Prakash Ambedkar on Majha Katta : महाविकास आघाडीमध्ये राहणार की नाही? प्रकाश आंबेडकरांनी माझा कट्टावर स्पष्टच सांगितले
Prakash Ambedkar on Majha Katta : "आम्ही महाविकास आघाडीमध्ये जाण्यास अजूनही उत्सुक आहोत. सगळे बडे नेते आहेत.
Prakash Ambedkar on Majha Katta : "आम्ही महाविकास आघाडीमध्ये जाण्यास अजूनही उत्सुक आहोत. सगळे बडे नेते आहेत. हट्ट कोणी सोडत नाही. आताही माझ्या माहितीप्रमाणे 10 जागांपैकी 3 जागांचा तिढा सुटलेला आहे. 5 जागांचा तिढा होता त्यातील 3 जागांचा तिढा सुटला आहे. काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये 10 जागांचा वाद होता. त्यानंतर 3 जागांचा वाद सुटला. त्यांच्यामध्ये काही जागांवर मतभेद आहेत. त्यांनी एकमेकांच्या कोणत्या जागा मागितल्या आहेत, हे जाहीर केलेले नाही, असं वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर म्हणाले. ते माझा कट्टावर बोलत होते.
काँग्रेस राष्ट्रवादीने त्याला प्रतिसाद दिला नाही
प्रकाश आंबेडकर म्हणाले, महाविकास आघाडीतील नेते अडीच वर्ष एकत्र बसले तरी बोलणी सुरु झाली नव्हती. मी म्हटलं आपण चौघजण आहोत. 12 जागा वाटून घेऊयात. आम्ही एकाही कार्यक्रमाला गाडी दिले नाही किंवा घोडाही दिला नाही. उद्धव ठाकरे यांनी आम्हाला दोन वेळेस महाविकास आघाडीमध्ये घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, काँग्रेस राष्ट्रवादीने त्याला प्रतिसाद दिला नाही, असंही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
तेव्हाच माझ्यामागे सत्ता लागली होती
पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, तुम्ही एक पोस्टर बघितलं नाही. आदिवासींचे एक पोस्टर आहे. डॉक्टरांना नांदेडमध्ये संडास धुण्यास सांगितले. आम्हाला सालगडी म्हणून राबवण्यात आले. ती मेंटॅलिटी बोलावी लागली आहे. मी 80 साली आलो तेव्हाच माझ्यामागे सत्ता लागली होती. मंत्री झालो तर 4-5 कार्यकर्ते श्रीमंत होतील, असंही आंबेडकर यांनी नमूद केले. मला मान सन्मान हवा. तो मिळत नाही. आमच्या प्रतिनिधींना बैठकीतून बाहेर बसायला लावलं. आमचे प्रतिनिधी तरीही तिथेही जाऊन बसले. आमच्याबरोबर केवळ एकच बैठक झाली. याला पॉलिटिकल बैठक म्हणत नाहीत. मी माझ्या शब्दात सांगतो कोंबडी सर्वांनी शिजवली, मी यांना एकट्याला खाऊ देणार नाही, असेही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
वंचितांच्या वर्गाने वरती येऊ नये, अशी यांची इच्छा
आम्ही वेगळं लढलो तर तुमचं दुखण का? तुम्ही आम्हाला बी टीम का म्हणता? आमच्या बॅगा वापरायच्या आणि चालत राहायचे, अशी मेंटॅलिटी आहे. वंचितांच्या वर्गाने वरती येऊ नये, अशी यांची भूमिका आहे.
इतर महत्वाच्या बातम्या