Neelam Gorhe on Uddhav Thackeray : ठाकरे गटाचा 'वक्फ'ला विरोध, नीलम गोऱ्हेंनी उद्धव ठाकरेंना डिवचलं; म्हणाल्या, मी बोललं की, त्यांच्या...
Neelam Gorhe on Uddhav Thackeray : ठाकरेंच्या शिवसेनेने वक्फ दुरूस्ती कायद्याच्या विरोधात मतदान केले. यावरून नीलम गोऱ्हेंनी उद्धव ठाकरेंना डिवचलंय.

Neelam Gorhe on Uddhav Thackeray : वक्फ दुरुस्ती विधेयक (Waqf Amendment Bill 2025) लोकसभेत मंजूर झालं आहे. काल रात्री उशीरा वक्फ दुरुस्ती विधेयकासाठी मतदान घेण्यात आलं. यावेळी विधेयकाच्या समर्थनात 288 तर विरोधात 232 मतं पडलीत. तर ठाकरेंच्या शिवसेनेने (Shiv Sena UBT) वक्फ दुरूस्ती कायद्याच्या विरोधात मतदान केले. तसेच ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज पत्रकार परिषद घेत भाजपवर (BJP) जोरदार हल्लाबोल केला. अमित शाहांनी (Amit Shah) जिन्नांना लाजवेल इतकी मुस्लिमांची बाजू घेतली, भाजपने हिंदुत्व सोडलं का? आमचा विधेयकाला नव्हे तर भ्रष्टाचाराला विरोध असल्याचे त्यांनी म्हटले होते. आता वक्फ बोर्डाच्या विधेयक विरोधावरून उद्धव ठाकरेंना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी डिवचलं आहे.
नीलम गोऱ्हेंचा उद्धव ठाकरेंना टोला
नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, वक्फ विधेयकावर मी बोलेल. परंतू, त्यांच्यावर मी बोलणार नाही. मी बोललं की, त्यांच्या खूप जिव्हारी लागतं, असं म्हणत त्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांना टोला लगावलाय. तर 1984 ला जेव्हा शाह बानो प्रकरणात पोटगीचा अधिकार नाकारला. तेव्हा त्या महिलेला वक्फ बोर्डाच्या माध्यमातून पोटगी देण्यात येईल, असं न्यायालयाने म्हटलं होतं. तेव्हा पहिल्यांदा वक्फ शब्द आला होता, असा दाखला देत नीलम गोऱ्हे यांनी वक्फ विधेयकाचे समर्थन केले आहे.
काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत वक्फ सुधारणा विधेयकावर आपली भूमिका स्पष्ट केली होती. उद्धव ठाकरे म्हणाले की, वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक बिल मांडले. किरेन रिजिजू यांनी बिल मांडले, गोमांस खाण्याचा समर्थन यांनी केलं होतं ते बिल मांडतात हा योगायोग आहे. लोकांना झुंजवायचे आणि राजकीय पोळी यांना भाजायची आहे. सुधारणा विधेयकमध्ये काही मुद्दे चांगले आहेत. वक्फ बोर्ड जमिनी तुम्ही ताब्यात घेणार असं म्हणताय, म्हणजे त्यांच्या जमिनीवर यांचा डोळा आहे. जिन्नांना लाजवेल अशी मुस्लिमांची बाजू घेणारी भाषण अमित शाह यांच्यासह त्यांच्या मित्र पक्षाच्या नेत्यांनी केली. तुम्ही आम्हाला बाळासाहेब यांचे विचार शिकवणार? तुम्ही सांगताय मुस्लिमांच्या हिताचे बिल आहे. म्हणताय की, तुम्ही हिंदू विरोधी आहेत का? बिगर मुस्लिम तुम्ही त्या बोर्डात टाकताय. काही दुरुस्त्या हे बिल आणण्यापूर्वी आम्ही त्यात सुचवल्या होत्या. मात्र, तुम्ही जी अफरताफर करायची ती करत होताच. आम्ही काय खायचे, काही खायचे नाही, तुमची दादागिरी आम्ही सहन करणार नाही, असे त्यांनी म्हटले होते.
आणखी वाचा























