मोठी बातमी : पंकजा मुंडे पुन्हा म्हणाल्या, सुरेश धस यांना समज द्या, कारणही सांगितलं
Suresh Dhas & Pankaja Munde: पक्षाच्या भूमिकेला ठेच पोहोचू नये म्हणून मी गेले चार-पाच महिने नागपूर अधिवेशनापासून गप्प बसले. पंकजा मुंडेंनी सुरेश धसांविषयी नाराजी व्यक्त केली.

मुंबई: सुरेश धस हे ज्या विषयाच माझा संबंध नाही, त्यामध्ये सातत्याने माझा उल्लेख करतात. त्यांनी माझ्याविषयी कुठलीही वैयक्तिक टिप्पणी करणे अपेक्षित नाही. पण त्यांनी ते केले. त्यामुळे मी पक्षश्रेष्ठींकडे त्यांना समज देण्याविषयी विनंती केली होती. मात्र, प्रसारमाध्यमांनी 'सुरेश धसांना समज द्या', अशा मथळ्याने बातम्या छापल्या. पण मी प्रत्यक्षात पक्षश्रेष्ठींना विनंती केली होती, असे भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी स्पष्ट केले. त्या बुधवारी विधिमंडळाच्या आवारात प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.
यावेळी त्यांनी सुरेश धस यांच्याविषयी अप्रत्यक्षपणे का होईना, पण नाराजीचा सूर बोलून दाखवला. सुरेश धस (Suresh Dhas) माझं नाव घेऊन ज्या चर्चा करतात, त्याबाबत मी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना कळवले आहे. ज्या विषयात माझा संबंध नाही, त्यामध्ये माझा उल्लेख करणं, कुठलीही टिप्पणी करणं वैयक्तिक अपेक्षित नाही, ती त्यांनी करु नये. पक्षाच्या भूमिकेला ठेच पोहोचू नये म्हणून मी गेले चार-पाच महिने नागपूर अधिवेशनापासून गप्प बसले. पण आता मी पक्षश्रेष्ठींकडे सुरेश धस यांना समज देण्याची विनंती केली, असे पंकजा मुंडे यांना सांगितले.
मी प्रचार केला नसता तर सुरेश धस 75 हजारांच्या लीडने निवडून आले असते का? पंकजा मुंडेंचा सवाल
मी विधानसभा निवडणुकीत सुरेश धस यांचा प्रचार केला किंवा नाही, हे रेकॉर्ड तपासून पाहा. विधानसभेला राज्यात अनेक ठिकाणी भाजपशी संबंधित लोक अपक्ष उभे राहिले होते. मी व्यासपीठावर जाऊन सुरेश धस यांना मतदान करण्याची विनंती केली होती. सुरेश धस यांना आक्षेप होता तर त्यांची प्रचार सुरु असताना माझ्यावर आरोप करायला पाहिजे होता. पण प्रत्यक्ष प्रचारात सुरेश धस यांनी माझ्याशिवाय कोणाचंही नाव घेतलं नाही. सुरेश धस हे 75 हजार मतांनी निवडून आले, हे शक्य झालं असतं का? याउलट मला लोकसभेला गेल्यावेळी जितकी लीड होती, ती अर्धी झाली. अनेक लोकांनी मला मदत केली नाही. पण मी तो विषय मागे सोडला. कारण जाहीरपणे याबाबत बोलणे पक्षाच्या शिस्तीला धरुन नाही. 23 नोव्हेंबरला निकाल लागल्यापासून मी याबाबत बोलणे टाळत होते, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले.
आणखी वाचा
सतीश भोसले उर्फ खोक्याला अटक होताच सुरेश धस लगेच कॅमेऱ्यांसमोर आले अन् म्हणाले....























