एक्स्प्लोर

हा मोदी आहे, घरात घुसून मारणार; पंतप्रधान मोदींचा दहशतवाद्यांना कडक शब्दात इशारा

PM Narendra Modi Sabha in Maharashtra : मुंबईत बॉम्बस्फोट व्हायचे, काशीत व्हायचे. पण हा मोदी, घरात घुसून मारणार, असं वक्तव्य पंतप्रधान मोदींनी केलं आहे.

पुणे : दहशतवाद्यांना (Terrorist) घरात घुसून मारणार, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी म्हटलं आहे. 10 वर्षांआधी भारतावर दहशतवादी हल्ले व्हायचे, मुंबईत दहशतवादी हल्ले व्हायचे, काशीमध्ये बॉम्बस्फोट व्हायचे, अयोध्येमध्ये बॉम्बस्फोट व्हायचे, आता हे सर्व बंद झालंय की नाही. जे इथे शेजारून (पाकिस्तान) स्फोट करायची सवय झाली होती, जे शेजारचे आपल्या देशात दहशतवादी पाठवायचे, त्यांना आता अन्न मिळणं कठीण झालं आहे. पीएफआयवर प्रतिबंध लावला, असंही मोदींनी यावेळी सांगितलं. ते पुण्यातील प्रचारसभेत बोलत होते. 

दहशतवाद्यांना घरात घुसून मारणार

देशात कधीच धर्मांच्या आधारावर आरक्षण लागू होऊ शकत नाही. धर्माच्या आधारे आरक्षण देऊन देशाचे विभाजन करण्याचे काम भारत आघाडी करत आहे. पण मोदी अजूनही जिवंत आहेत. मोदी हे होऊ देणार नाहीत. काँग्रेसच्या कार्यकाळात दहशतवादाला चालना मिळाली. मुंबई आणि पुण्यात रक्तस्त्राव झाला होता. मुंबईत बॉम्बस्फोट व्हायचे, काशीत व्हायचे. पण हा मोदी, घरात घुसून मारणार, असं वक्तव्य पंतप्रधान मोदींनी केलं आहे.

दहशतवादी पाठवायचे त्यांना आता अन्न मिळणं कठीण

10 वर्षांआधी भारतावर दहशतवादी हल्ले व्हायचे, मुंबईत दहशतवादी हल्ले व्हायचे, काशीमध्ये बॉम्बस्फोट व्हायचे, अयोध्येमध्ये बॉम्बस्फोट व्हायचे, आता हे सर्व बंद झालंय की नाही. जे इथे शेजारून (पाकिस्तान) स्फोट करायची सवय झाली होती, जे शेजारचे आपल्या देशात दहशतवादी पाठवायचे, त्यांना आता अन्न मिळणं कठीण झालं आहे. हा मोदी आहे, घरात घुसून मारेल, अशा कडक शब्दात मोदींनी दहशतवाद्यांना इशारा दिला आहे.

सर्वांच्या आकांक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न

मला फक्त दहा वर्षे सेवा करण्याची संधी मिळाली. समाजातील सर्व घटकांच्या आकांक्षा पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न केला.  यावेळीच्या बजेटमधे एक लाख कोटी रुपये इनोव्हेशनसाठी दिलेत.  पुण्याला याचा फायदा होईल. आधीच्या सरकारांनी भ्रष्टाचारचा टॅक्स वसूल केला, असं म्हणत मोदींनी काँग्रेसला लक्ष्य केलं आहे.

काँग्रेसने 10 वर्षात विकासावर खर्च केला, तेवढा आम्ही एका वर्षात केला

मनमोहन सिंह यांच्या सरकारने 10 वर्षात मुलभूत विकासावर जेवढा खर्च केला, तेवढा आम्ही एका वर्षात केला, असं म्हणत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर टीका केली आहे. स्टार्टअप इंडियाची कमाल पाहा, फक्त 10 वर्षात सव्वा लाखाहून अधिक स्टार्टअप तयार झाले आहेत. गर्वाची गोष्ट म्हणजे यातील अनेक स्टार्टअप पुण्यात आहेत. आम्ही नीतीगत बदल केले आहेत. एक लाख कोटी रुपये इनोव्हेशन करण्यासाठी देण्याचा निर्णय अंतरिम अर्थसंकल्पात घेण्यात आला आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

पुण्यात येऊन मोदींचा पवारांवर पहिला हल्ला, एका नेत्यामुळे राज्य अस्थिर, भटकत्या आत्म्याने स्वत:चा पक्षही अस्थिर केला!

महत्त्वाच्या बातम्या

BMC : मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, पगार रोखण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाकडून मागे
मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, पगार रोखण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाकडून मागे
Raju Shetti : ऊस दर प्रश्नी तोडगा काढण्यासाठी राजू शेट्टी एक पाऊल पुढे, 4200 रुपयांवर चर्चेची तयारी, वाहन चालकांची मागितली माफी 
ऊस दर प्रश्नी तोडगा काढण्यासाठी राजू शेट्टी एक पाऊल पुढे, 4200 रुपयांवर चर्चेची तयारी, वाहन चालकांची मागितली माफी 
Gokul : गोकुळमध्ये पाच संचालक नेमण्याचा फडणवीस सरकारचा निर्णय, दिल्लीतून मोठी अपडेट आली, काँग्रेस सुप्रीम कोर्टात दाद मागणार, बड्या नेत्याची थेट घोषणा
गोकुळचा वाद सुप्रीम कोर्टात पोहोचणार, फडणवीस सरकारच्या संचालक नेमण्याच्या निर्णयाला काँग्रेस आव्हान देणार, बड्या नेत्याची घोषणा
धर्मरक्षणासाठी रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत समर्पित राहणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
सत्तेपेक्षा सिद्धांत मोठा, अधिकारापेक्षा धर्म आणि कर्तव्य श्रेष्ठ! : एकनाथ शिंदे

व्हिडीओ

Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
Gold Silver Rate Hike : अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव, सोने आणि चांदीमध्ये तुफान तेजी,चांदी 7775 रुपयांनी महागली, जाणून घ्या IBJA चे नवे दर
अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव होताच सोने,चांदीच्या दरात तुफान तेजी, जाणून घ्या IBJA चे नवे दर
धर्मरक्षणासाठी रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत समर्पित राहणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
सत्तेपेक्षा सिद्धांत मोठा, अधिकारापेक्षा धर्म आणि कर्तव्य श्रेष्ठ! : एकनाथ शिंदे
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
Ravindra Dhangekar on Gokul Election : एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
मोठी बातमी, सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा,75 टक्के अग्निवीरांना 2 वर्षांच्या अतिरिक्त सेवेनंतर संधी मिळणार, केंद्राचा मोठा निर्णय
सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा, केंद्राचा अग्निवीर योजनेत मोठा बदल, अश्विनी वैष्णव यांची माहिती
Embed widget