![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Nilesh Rane-Devendra Fadnavis: निलेश राणे सभागृहात आक्रमक, देवेंद्र फडणवीसांनी एका मिनिटांत शांत केलं, म्हणाले, त्यांना माहिती नसेल की...
Maharashtra Assembly Nagpur Winter Session: आज विधानसभा सभागृहात नेमकं काय घडलं?, जाणून घ्या...
![Nilesh Rane-Devendra Fadnavis: निलेश राणे सभागृहात आक्रमक, देवेंद्र फडणवीसांनी एका मिनिटांत शांत केलं, म्हणाले, त्यांना माहिती नसेल की... Nilesh Rane raised a question about the fishermen of Kudal assembly constituency and CM Devendra Fadnavis Answer Maharashtra Assembly Nagpur Winter Session Video Nilesh Rane-Devendra Fadnavis: निलेश राणे सभागृहात आक्रमक, देवेंद्र फडणवीसांनी एका मिनिटांत शांत केलं, म्हणाले, त्यांना माहिती नसेल की...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/17/ecfea1533f1d4a73664c7571b3cb463d1734424558007987_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Nilesh Rane-Devendra Fadnavis: नागपुरात हिवाळी अधिवेशन (Maharashtra Assembly Nagpur Winter Session) सुरु आहे. आज अधिवेशनाचा दुसरा दिवस असून विरोधकांनी परभणी आणि बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरुन आक्रमक भूमिका घेतली. तर दुसरीकडे सत्ताधारी आमदारांनी सभागृहात त्यांच्या मतदारसंघातील विविध प्रश्न मांडत चर्चा केली. शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी देखील कुडाळ विधानसभा मतदारसंघातील मच्छिमारांचा प्रश्न मांडला. यावेळी प्रश्न मांडून आक्रमक झालेल्या निलेश राणेंना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी थोडं शांत केल्याचं पाहायला मिळालं. आज विधानसभा सभागृहात नेमकं काय घडलं?, जाणून घ्या...
सभागृहात नेमकं काय घडलं?
माझ्या मतदारसंघात मच्छिमारांचा एक महत्वाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. अनेक वर्षांपासून हा प्रश्न त्यांना भेडसावत आहे. कर्नाटकातून आणि आंध्रप्रदेशातून ट्रॉलर मोठ्या प्रमाणात मच्छिमारांचं नुकसान करत आहे. त्यामुळे मच्छिमारांनी जगावं कसं हा प्रश्न निर्माणा झाला आहे. मासेमारी करणारे नागरीक सुरक्षित नाही. समुद्राची सुरक्षा वाऱ्यावर आहे. गस्त घातली जात नाहीय. मुंबईत दहशतवादी कसाब देखील अशाच पद्धतीने आला होता. त्यामुळे यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन मिनिटं बोलावं, अशी मागणी निलेश राणे यांनी सभागृहात केली. यानंतर विधानसभा अध्यक्षांनी याची नोंद घेतली जाईल, असं म्हटलं. यावर निलेश राणेंनी पुन्हा सभागृहात उभं राहून देवेंद्र फडणवीसांनी यावर बोलावं, असं म्हणाले. यानंतर देवेंद्र फडणवीसांनी मच्छिमारांच्या प्रश्नावर आक्रमक झालेल्या निलेश राणेंना शांत केलं. निलेश राणे हे संसदेतून विधानसभेत आले आहेत. त्यामुळे त्यांना माहीती नसेल की अशा प्रश्नांवर लगेच उत्तरं दिली जात नाही. याची दखल घेऊन कारवाई केली जाते, असं देवेंद्र फडणीसांनी सांगितले.
उद्धव ठाकरे नागपुरात, पत्रकार परिषद घेत काय म्हणाले?
माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज राज्याच्या हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात हजेरी लावली. उद्धव ठाकरे यांनी आज विधानपरिषद सभागृहात उपस्थिती लावली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध मुद्द्यावरुन सरकारवर हल्लाबोल केला. नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू. याआधी आपण घटनाबाह्य सरकार पाहिले, त्यानंतर जो निकाल आला तो अनाकलनीय होता, याला ईव्हीएम सरकार बोलतात. या सरकारकडून जनतेला काही अपेक्षा आहेत. विजयाचा आनंद कुठे दिसला नाही.मंत्रिमंडळ विस्तार झालं मात्र वजाबाकीची चर्चा अधिक आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
पहिल्यांदा अनेक आरोप असलेल्यांचा परिचय मुख्यमंत्र्यांना करून द्यावा लागला- उद्धव ठाकरे
नाराजांचे बार अधिक मोठ्याने वाजत आहेत. प्रथा असते मुख्यमंत्री मंत्र्यांची ओळख करून देतात. पहिल्यांदा अनेक आरोप असलेल्यांचा परिचय मुख्यमंत्री यांना करून द्यावा लागला. माननीय मुख्यमंत्री यांनी शाश्वत धर्म, हा कोणता धर्म आहे हे तेच सांगू शकतील. आम्हाला सरकार स्थापन करता आले नाही, त्यांना स्थापन करता आले. या सरकारची योजना होती लाडकी बहीण, आता लाडके आमदार आणि नाराज आमदार यांची चर्चा सुरू आहे. आता निवडणूक झाली आचारसंहिता संपली आता ही योजना तत्काळ सुरू करण्यात यावी. 1500 नाही तर 2100 रुपये देतो म्हणून सांगितलं. पण आता निकष लावले जात आहेत. पण लाडकी, आवडती नावडती न करता सर्वांना दिले पाहिजे. आधी निकष लावले नव्हते मग आता का लावताय, लाडक्या बहिणींना सरसकट पैसे दिले पाहिजेत.
आक्रमक निलेश राणेंना देवेंद्र फडणवीसांनी एका मिनिटांत शांत केलं, VIDEO:
संबंधित बातमी:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)