एक्स्प्लोर

जुन्या पेन्शनवरुन दीपक केसरकरांसमोरच कर्मचाऱ्याचा गोंधळ; व्हिडिओ आला समोर

येथील कार्यक्रमात पुढे बोलताना दीपक केसरकर म्हणाले की, कमी अनुदान असणाऱ्या शिक्षकांना देखील मदत करण्यासाठी समिती नेमली आहे

अहमदनगर : उशिरा आल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, मी इथून संभाजीनगर ला जाणार असल्याचे सांगत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी शिर्डी येथील जुनी पेन्शन मेळाव्यात भाषणाला सुरुवात केली. राज्यातील जुनी पेन्शन संघटनेच्या पदाधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मेळाव्याचे शिर्डी येथे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला मंत्री दीपक केसरकर यांनी हजेरी लावली. यावेळी बोलताना जुनी पेन्शन योजना (Old Pension Yojana) आणि नवी पेन्शन योजनेबाबत भाष्य केले. तसेच,  आतापर्यंत तुमच्या अडचणी दूर करण्याचं काम एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनीच केलं आहे. शालेय शिक्षण सेवकांना आपण लाभ दिला असल्याचे त्यांनी म्हटले. दरम्यान, दीपक केसरकर यांचे भाषण सुरू असताना काही उपस्थितांनी मध्येच उभे राहून गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तसेच, जुनी पेन्शनची मागणी करत कार्यक्रमातून काढता पाय घेतला. 

येथील कार्यक्रमात पुढे बोलताना दीपक केसरकर म्हणाले की, कमी अनुदान असणाऱ्या शिक्षकांना देखील मदत करण्यासाठी समिती नेमली आहे. त्याचा अहवाल दोन दिवसात प्राप्त होईल.पगाराच्या रकमेपेक्षा खर्च जास्त असल्याने यातून मार्ग काढू. केंद्र सरकार ने जाहीर केलेली पेन्शन योजना सर्वांना माहीत आहे. मात्र,याबाबत सम्रभ पसरविला जातोय. काही लोक इथे भाषण करून गेले असतील, ते सत्तेत असताना काही देऊ शकले नाहीत. मात्र, एकनाथ शिंदे यांना जबाबदारी समजते. एक सामान्य रिक्षावाला या पदावर बसला आहे, असे म्हणत नाव न घेता शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर केसरकरांनी हल्लाबोल केला. 

जुनी पेन्शन आणि नवीन पेन्शन योजना बाबत चर्चा करून आपण मार्ग काढू .काही राज्यात जुनी पेन्शन देतो बोलले. मात्र, त्यांनी तुमच्याच पैशातून ती योजना राबवली. त्यामुळे, आपण सर्व एकत्र बसून यात सुधारणा करू, राज्य चालविण्यासाठी काही नियम पाळावे लागतात. बोजा मान्य केला तर तो दिला पाहिजे. जे आज बोलून गेले त्यांनी तुम्हाला काही दिलं नाही. ते सुद्धा सत्तेत होतेच ना. तुमचं शिष्टमंडळ घेऊन या, आपण चर्चा करून मार्ग काढू. शिक्षकांच्या टप्पा अनुदानाबाबत देखील लवकरच जी.आर. काढणार आहोत. यासाठी मी अकराशे कोटींचे पॅकेज मिळण्याची मागणी केल्याचं दीपक केसरकर यांनी मेळाव्यात बोलताना सांगितले. 

कार्यक्रम संपल्यानंतरही कर्मचाऱ्यांचा गोंधळ

केसरकर यांचे भाषण संपल्यानंतर शिष्टमंडळ स्टेजवर चर्चा करत असताना खाली बसलेल्या कर्मचाऱ्याने घोषणाबाजी केली. घोषणा करून देखील पेन्शन मिळत नसल्याने निषेध व्यक्त करत कर्मचाऱ्याने पेन्शन लागू करण्याची मागणी केलीय. 2005 पूर्वी असलेल्या अनेकांना पेन्शन लागू केलेली नाही... ती लागू केलीच पाहिजे. केवळ जाहिरात काढली गेली मात्र पेन्शन मिळाली नाही, असा आरोप कर्मचारी करत होता, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियातून समोर आला आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lebanon Blast : लेबनॉनमध्ये पेजरनंतर वॉकी टॉकीचा स्फोट, तिघांचा मृत्यू, 100 हून अधिक जखमी, राजधानी हादरली
लेबनॉन पुन्हा हादरलं, पेजरनंतर वॉकी टॉकीचा स्फोट, 100 हून अधिक जखमी तर...
Pune Crime : बिहारमधील सरकारी शिक्षक पुण्यात आला, पत्नीच्या प्रियकराचा गळा चिरला; पत्नीचाही काटा काढायला रेल्वेनं निघाला अन्!
बिहारमधील सरकारी शिक्षक पुण्यात आला, पत्नीच्या प्रियकराचा गळा चिरला; पत्नीचाही काटा काढायला रेल्वेनं निघाला अन्!
क्रिकेटप्रेमींचा होणार हिरमोड? IND vs BAN च्या पहिल्या कसोटी सामन्यावर मान्सूनच्या घिरट्या, अहवाल सांगतो..
क्रिकेटप्रेमींचा होणार हिरमोड? IND vs BAN च्या पहिल्या कसोटी सामन्यावर मान्सूनच्या घिरट्या, अहवाल सांगतो..
Rain Update: राज्यात पाऊस पुन्हा ॲक्टीव मोडवर, पुढील 48 तासांनंतर या जिल्ह्यांना धुंवाधार पावसाचा इशारा
राज्यात पाऊस पुन्हा ॲक्टीव मोडवर, पुढील 48 तासांनंतर या जिल्ह्यांना धुंवाधार पावसाचा इशारा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amol Mitkari on Jai Malokar : जय मालोकर प्रकरणात मोठा ट्वीस्ट,  अमोल मिटकरींची पहिली प्रतिक्रियाLebanon Pager Blast Special Report : हल्ला डेंजर, फुटले पेजर...लेबनॉनमध्ये काय घडलं?Pune Ganesh Visarjan Special Report : 29 तासांच्या विसर्जन मिरवणुका, पुण्यातील रस्ते दोन दिवस ठप्पABP Majha Headlines : 10 PM : 18 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lebanon Blast : लेबनॉनमध्ये पेजरनंतर वॉकी टॉकीचा स्फोट, तिघांचा मृत्यू, 100 हून अधिक जखमी, राजधानी हादरली
लेबनॉन पुन्हा हादरलं, पेजरनंतर वॉकी टॉकीचा स्फोट, 100 हून अधिक जखमी तर...
Pune Crime : बिहारमधील सरकारी शिक्षक पुण्यात आला, पत्नीच्या प्रियकराचा गळा चिरला; पत्नीचाही काटा काढायला रेल्वेनं निघाला अन्!
बिहारमधील सरकारी शिक्षक पुण्यात आला, पत्नीच्या प्रियकराचा गळा चिरला; पत्नीचाही काटा काढायला रेल्वेनं निघाला अन्!
क्रिकेटप्रेमींचा होणार हिरमोड? IND vs BAN च्या पहिल्या कसोटी सामन्यावर मान्सूनच्या घिरट्या, अहवाल सांगतो..
क्रिकेटप्रेमींचा होणार हिरमोड? IND vs BAN च्या पहिल्या कसोटी सामन्यावर मान्सूनच्या घिरट्या, अहवाल सांगतो..
Rain Update: राज्यात पाऊस पुन्हा ॲक्टीव मोडवर, पुढील 48 तासांनंतर या जिल्ह्यांना धुंवाधार पावसाचा इशारा
राज्यात पाऊस पुन्हा ॲक्टीव मोडवर, पुढील 48 तासांनंतर या जिल्ह्यांना धुंवाधार पावसाचा इशारा
Kolkata Doctor Rape and Murder Case : डॉक्टरांचा संप मिटवण्यास नकार; ममता बॅनर्जींसोबत पुन्हा भेटीची मागणी
कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरण : डॉक्टरांचा संप मिटवण्यास नकार; ममता बॅनर्जींसोबत पुन्हा भेटीची मागणी
MNS Activist Jay Malokar Death Case : अकोलातील मनसे कार्यकर्ते जय मालोकार यांच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण; शवविच्छेदन अहवालात धक्कादायक बाबी समोर
अकोलातील मनसे कार्यकर्ते जय मालोकार यांच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण; शवविच्छेदन अहवालात धक्कादायक बाबी समोर
Nashik Crime : बायको आणि 9 वर्षांच्या मुलीसह विजयची आत्महत्या, नाशिकच्या बॉश कंपनीवर कुटुंबीयांचा आरोप
बायको आणि 9 वर्षांच्या मुलीसह विजयची आत्महत्या, नाशिकच्या बॉश कंपनीवर कुटुंबीयांचा आरोप
Men's Menopose: महिलांप्रमाणे पुरुषांनाही येतो मेनोपॉज, त्याला मेनोपॉज नाही 'हे' आहे नाव, जाणून घ्या लक्षणं
महिलांप्रमाणे पुरुषांनाही येतो मेनोपॉज, त्याला मेनोपॉज नाही 'हे' आहे नाव, जाणून घ्या लक्षणं
Embed widget