एक्स्प्लोर

Palghar Politics : पालघर जिल्हा परिषदेत सत्तापरिवर्तन, बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप युतीचं सरकार

Palghar Politics : बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप यांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन केली आहे. बाळासाहेबांची शिवसेना गटाचे प्रकाश निकम अध्यक्षपदी तर भाजपचे पंकज कोरे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे.

Palghar Politics : पालघर (Palghar) जिल्हा परिषदेत (Zilla Parishad) सत्तापरिवर्तन होऊन आता बाळासाहेबांची शिवसेना (Balasahebanchi Shiv Sena) आणि भाजप (BJP) यांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन केली आहे. तर महाविकास आघाडीची सत्ता गेली आहे. बाळासाहेबांची शिवसेना गटाचे प्रकाश निकम अध्यक्षपदी तर भाजपचे पंकज कोरे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून शिंदे गटाला महाराष्ट्रात पहिला जिल्हा परिषद अध्यक्ष मिळाला आहे. 

झेडपीतल्या 20 सदस्यांचा शिंदे गटाला पाठिंबा
पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक आज पार पडली. या निवडणुकीसाठी सकाळी अकरा वाजता अर्ज दाखल करण्यात आले. तर दुपारी तीनच्या सुमारास निकाल जाहीर झाला. पालघर जिल्हा परिषद महाविकास आघाडीच्या हाती होती. जुन्या शिवसेनेचे सर्वच्या सर्व 20 सदस्य शिंदे गटात सामील झाल्यामुळे पालघर जिल्हा परिषदेमध्ये उद्धव गटाचा एकही सदस्य उरलेला नाही. परिणामी बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपची एकत्र आल्याने पालघर जिल्हा परिषदेत सत्ता परिवर्तन झालं. या निवडणुकीसाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि पालघरचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि बाळासाहेबांची शिवसेना संपर्क प्रमुख आमदार रवींद्र फाटक आज पालघरमध्ये ठाण मांडून होते.

अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची बिनविरोध निवड
57 सदस्य असलेल्या पालघर जिल्हा परिषदेमध्ये 29 हा बहुमताचा आकडा आहे. झेपीमध्ये शिंदे गटाचे 20 आणि भाजपचे 13 असे 33 सदस्य आहेत. त्यांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन केली आहे. दरम्यान बहुमत नसल्याने महाविकास आघाडीकडून एकही अर्ज दाखल करण्यात आलेला नाही. त्यामुळे निवडणूक बिनविरोध झाली आहे. निवडणुकीनंतर शिंदे गट आणि भाजपच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. 

जिल्हा परिषदमधील राजकीय बलाबल

शिवसेना (शिंदे गट) - 20 
भाजप -  13
राष्ट्रवादी काँग्रेस - 13 
माकप - 6 
बविआ - 5

पालघर झेडपीमधील सदस्यांसह जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण यांचा शिंदे गटात प्रवेश
पालघर जिल्हा परिषदेतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सदस्य आणि पालघर जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून वसंत चव्हाण यांची बोईसर आणि विक्रमगड विधानसभा क्षेत्र आणि पालघर जिल्हाप्रमुखपदी पुनर्नियुक्ती करण्यात आली. या निर्णयामुळे उद्धव ठाकरे यांच्या गटाला पालघर जिल्ह्यात मोठा फटका बसला आहे. पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचे सदस्यांनीही वसंत चव्हाण यांच्यासह बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केल्याने शिंदे यांचही जिल्ह्यातील बळ अधिक वाढलं आहे. या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमावेळी आमदार आणि पालघर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख रवींद्र फाटक, जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे, माजी नगरसेवक राम रेपाळे आणि पालघर जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Jalgaon train Accident आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेतील अन् योजना बंद करुन टाकतील : आदित्य ठाकरे
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेत योजना बंद होईल; आदित्य ठाकरेंचा घणाघात 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jalgaon Train Accident | पुष्पक एक्सप्रेसला आग, उड्या मारल्या, बंगळुरू एक्सप्रेसने अनेकांना चिरडलंJalgaon Train Accidentआग लागल्याच्या भीतीने चालत्या गाडीतून उड्या मारल्या,बंगळुरु एक्प्रेसने चिरडलेGulabRao Patil on Jalgaon Train Accident|जळगावमध्ये मोठा रेल्वे अपघात, गुलाबराव पाटलांची प्रतिक्रियाJalgaon Train Accident | बंगळुरू एक्सप्रेसची प्रवाशांना धडक,  जळगावात रेल्वेची मोठी दुर्घटना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Jalgaon train Accident आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेतील अन् योजना बंद करुन टाकतील : आदित्य ठाकरे
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेत योजना बंद होईल; आदित्य ठाकरेंचा घणाघात 
Eknath Shinde: एकनाथ शिंदे 20 वर्षात 9 वेळा नाराज, पोहोचले दरेगावात; 2005 मध्ये पहिल्यांदा मनधरणी
एकनाथ शिंदे 20 वर्षात 9 वेळा नाराज, पोहोचले दरेगावात; शिवसेनेत 2005 मध्ये पहिल्यांदा मनधरणी
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
UPSC CSE Exam 2025 : यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
Sharad Pawar: पुण्यात दूर्मीळ GBS रोगाचे संकट;  शरद पवारांकडून राज्य सरकारला सूचना, दाहकता लक्षात घ्या
पुण्यात दूर्मीळ GBS रोगाचे संकट; शरद पवारांकडून राज्य सरकारला सूचना, दाहकता लक्षात घ्या
Embed widget