एक्स्प्लोर

Dharmendra Pradhan Resignation : धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा पंतप्रधानांनी स्वीकारला, 'या' मंत्र्याकडे शिक्षणखात्याचा प्रदभार, पेपर फुटी आंदोलनानंतर अखेर मोठा निर्णय

Dharmendra Pradhan Resignation Accepted : नीट पेपर फुटीप्रकरणी विद्यार्थ्यांचा देशभरातील आक्रोश आणि सीजेपीच्या आंदोलनाच्या दबावानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला होता. तो आता मंजूर करण्यात आला आहे.

नवी दिल्ली : धर्मेंद्र प्रधान यांनी त्यांच्या पदाचा दिलेला राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अखेर स्वीकारला आहे. नीट (NEET) पेपर फुटीप्रकरणी आणि ढिसाळ शिक्षण व्यवस्थेविरोधात दिल्लीच्या जंतर-मंतरपासून ते पाटण्यापर्यंत हजारो विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या तीव्र आंदोलनानंतर पंतप्रधान मोदींनी हे मोठे पाऊल उचलले आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी दुपारी या संपूर्ण प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारत आपला राजीनामा पंतप्रधानांकडे सुपूर्द केला होता. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर शिक्षणखात्याचा प्रदभार आता प्रल्हाद जोशी यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. 

धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा यासाठी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनीही तब्बल 26 दिवस उपोषण केले होते. सरकारच्या आश्वासनानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले होते.

CJP Agitation Victory : जंतर-मंतरवर जल्लोष

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मंजूर झाल्याची बातमी येताच 'कॉकरोच जनता पार्टी' (CJP) आणि विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला. दिल्लीतील जंतर-मंतरवर तरुण ढोल-ताशे वाजवत नाचताना आणि विजयोत्सव साजरा करताना दिसले. शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याव्यतिरिक्त सीजेपीच्या इतरही प्रमुख मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत, ज्यामध्ये पीडित कुटुंबांना नुकसान भरपाई देण्याचा समावेश आहे. 20 जुलै रोजी दिल्लीत संसदेवर काढण्यात आलेल्या मोर्चावर पोलिसांनी केलेल्या लाठीमारानंतर या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते आणि सरकार पूर्णपणे बॅकफुटवर आले होते. अखेर पंतप्रधान मोदींनी स्वतः मध्यस्थी करत विद्यार्थ्यांच्या मागण्या रास्त असल्याचे सांगत दिलासा दिला.

Administrative Changes In NTA : एनटीएमध्ये मोठे प्रशासकीय फेरबदल

सरकार आणि 'कॉकरोच जनता पार्टी' (CJP) यांच्यात तीन फेऱ्यांच्या चर्चेनंतर अखेर तोडगा निघाला. 24 जुलै रोजी पंतप्रधान मोदींच्या सूचनेनुसार 'नॅशनल टेस्टिंग एजन्सी' (NTA) मध्ये मोठे प्रशासकीय फेरबदल करण्यात आले. शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर आता सीजेपीकडूनही आपले आंदोलन अधिकृतपणे मागे घेण्याची घोषणा करण्यात आली आहे.

Dharmendra Pradhan Statement : 'मी कधीही जबाबदारीपासून पळ काढला नाही'

राजीनाम्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर (X) पोस्ट करत लिहिले की, "मी पहिल्या दिवसापासून या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारली आहे आणि या परिस्थितीपासून कधीही तोंड लपवले नाही. गेल्या 10 दिवसांतील घटनाक्रम पाहून माझे मन अत्यंत दुखी झाले आहे. हा माझ्यासाठी वैयक्तिक प्रतिष्ठेचा विषय नाही. जंतर-मंतरवर आणि देशात निर्माण झालेल्या परिस्थितीचा देशविरोधी शक्तींनी गैरफायदा घेऊ नये आणि देशाची एकता अबाधित राहावी, म्हणूनच मी हा निर्णय घेतला आहे. आदरणीय पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली देशसेवेची संधी मिळाली, याबद्दल मी त्यांचा आभारी आहे."

ही बातमी वाचा:

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
Shiv Sena Symbol Case : राहुल नार्वेकरांचे सगळेच निर्णय चुकले, सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बलांचा धडाधड युक्तिवाद; आजच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
राहुल नार्वेकरांचे सगळेच निर्णय चुकले, सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बलांचा धडाधड युक्तिवाद; आजच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
Maharashtra Government Cabinet Decision: पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय
पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Embed widget