एक्स्प्लोर

मला खूप ट्रोलिंग होईल मात्र बोलणं गरजेच; विधानपरिषदेतील निवृत्तीच्या भाषणावरुन निलम गोऱ्हेंची ठाकरेंवर जोरदार टीका

उद्धव ठाकरेंनी कवितांच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना चिमटे काढले. आता, उद्धव ठाकरेंच्य कवितापर भाषणवरुन निलम गोऱ्हेंनी पलटवार केला आहे. 

मुंबई: विधिमंडळाच्या अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस असून विधानपरिषदेतील 9 आमदारांचं हे शेवटचं अधिवेशन होतं. त्यामुळे, या 9 आमदारांच्या कार्यावर प्रकाश टाकत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्‍यांनी त्यांच्या कामाचं कौतुक करत त्यांना निरोप दिला. विशेष म्हणजे, निवृत्त होणाऱ्या विधानपरिषद सदस्यांमध्ये शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचाही (Uddhav Thackeray) समावेश होता. तसेच, नीलम गोऱ्हे, अमोल मिटकरी, शशिकांत शिंदे, रणजितसिंह मोहिते पाटील, संजय केनेकर यांच्यासह नऊ सदस्य मे महिन्यात निवृत्त होत आहेत. त्यामुळे, सभागृहात काहीसं भावनिक वातावरण होतं. यावेळी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंसमवेतच्या आठवणींना उजाळा दिला. तर, उद्धव ठाकरे साहेब म्हणत एकनाथ शिंदेंनीही शुभेच्छा दिल्या. त्यावर, बोलताना उद्धव ठाकरेंनी कवितांच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना चिमटे काढले. आता, उद्धव ठाकरेंच्य कवितापर भाषणवरुन निलम गोऱ्हेंनी (Neelam gorhe) पलटवार केला आहे. 

साजीश की सौगात पहनकर बैठ गए
जिनको मेरा हाथ पकडकर बैठना था 
हैरत है की वो बात पकडकर बैठ गए !

अशी शायरी देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंसाठी म्हटली होती, तसेच उद्धव ठाकरेंचा पिंड राजकारणाचा नसून ते उत्तर कलाकार, फोटोग्राफर असल्याचेही त्यांनी म्हटलं होतं. त्यावर, माझा पिंड हा राजकारणाचा नाही, माझा मूळ स्वभाव कलाकाराचा आहे. एवढं उत्तम वर्णन केल्यानंतर, एवढं तुम्ही जवळून ओळखता म्हणल्यानंतर ऐसी कौनसी बात थी और किसका हात पकडना पडा, असा सवाल उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात केला. तसेच, उद्धवा अजब तुझे सरकार.. असे म्हणत कवितेच्या माध्यमातून फडणवीसांसह शिंदे गटालाही लक्ष्य केलं. आता, शिंदे गटाकडून निलम गोऱ्हेंनी उद्धव ठाकरेंवर पटलवार केला आहे. 

उद्धव ठाकरे यांनी कविता वाचून दाखवली, ती कविता ही त्यांच्या बाबतचीच होती. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, त्यामुळे आम्हाला बरं वाटलं. पण शेवटच्या 1 वर्षात आमचा भ्रमनिरास झाला. हे वर्ष-वर्ष कुणाला भेटत नव्हते, तिथ गेलं की लक्षात यायचं की यांना आम्ही नको आहोत. आम्ही जेव्हा जेव्हा भेटायला जायचं तेव्हा आपण नकोसे आहोत अशी खात्री पटायची, कोव्हीड मध्ये आठवड्याला मिलिंद तर 8-8 वेळा टेस्ट करायचा कोव्हीडची. आत्ता तू बोलू नको, किती एखाद्या माणसाला त्रास द्यायचा, अशी टीका गोऱ्हे यांनी केली. कोविडमध्ये मी काम केलं असं उद्धव ठाकरे म्हणतात, अहो शिंदेसाहेब सुद्धा काम करत होते. त्यांनी पिपीई किट घालून काम केलं ना. ते म्हणाले रेडा कापला, अहो तुम्ही श्रद्धेच्या नावाने काय काय करत होतात हे माहिती आहे. प्रत्येकवेळा कही पे निगाहे कही पे निशाणा सारखं सारखं कशाला? असा सवाल निलम गोऱ्हेंनी केला. तसेच, मला माहिती आहे, मला खूप ट्रोलिंग होईल मात्र बोलण गरजेच आहे असेही त्यांनी म्हटले. 

लख्ख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा
गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा
मी पणाचा दिमाख तुटला
अंतरंगी आवाज उठला
ऐरणीचा सवाल सुटला
या कहाणीचा..

असे म्हणत निलम गोऱ्हेंनी देखील उद्धव ठाकरेंना कवितेतून प्रत्युत्तर दिलंय. 

हेही वाचा

अजितदादांचं स्मरण, मविआ सरकारचा लेखा जोखा सादर, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तीन मागण्या, उद्धव ठाकरे शेवटच्या भाषणात काय म्हणाले?

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचं प्रमोशन म्हणून महाजनांना नाशिकचं पालकमंत्रीपद, भास्कर जाधवांचा टोला, तर नार्वेकरांना विधानसभेचं अध्यक्ष असल्याचं भान राहिलं नसल्याची टीका
कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचं प्रमोशन म्हणून महाजनांना नाशिकचं पालकमंत्रीपद, भास्कर जाधवांचा टोला, तर नार्वेकरांना विधानसभेचं अध्यक्ष असल्याचं भान राहिलं नसल्याची टीका
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
Shiv Sena Symbol Case : राहुल नार्वेकरांचे सगळेच निर्णय चुकले, सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बलांचा धडाधड युक्तिवाद; आजच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
राहुल नार्वेकरांचे सगळेच निर्णय चुकले, सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बलांचा धडाधड युक्तिवाद; आजच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget