Chhagan Bhujbal On Cabinet Minister Expansion: जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं.... अन् छगन भुजबळ गळ्यातला मफलर उडवून निघून गेले, त्या सूचक ओळींची जोरदार चर्चा
Chhagan Bhujbal On Cabinet Minister Expansion: छगन भुजबळांनी केलेल्या विधानाची जोरदार चर्चा रंगली आहे.
Chhagan Bhujbal On Cabinet Minister Expansion: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना मंत्रिपद मिळाल नसल्याने भुजबळांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर थेट नाशिकला जण पसंद केल आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून छगन भुजबळ यांना मंत्रिपद नाकारल्यावरुन अद्याप प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांनी कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील मौन बाळगलं आहे. मात्र यादरम्यान छगन भुजबळांनी केलेल्या विधानाची जोरदार चर्चा रंगली आहे.
राज्यसभेवर मी ताबडतोब जाऊ शकत नाही. माझ्या मतदार संघातील मतदारांची ती प्रतारणा ठरेल. कारण राज्यसभेवर जाण्यासाठी विधानसभेचा राजीनामा द्यावा लागेल. मी आंदोलन उभं केलं नाही. पण मी ओबीसी समाजाच्या संरक्षणासाठी मैदानात आलो. त्याआधी मी राजीनामा दिला...त्याचा फायदा नक्की झाला. तसेच लाडकी बहिण आणि ओबीसीचा फायदा नक्की झाला आहे, असंही छगन भुजबळांनी सांगितले. यानंतर जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं...असं म्हणत छगन भुजबळ आपल्या गळ्यातील मफलर उडवत निघून गेले.
मला सांगितंलं तुम्ही लढायला हवं...- छगन भुजबळ
मंत्रिमंडळातून का काढण्यात आलं माहिती नाही. मला सात-आठ दिवसांपुर्वी त्यांनी सांगितलं. तुम्हाला राज्यसभेवर जायचं आहे तर जावा. मला राज्यसभेवर जायचं होतं. पण ते आधी.. सातारला जागा दिली तेव्हा जायचं होतं. त्यावेळी ती जागा दिली नाही, अशी माहिती छगन भुजबळांनी दिली. मला सांगितंलं तुम्ही लढायला हवं. तुम्ही लढला तर पक्ष पुढे जाईल...मी लढलो...माझे मतदारसंघांतील लोकांच्या आशिर्वादाने निवडूनही आलो, असं छगन भुजबळ म्हणाले.
अजित पवार कशी समजूत काढणार?
आजवर जेव्हा जेव्हा भुजबळ अडचणीत आलेत किंवा मोठी लढाई लढण्याची त्यांनी तयारी केली तेव्हा तेव्हा समता परिषद आणि भुजबळ समर्थक मैदानात उतरले आहेत. आताही ते समता परिषदेच्या कार्यकर्त्यांशी आणि येवल्यातील जनतेशी संवाद साधून पुढील निर्णय घेतील असं सांगितलं जातंय. आणखी एका बंडाच्या तयारीत असणाऱ्या छगन भुजबळ यांची समजूत अजित पवार कशी काढणार हे पाहावं लागणार आहे.
राष्ट्रवादीकडून कोणाला मंत्रिपदासाठी संधी- (NCP Cabinet Minister List)
आदिती तटकरे
बाबासाहेब पाटील
दत्तमामा भरणे
हसन मुश्रीफ
नरहरी झिरवाळ
मकरंद पाटील
इंद्रनील नाईक
धनंजय मुंडे
माणिकराव कोकाटे