(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राष्ट्रध्वजावर भाजपचे चिन्ह आणि नाव, काँग्रेसची तक्रार घेण्यास पोलिसांनी दिला नकार
Parbhani: भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पुर्ण होत असल्याने देशभरात सर्वत्र अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. याच निमित्त केंद्र सरकारकडून घरा घरावर तिरंगा लावण्याचे आवाहन करत 'हर घर तिरंगा, घर घर तिरंगा' हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
Parbhani: भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पुर्ण होत असल्याने देशभरात सर्वत्र अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. याच निमित्त केंद्र सरकारकडून घरा घरावर तिरंगा लावण्याचे आवाहन करत 'हर घर तिरंगा, घर घर तिरंगा' (Har Ghar Tiranga) हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत प्रशासनाकडून राष्ट्रध्वज दिले जात आहेत. परभणीच्या सोनपेठमध्ये मात्र याच राष्ट्रध्वजावर चक्क भाजपचे चिन्हे आढळले असून राष्ट्रध्वजा मधील अशोक चक्राची जागा ही बदलली गेली असल्याने काँग्रेस कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी हे राष्ट्रध्वज ताब्यात घेऊन पोलिसात तक्रार दिली, मात्र पोलिसांनी त्यांची तक्रार घेण्यास नकार दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोनपेठ पंचायत समितीच्या वतीने डेमो हाऊस समोर आज हर घर तिरंगा या उपक्रमा अंतर्गत ग्राम पंचायतींना हे झेंडे वाटप केले जात होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते, काँग्रेसचे पदाधिकारी ही तेथे उपस्थित होते. यातील जग्ग्नाथ कोलते युवक काँग्रेस उपाध्यक्ष यांना झेंडे वाटपातील एका गठ्यात राष्ट्रध्वजावर भाजपचे चिन्ह आणि नाव दिसले. यावेळी त्यांनी तो गठ्ठा ताब्यात घेतला आणि दुसरे गठ्ठे पाहिले तर दुसऱ्या गठ्यात अशोक चक्रे मध्यभागी नसून इतर ठिकाणी असल्याचे त्यांना दिसले. तसेच झेंड्याचा कलरही बदललेला दिसला. त्यामुळे संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी बीडीओ यांना बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी तिथून पळ काढला.
या नंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी तहसीलदार सारंग चव्हाण यांना ही बाब सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी यावर बोलण्यास नकार दिल्याने काँग्रेसचे सर्व पदाधिकारी सोनपेठ पोलीस स्टेशनला गेले आणि तिथे पोलीस अधिकारी संदीप बोरकर यांच्याकडे तक्रार दिली. मात्र त्यांनी ही जिल्हाधिकारी यांना संवाद साधावा मला वरिष्ठांकडून आदेश आल्यावर आम्ही गुन्हा दाखल करू, असे सांगितले. त्यामुळे आता हे सर्व पदाधिकारी परभणीकडे निघाले असून काँग्रेसचे आमदार सुरेश वरपूडकर यांच्यासह ते जिल्हाधिकारी यांना भेटणार आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या:
- Har Ghar Tiranga Pune: राष्ट्रध्वजाचा अपमान होणारे झेंडे आम्हाला नको; 5 लाखांपैकी 4 लाख झेंडे पुणे पालिकेने केंद्रात परत पाठवले
- Shivsena : विधानसभेच्या कामकाज सल्लागार समितीवर सुनिल प्रभू, अजय चौधरींची निवड करा: शिवसेनेचे अध्यक्षांना पत्र
- काळे कपडे घालून काळी जादू केली तरीही लोक विश्वास ठेवणार नाहीत, मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल