(Source: ECI/ABP News/ABP Majha)
एका वर्षात 78 वेळा वाढले पेट्रोलचे दर, आप खासदाराने विचारलेल्या प्रश्नाला केंद्र सरकारचे उत्तर
Raghav Chaddha Attack on Center: देशातील वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवरून आम आदमी पक्षाने (आप) केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.
Raghav Chadha Attack on Center: देशातील वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवरून आम आदमी पक्षाने (आप) केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांनी भाजपवर हल्लाबोल करताना म्हटले की, ''माझ्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्र सरकारने उत्तर दिले आहे की, 2021-22 या आर्थिक वर्षात केंद्र सरकारने पेट्रोलचे दर 78 वेळा आणि डिझेल 76 वेळा वाढवले आहेत. यांचा परिणाम इतर वस्तूंच्या किंमतीवर होत.''
राघव चढ्ढा म्हणाले की, केंद्र सरकार विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. सध्याच्या सरकारने अटल सरकारपासून धडा घ्यावा, असा सल्ला राघव चढ्ढा यांनी केंद्र सरकारला दिला. राघव चढ्ढा म्हणाले, 'जेव्हा अटल बिहारी वाजपेयी एनडीएचे पंतप्रधान होते, तेव्हा सत्ताधारी सरकारसह विरोधकांचाही तितकाच आदर केला जात होता.
राघव चढ्ढा यांच्या प्रश्नांना उत्तर देताना पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री रामेश्वर तेली म्हणाले, पेट्रोलच्या किमती 26-6-2010 आणि 19-10-2014 पासून बाजारात निश्चित केल्या गेल्या आहेत. तेव्हापासून केवळ सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्याच पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीबाबत योग्य निर्णय घेतात. 16 जून 2017 पासून, तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ विक्री किंमतीमध्ये दररोज सुधारणा लागू केली आहे.
उत्पादन शुल्कातून केंद्राने 16 लाख कोटी रुपये कमावले
आपचे राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी केंद्रावर हल्ला चढवत पुढे म्हणाले की, केंद्र सरकारने 2016 ते 2022 दरम्यान इंधनावर लावण्यात आलेल्या उत्पादन शुल्कातून 16 लाख कोटी रुपये कमावले आहेत. मात्र केंद्र सरकारला महागाईवर लक्ष द्यायचे नाही. एका वर्षात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे सामान्य माणूस खरेदी करणाऱ्या प्रत्येक वस्तूच्या किमतीत फरक पडतो, असे राघव चड्ढा म्हणाले.
इतर महत्वाची बातमी:
Law Linking Aadhaar Voter ID : काँग्रेस नेते रणदीप सुरजेवालांच्या आधार-मतदार ओळखपत्र लिंकिंग कायद्याविरोधातील याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार
Ex President Facilities : मोठं घर, लाखावर पेन्शन, सेवेला कर्मचारी आणि बरंच काही... निवृत्तीनंतर माजी राष्ट्रपतींना आयुष्यभर मिळतात या सुविधा