Pankaja Munde: मनोज जरांगे पाटील यांचा निवडणुकीवर परिणाम झाला किंवा नाही हे उद्या सांगेन : पंकजा मुंडे
तुम्हाला पराभव सुद्धा स्वीकारता आला पाहिजे. मी कर्म चांगले केले आहेत त्यामुळे मला फळाची चिंता नाही मी कोणतेही अभद्र कर्म केलेले नाहीत, असे वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केले आहे.
बीड : माझाही पाच वर्षांपूर्वी पराभव झाला होता मात्र तो हसतमुखाने मी स्वीकारला होता. आदळ आपट करून काय साध्य करणार आहात, असा सवाल महायुतीच्या भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी महाविकास आघाडीचे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे उमेदवार बजरंग सोनावणे (Bajranag Sonawane) यांना केला आहे. त्या एबीपी माझाशी बोलत होत्या. तसेच मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांचा निवडणुकीवर परिणाम झाला किंवा नाही हे उद्या सांगेन असेही त्या म्हणाल्या.
निवडणुकीवर मनोज जरांगे पाटील यांचा परिणाम झाला का या प्रश्नाला उत्तर देताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, लोकशाही मधील या निवडणुकीवरती प्रत्येक घटकाचा परिणाम होतो आता मनोज जरांगे पाटील यांचा परिणाम झाला किंवा नाही याबद्दल मी तुम्हाला उद्या सांगेल . संघर्ष माझ्या कायम वाटायला येतो कारण माझ्या जीवनाचा प्रवास कसा असावा एवढ्या संघर्षातही आपली वैचारिक पातळी आम्ही गळू दिली नाही हे मुंडे साहेबांचे संस्कार आहेत. जितना बडा संघर्ष होगा जीत उतनी ही बडी होगी...
पराभव सुद्धा स्वीकारता आला पाहिजे : पंकजा मुंडे
बीड लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानापासून अगदी मतमोजणी प्रक्रियेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी प्रशासनाच्या विरोधामध्ये तक्रारी केल्या होत्या. अगदी बीडच्या जिल्हाधिकारी या मतमोजणी प्रक्रियेत नको असा आरोप केला होता यावर बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, केवळ विशिष्ट एका जातीचे आहेत म्हणून कोणावरती असे आरोप करणं हे योग्य नाही आणि इतकी आदळआपट करणं बरोबर नाही. तुम्हाला पराभव सुद्धा स्वीकारता आला पाहिजे. मी कर्म चांगले केले आहेत त्यामुळे मला फळाची चिंता नाही मी कोणतेही अभद्र कर्म केलेले नाहीत.
मी कोणतेही अभद्र कर्म केलेले नाही : पंकजा मुंडे
पंकजा मुंडे म्हणाले, मला निकालाची धाकधुक वाटली नाही. कारण मी या काळाच व्यस्त होते. मुळात आपल्या संस्कृतीत सांगितले आहे की, कर्म करा. फळाची चिंता करु नका. कर्म योग्य पद्धतीने करा. मी कोणतेही अभद्र कर्म केलेले नाही. मी कर्म करताना ज्या विचारांसाठी मी बांधले आहे, ज्या विचारांसाठी मी राजकरणात आले, त्या विचारांशी प्रामाणीक राहून माझ्या राजकरणातील 22-23 वर्षात मी कधीही कोणाविषयी वर्गाविषयी, विचाराविषयी, व्यक्तीविषयी कधीही असन्मानजनक वक्तव्य गेले नाही. त्याला मला अभिमान आहे.