एक्स्प्लोर

बीडमध्ये सर्वपक्षीय मूक मोर्चा सुरु असतानाच प्रकाश आंबेडकर CM फडणवीसांच्या भेटीला, सागर बंगल्यावर तासभर चर्चा

Prakash Ambedkar Meet CM Devendra Fadnavis : एकीकडे बीडमध्ये संतोष सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ सर्वपक्षीय मोर्चा सुरु आहे. तर दुसरीकडे प्रकाश आंबेडकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला दाखल झालेत.

Prakash Ambedkar Meet CM Devendra Fadnavis : बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांचे हत्या प्रकरण आणि परभणीतील हिंसाचारानंतर (Parbhani Violence) न्यायालयीन कोठडीत असलेले सोमनाथ सूर्यवंशी (Somnath Suryawanshi) यांच्या मृत्यू प्रकरणामुळे राज्याचे वातावरण चांगलेच तापले आहे. एकीकडे संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ आज बीडमध्ये (Beed) सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आला आहे. तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या भेटीसाठी दाखल झाले. 

प्रकाश आंबेडकर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात दोघांमध्ये मागील तासाभरापासून चर्चा सुरु आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होत आहे. बीड आणि परभणीच्या विषयावर प्रकाश आंबेडकर मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. या भेटीनंतर प्रकार आंबेडकर नेमकं काय बोलणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ बीडमध्ये मूक मोर्चा

दरम्यान, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज बीडमध्ये मूक मोर्चा निघाला आहे. बीडमधील मूक मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मस्साजोग गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मस्साजोग गावचे सर्व नागरिक मोर्चात सहभागी झाले आहेत. तसेच बजरंग सोनवणे, सुरेश धस, जितेंद्र आव्हाड, छत्रपती संभाजी राजे भोसले आणि मनोज जरांगेंसह अनेक नेते या मोर्चात सहभागी झाले आहेत.  डॉ. आंबेडकर चौकातून मोर्चाला सुरुवात झाली असून मारेकऱ्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे.

मराठा क्रांती ठोक मोर्चाची मागणी

सरपंच संतोष देशमुख यांचं प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवण्यात यावे, सर्व आरोपींवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात यावी, सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, याप्रकरणामध्ये ज्येष्ठ विधीतज्ज्ञ उज्ज्वल निकम व विधीतज्ज्ञ सतीश माणशिंदे यांची नियुक्ती व्हावी, हे प्रकरण बीड या ठिकाणी न चालवता मुंबई न्यायालायकडे वर्ग करण्यात यावे, अशी मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चाने केली आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Parbhani Crime : वंशाच्या दिव्यासाठी पत्नीवर पेट्रोल टाकून जिवंत जाळलं, उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, परभणीतील घटनेची राज्य महिला आयोगाकडून दखल

Anjali Damania : जोपर्यंत वाल्मिक कराडला अटक होत नाही तोपर्यंत बीड सोडणार नाही, मुंडेना मंत्रीपद सोडायला भाग पाडू; अंजली दमानियांचा बीडमध्ये एल्गार!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nitish Kumar Reddy :  बुमराह आऊट होताच काळजाचा ठोका चुकला, डीएसपी सिराजचा मास्टरक्लास डिफेन्स अन् नितीशचे पहिलं शतक; एमसीजीवर टाळ्यांचा कडकडाट
बुमराह आऊट होताच काळजाचा ठोका चुकला, डीएसपी सिराजचा मास्टरक्लास डिफेन्स अन् नितीशचे पहिलं शतक; एमसीजीवर टाळ्यांचा कडकडाट
AUS vs IND, 4th Test Nitish Kumar Reddy: नितीश रेड्डीने मैदान गाजवलं, वडिलांना रडू कोसळलं; तो क्षण पाहून भारतीय गहिवरले, Photo
नितीश रेड्डीने मैदान गाजवलं, वडिलांना रडू कोसळलं; तो क्षण पाहून भारतीय गहिवरले, Photo
Parbhani Crime :तिसरी मुलगीच, हैवान पतीने पेटवलं, जळत्या अंगाने पत्नी धावत राहिली, दोन दुकानंही पेटली!
तिसरी मुलगीच, हैवान पतीने पेटवलं, जळत्या अंगाने पत्नी धावत राहिली, दोन दुकानंही पेटली!
Crime : प्रॉपर्टीच्या वादातून राग अनावर, तीन जणांनी गळा दाबून एकास संपवलं, कुर्ल्यात खळबळ
प्रॉपर्टीच्या वादातून राग अनावर, तीन जणांनी गळा दाबून एकास संपवलं, कुर्ल्यात खळबळ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Parbhani Crime : माणुसकीला काळिमा! तिसरीही मुलगी झाल्याने पतीने पेट्रोल टाकून पत्नीला जिवंत जाळलंABP Majha Headlines : 10 AM : 28 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTOP 90 : 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 28 डिसेंबर 2024: ABP MajhaManmohan Singh Funeral :माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी काँग्रेस मुख्यालयात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitish Kumar Reddy :  बुमराह आऊट होताच काळजाचा ठोका चुकला, डीएसपी सिराजचा मास्टरक्लास डिफेन्स अन् नितीशचे पहिलं शतक; एमसीजीवर टाळ्यांचा कडकडाट
बुमराह आऊट होताच काळजाचा ठोका चुकला, डीएसपी सिराजचा मास्टरक्लास डिफेन्स अन् नितीशचे पहिलं शतक; एमसीजीवर टाळ्यांचा कडकडाट
AUS vs IND, 4th Test Nitish Kumar Reddy: नितीश रेड्डीने मैदान गाजवलं, वडिलांना रडू कोसळलं; तो क्षण पाहून भारतीय गहिवरले, Photo
नितीश रेड्डीने मैदान गाजवलं, वडिलांना रडू कोसळलं; तो क्षण पाहून भारतीय गहिवरले, Photo
Parbhani Crime :तिसरी मुलगीच, हैवान पतीने पेटवलं, जळत्या अंगाने पत्नी धावत राहिली, दोन दुकानंही पेटली!
तिसरी मुलगीच, हैवान पतीने पेटवलं, जळत्या अंगाने पत्नी धावत राहिली, दोन दुकानंही पेटली!
Crime : प्रॉपर्टीच्या वादातून राग अनावर, तीन जणांनी गळा दाबून एकास संपवलं, कुर्ल्यात खळबळ
प्रॉपर्टीच्या वादातून राग अनावर, तीन जणांनी गळा दाबून एकास संपवलं, कुर्ल्यात खळबळ
Anjali Damania : जोपर्यंत वाल्मिक कराडला अटक होत नाही तोपर्यंत बीड सोडणार नाही, मुंडेना मंत्रीपद सोडायला भाग पाडू; अंजली दमानियांचा बीडमध्ये एल्गार!
जोपर्यंत वाल्मिक कराडला अटक होत नाही तोपर्यंत बीड सोडणार नाही, धनंजय मुंडेना मंत्रीपद सोडायला भाग पाडू; अंजली दमानियांचा बीडमध्ये एल्गार!
Anjali Damania : अंजली दमानिया मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबियांच्या भेटीला, 'ती' कॉल रेकॉर्डिंग ऐकवत म्हणाल्या, जोपर्यंत न्याय मिळत नाही...
अंजली दमानिया मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबियांच्या भेटीला, 'ती' कॉल रेकॉर्डिंग ऐकवत म्हणाल्या, जोपर्यंत न्याय मिळत नाही...
Bus Accident : भरधाव बस नाल्यातील केंदाळात कोसळली; दोन वर्षाच्या लेकरासह मातेसह 8 जणांचा मृत्यू, मोदींकडून आर्थिक मदत जाहीर
भरधाव बस नाल्यातील केंदाळात कोसळली; दोन वर्षाच्या लेकरासह मातेसह 8 जणांचा मृत्यू, मोदींकडून आर्थिक मदत जाहीर
Manoj Jarange Patil : संतोष भैय्याला न्याय दिल्याशिवाय एकही मराठा मागे हटणार नाही; मनोज जरांगे कडाडले, CM फडणवीसांवर आरोप
संतोष भैय्याला न्याय दिल्याशिवाय एकही मराठा मागे हटणार नाही; मनोज जरांगे कडाडले, CM फडणवीसांवर आरोप
Embed widget