकरांशीच बोलणार असल्याची अट घालण्यात आली आहे. पुढची बोलणी प्रतिनिधींशी नव्हे तर थेट आंबेडकरांशी व्हावी असा शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचा आग्रह असल्याची माहिती आहे. त्यामुळे मविआच्या जागावाटपावर अंतिम निर्णय शक्य तितक्या लवकर घेता येईल असा मतप्रवाह आहे.

महाविकास आघाडीच्या या भूमिकेला प्रकाश आंबेडकरांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचं दिसतंय. त्यामुळेच प्रकाश आंबेडकरांसोबत आता थेट शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात चर्चा करणार आहेत. 

राज्यातील महाविकास आघाडीमध्ये जागावाटपासाठी झालेल्या या आधीच्या बैठकीमध्ये वंचित बहुजन आघाडीने एक प्रस्ताव दिला होता. त्या प्रस्तावावर शनिवारी होणाऱ्या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती आहे. वंचितने महाविकास आघाडीसोबत एकत्रित निवडणूक लढवावी यावर तीनही पक्षांचं एकमत आहे, महाविकास आघाडीमध्ये कोणतेही मतभेद नसल्याची माहिती खासदार संजय राऊतांनी दिली होती. 

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rishabh Pant IPL 2025 : रिषभ पंतला 27 कोटी मिळाल्याची जागतिक चर्चा, पण किती कोटी टॅक्स जाणार अन् हातात किती पडणार?
रिषभ पंतला 27 कोटी मिळाल्याची जागतिक चर्चा, पण किती कोटी टॅक्स जाणार अन् हातात किती पडणार?
धक्कादायक! अंधेरीत 25 वर्षीय पायलट युवतीने संपवलं जीवन; पोलिसांनी बॉयफ्रेंडला उचललं
धक्कादायक! अंधेरीत 25 वर्षीय पायलट युवतीने संपवलं जीवन; पोलिसांनी बॉयफ्रेंडला उचललं
डायरेक्टर अरे थांब बाबा म्हणतोय, तरी किस करतच राहिला; अभिनेत्रीने केला गंभीर आरोप! म्हणाली, 'त्या एकामुळे..'
डायरेक्टर अरे थांब बाबा म्हणतोय, तरी किस करतच राहिला; अभिनेत्रीने केला गंभीर आरोप! म्हणाली, 'त्या एकामुळे..'
Parth Pawar: अमोल मिटकरींचा लेख, पार्थ पवारांचा इंग्रजीतून इशारा; माझा पक्ष अन् माझे वडिल म्हणत चांगलंच झापलं
अमोल मिटकरींचा लेख, पार्थ पवारांचा इंग्रजीतून इशारा; माझा पक्ष अन् माझे वडिल म्हणत चांगलंच झापलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rohit Pawar PC | निवडणूक आयोगाने आम्ही सांगू ती मशीन कॅमेऱ्याच्या निगराणीखाली उघडावीत- रोहित पवारABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 5PM 11 November 2024Eknath Shinde Full PC : थोडं भावनिक, थोडं आक्रमक...एकनाथ शिंदे यांचं FAREWELL SPEECH? ABP MAJHAEknath Shinde Shayri | जीवन मे असली उडान अभी बाकी है, शायरी म्हणत मांडली शिंदेंनी भावना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rishabh Pant IPL 2025 : रिषभ पंतला 27 कोटी मिळाल्याची जागतिक चर्चा, पण किती कोटी टॅक्स जाणार अन् हातात किती पडणार?
रिषभ पंतला 27 कोटी मिळाल्याची जागतिक चर्चा, पण किती कोटी टॅक्स जाणार अन् हातात किती पडणार?
धक्कादायक! अंधेरीत 25 वर्षीय पायलट युवतीने संपवलं जीवन; पोलिसांनी बॉयफ्रेंडला उचललं
धक्कादायक! अंधेरीत 25 वर्षीय पायलट युवतीने संपवलं जीवन; पोलिसांनी बॉयफ्रेंडला उचललं
डायरेक्टर अरे थांब बाबा म्हणतोय, तरी किस करतच राहिला; अभिनेत्रीने केला गंभीर आरोप! म्हणाली, 'त्या एकामुळे..'
डायरेक्टर अरे थांब बाबा म्हणतोय, तरी किस करतच राहिला; अभिनेत्रीने केला गंभीर आरोप! म्हणाली, 'त्या एकामुळे..'
Parth Pawar: अमोल मिटकरींचा लेख, पार्थ पवारांचा इंग्रजीतून इशारा; माझा पक्ष अन् माझे वडिल म्हणत चांगलंच झापलं
अमोल मिटकरींचा लेख, पार्थ पवारांचा इंग्रजीतून इशारा; माझा पक्ष अन् माझे वडिल म्हणत चांगलंच झापलं
Mumbai Indians : लखनौनं रिषभ पंतसाठी तब्बल 27 कोटी मोजले, पण गेल्या सहा वर्षांपासून सगळ्यांनाच घाम फोडलेल्या दोघांना मुंबईनं 23 कोटीत घेतलं; बाजी पलटणार?
लखनौनं रिषभ पंतसाठी तब्बल 27 कोटी मोजले, पण गेल्या सहा वर्षांपासून सगळ्यांनाच घाम फोडलेल्या दोघांना मुंबईनं 23 कोटीत घेतलं; बाजी पलटणार?
Eknath Shinde  : एकनाथ शिंदेंनी अर्थशास्त्र बघून नव्हे तर ह्रदयशास्त्र पाहून काम केलं, भाजपमधून पहिली प्रतिक्रिया, सुधीर मुनगंटीवार म्हणाले...
एकनाथ शिंदे म्हणाले नरेंद्र मोदी, अमित शाह यांचा निर्णय मान्य, भाजपमधून पहिली प्रतिक्रिया, मुनगंटीवार म्हणाले...
Eknath Shinde Full PC : थोडं भावनिक, थोडं आक्रमक...एकनाथ शिंदे यांचं FAREWELL SPEECH? ABP MAJHA
Eknath Shinde Full PC : थोडं भावनिक, थोडं आक्रमक...एकनाथ शिंदे यांचं FAREWELL SPEECH? ABP MAJHA
Eknath Shinde PC : भाजपचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा,  मोदी- शाहांच्या निर्णयाला पाठिंबा, एकनाथ शिंदे यांच्याकडून स्पष्ट संकेत
भाजपचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा, मोदी- शाहांच्या निर्णयाला पाठिंबा, एकनाथ शिंदे यांच्याकडून स्पष्ट संकेत
Embed widget