(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pimpri Chinchwad Bandh : राज्यपालांविरोधात आज पिंपरी चिंचवड बंद, संभाजीराजेंचाही बंद पाठिंबा
Pimpri Chinchwad Bandh Against Governor : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्याविरोधात आज पिंपरी चिंचवड बंद पुकारण्यात आला आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी बंदला पाठिंबा दर्शवला आहे
Pimpri Chinchwad Bandh Against Governor : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोशारी (Bhagat Singh Koshyari) यांच्याविरोधात आज पिंपरी चिंचवड बंद पुकारण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shivaji Maharaj) यांच्यासह महाराष्ट्रातील महापुरुषांचा राज्यपालांकडून वारंवार अवमान होत असल्याचा आरोप करत अनेक संस्था, संघटना तसेच राजकीय पक्षांनी हा बंद पुकारला आहे. आज सकाळी दहा वाजता आंदोलनाला सुरुवात होणार आहे. विविध राजकीय पक्ष, समविचारी संघटना आणि संस्थांनी या बंदला पाठिंबा दिला आहे.
संभाजीराजे यांचाही बंदला पाठिंबा, पिंपरीतील मंचावरुन काय बोलणार?
तर या बंदला संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी पाठिंबा दर्शवला आहे. दुपारी साडे बारा वाजता ते या बंदमध्ये सहभागी होणार आहेत. ते ज्या मंचावरुन संबोधित करणार आहेत, तो मंच सज्ज झाल आहे. संभाजीराजे या मंचावरुन काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष असून या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
राज्यपालांविरोधात राज्यभरात आंदोलनं
मागील काही दिवसांपासून पुण्यात राज्यपालांविरोधात अनेक निषेध आंदोलनं केली जात आहेत. त्यात अनेकांनी आक्रमक भूमिका घेतली होती. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, संभाजी ब्रिगेड, मराठा क्रांती मोर्चा आणि ठाकरे गट यांनी वेगवेगळ्या पद्धतीने निदर्शने करत निषेध नोंदवला होता. स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राज्यपालांना काळे झेंडे दाखवून निषेध केला होता. मात्र आता पुण्यातील सर्व पक्ष आणि संघटना एकत्र आले आहेत आणि त्यांनी बंदची हाक दिली आहे.
राज्यपालांना हटवण्याची मागणी
छत्रपती शिवाजी महारांबाबत भगतसिंह कोशारींनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यामुळे राज्यभरात वातावरण पेटलं आहे. राज्यात अनेक ठिकाणी आंदोलनं करण्यात आली. राज्यपालांना हटवा, अशी मागणी करण्यात आली मात्र अजूनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही आहे. त्यामुळे भाजपविरोधात देखील सगळे पक्ष आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे.
13 डिसेंबरला पुणे बंदची हाक
यासोबतच राज्यपालांविरोधात 13 डिसेंबरला पुणे बंदची हाक देण्याच आली आहे. पुण्यातील सर्व पक्षांनी आणि विविध संघटनांनी ही बंदची हाक दिली आहे. 13 डिसेंबरला राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, संभाजी ब्रिगेड, मराठा क्रांती मोर्चा आणि ठाकरे गट देखील या बंदमध्ये सहभागी होणार आहे.
मुंबईत देखील महामोर्चा
महाविकास आघाडीने देखील राज्यपाल कोश्यारी यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. महाविकास आघाडीने मुंबईत 17 डिसेंबरला महामोर्चाचं आयोजन केलं आहे. शिंदे-फडणवीस सरकारविरोधात मविआचे नेते रस्त्यावर उतरणार आहेत. राणीची बाग ते आझाद मैदान असा हा मोर्चा असणार आहे. महाविकास आघाडीच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. या सगळ्यावर आता शिंदे-फडणवीस सरकार राज्यापालांच्या बाबतीत कोणता निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
VIDEO : Pimpri Chinchwad Bandh : पिंपरी-चिंचवड शहर बंद, महापुरूषांचा वारंवार अवमान होत असल्यानं बंद
संबंधित बातमी