एक्स्प्लोर

Ex President Facilities : मोठं घर, लाखावर पेन्शन, सेवेला कर्मचारी आणि बरंच काही... निवृत्तीनंतर माजी राष्ट्रपतींना आयुष्यभर मिळतात या सुविधा

Ex President Facilities: निवृत्तीनंतर राष्ट्रपतींना अनेक सुविधा दिल्या जातात. रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांना देखील या सर्व सुविधा सरकारकडून देण्यात येणार आहेत. 

Ex President Facilities:  देशाचे विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपला. रामनाथ कोविंद यांच्याकडून आज राष्ट्रपतीपदाची सूत्र  द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांनी हाती घेतली.  राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांनी विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा पराभव करत मोठा विजय मिळवला. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासाठी निरोप समारंभ आयोजित केला होता. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा आज संसद भवनात निरोप देण्यात आला. निवृत्तीनंतर राष्ट्रपतींना अनेक सुविधा दिल्या जातात. रामनाथ कोविंद यांना देखील या सर्व सुविधा सरकारकडून देण्यात येणार आहेत. 
 
द्रौपदी मुर्मू यांची देशाच्या नव्या राष्ट्रपतीपदी निवड झाल्यानंतर रामनाथ कोविंद यांना राष्ट्रपती भवन (Rashtrapati Bhavan) सोडावे लागणार आहे. राष्ट्रपती पदावरून निवृत्त झाल्यानंतर रामनाथ कोविंद नवी दिल्लीतील 12 जनपथ येथील बंगल्यात शिफ्ट होतील. या बंगल्यात माजी केंद्रीय मंत्री दिवंगत रामविलास पासवान यांचे अनेक दशकं वास्तव्य होते. निवृत्त झाल्यानंतरही भारताच्या राष्ट्रपतींना चांगल्या सुविधा दिल्या जातात. लष्कराच्या तिन्ही दलाच्या सर्वोच्च कमांडर पदावरून निवृत्त झाल्यानंतर राष्ट्रपतींना अनेक भत्ते आणि सुविधा मिळतात. माजी राष्ट्रपतींना 8 खोल्यांचा सरकारी बंगला देण्यात येतो. यासोबतच माजी राष्ट्रपतींना भरघोस पेन्शनही मिळते.

माजी राष्ट्रपतींना कोणत्या सुविधा उपलब्ध?

राष्ट्रपतीपदावरून निवृत्त झाल्यानंतर माजी राष्ट्रपतींना दरमहा दीड लाख रुपये पेन्शन मिळते
त्यांच्या पत्नीला दरमहा 30 हजार रुपये दिले जातात.
कर्मचारी आणि कार्यालयासाठी 60,000 रुपये दिले जातात
माजी राष्ट्रपतींना किमान 8 खोल्या असलेला बंगला देण्यात येतो
माजी राष्ट्रपतींना 2 लँडलाईन, एक मोबाईल फोन आणि इंटरनेट कनेक्शन दिलं जातं
माजी राष्ट्रपतींना मोफत वीज आणि पाण्याची सुविधा
माजी राष्ट्रपतींना वाहन आणि चालकही दिले जातात
मोफत वैद्यकीय सुविधाही दिली जाते
माजी राष्ट्रपतींसाठी पाच कर्मचारीही उपलब्ध करुन दिले जातात
दिल्ली पोलिसांची सुरक्षा देण्यात येते
माजी राष्ट्रपतींना एका व्यक्तीसह प्रथम श्रेणीत मोफत ट्रेन आणि विमान प्रवासाची सुविधा दिली जाते.

इतर महत्वाच्या बातम्या

President Droupadi Murmu : मी द्रौपदी मुर्मू... देशाच्या 15व्या राष्ट्रपतींनी घेतली पद आणि गोपनियतेची शपथ

President Oath Ceremony : भारताच्या राष्ट्रपतींचा शपथविधी 25 जुलैलाच का होतो? 'हे' आहे कारण

Droupadi Murmu : 'सबका प्रयास, सबका कर्तव्य' या मार्गावर वाटचाल करावी लागणार; द्रौपदी मुर्मूंच्या भाषणातील 10 महत्वाचे मुद्दे

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा

व्हिडीओ

Seher Shaikh MIM : मुंब्रा पूर्णपणे हिरवा करू, विरोधकांच्या अहंकाराला मातीमोल केलंय- सहर शेख
Kishor Jorgewar Chandrapur : काँग्रेसच्या दोन नेत्यांमध्ये नगरसेवकांची पळवा पळवीची स्पर्धा सुरू
Thane Mayor Office : ठाण्यात २०२२ नंतर पहिल्यांदाच महापालिकेतील महापौर दालन उघडलं
Samdhan Sarvankar on BJP BMC Election : भाजप नव्हे, त्यांच्या टोळीने माझा पराभव केला : समाधान सरवणकर
Vijay Ubale AIMIM : एमआयएम मधून हिंदू उमेदवार म्हणून निवडून आल्याच्या चर्चा, विजय उबाळे EXCLUSIVE

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
NCP : शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
निवडणूक आयोगाच्या कार्यालताच घुसले, ईव्हीएमविरोधात घोषणबाजी; पोलिसांनी 4 जणांना घेतलं ताब्यात
निवडणूक आयोगाच्या कार्यालताच घुसले, ईव्हीएमविरोधात घोषणबाजी; पोलिसांनी 4 जणांना घेतलं ताब्यात
सह्याद्रीतला अंधार संपला!महाराष्ट्रातील किल्ले आणि आदिवासी गावे सौर ऊर्जेने उजळली
सह्याद्रीतला अंधार संपला!महाराष्ट्रातील किल्ले आणि आदिवासी गावे सौर ऊर्जेने उजळली
Embed widget