एक्स्प्लोर

नवनीत राणा चिप मेंटॅलिटीची बाई, भाजपने भुंकण्यासाठी सोडलंय; इम्तियाज जलिल यांचा जबरा पलटवार

छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात आज प्रचाराचा शेवटचा दिवस. त्यामुळे संदिपान भुमरे, चंद्रकांत खैरे आणि इम्तियाज जलील या तिन्ही प्रमुख उमेदवारांकडून प्रचाराच्या शेवटच्यादिवशी मोठं शक्तीप्रदर्शन होत आहे.

छत्रपती संभाजीनगर : भाजपा महायुतीच्या उमेदवार आणि खासदार नवनीत राणा (Nanvneet Rana) यांनी आपल्या भाषणातून आक्रमक पवित्रा घेत एमआयएमच्या ओवैसी बंधुंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. हैदराबादमधील (Hyderbad)भाजपा उमेदवार लता माधवी यांच्या प्रचारासाठी नवनीत राणांनी भाषण करताना, एमआयएमच्या नेत्यांना लक्ष्य केलं. अकबरुद्दीन ओवैसींच्या भाषणाचा संदर्भ देत, 15 मिनिटांसाठी नाही, केवळ 15 सेकंदांसाठी पोलीस हटवा मग ह्या दोन्ही भावांना कुठून कुठं पळावं हेही कळायंचं नाही, असे नवनीत राणांनी म्हटले होते. त्यानंतर, असदुद्दीन ओवैसींनी नवनीत राणांवर पलटवार केला. मात्र, राणा विरुद्ध एमआयएम असा वाद अद्यापही सुरूच आहे. आता, खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी नवनीत राणांवर शेलक्या शब्दात टीका केलीय. 

छत्रपती संभाजी नगर लोकसभा मतदारसंघात आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे संदिपान भुमरे, चंद्रकांत खैरे आणि इम्तियाज जलील या तिन्ही प्रमुख उमेदवारांकडून आज प्रचाराच्या शेवटच्यादिवशी मोठं शक्तीप्रदर्शन केलं जात आहे. छत्रपती संभाजी नगरच्या पीर बाजारातून एमआयएमच्या वतीने इम्तियाज जलील यांच्या प्रचारार्थ मोठ्या रॅलीचा आयोजन करण्यात आल आहे. या रॅलीत बोलताना, आपणच पुन्हा एकदा  खासदार म्हणून निवडून येणार असा विश्वास जलील यांनी व्यक्त केला. याशिवाय नवनीत राणांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी खासदार नवनीत राणांवर जोरदार पटलवार केला. काही लोक हे भाजपने भुंकण्यासाठी ठेवले आहेत, नवनीत राणा म्हणजे चिप मेंटॅलिटीची बाई असल्याचं जलील यांनी म्हटलं. त्यामुळे, आता जलील यांच्या टीकेला नवनीत राणा काय प्रत्युत्तर देतात हे पाहावे लागेल.  

कव्हरेज दिले तर डान्सही करायला लागेल

भारतीय जनता पार्टीला काही भूकणारे लोक हवे आहेत. याअगोदर हैदराबादचे आमदार भूंकण्यासाठी सोडलं होते, आता तो संपलेला आहे, म्हणून ह्या बाईला सोडलं आहे. नवनीत राणा ही चिप मेंटॅलिटीची बाई आहे. तुमचा धर्म आहे याचा आम्ही आदर करतो, पण हनुमान चालीसा उद्धव ठाकरे यांच्या घरासमोरच का वाचायची होती. चीप पब्लिसिटी घेण्यासाठी ही कोणत्याही इशूला मोठं करते, अशा शब्दात इम्तियाज जलील यांनी नवनीत राणांवर प्रहार केला. या बाईला असं वाटतं की कॅमेरा दिसला की आपली शूटिंग सुरू आहे. ओवैसी साहेब चार टर्म खासदार आहेत, त्यांना संसदरत्न पुरस्कार मिळालेला आहे. पण, नवीन आलेल्या बाईला काही कळत नाही. जर तुम्ही तिला म्हणालात मी कव्हरेज देतो, तर ती डान्स करायलादेखील तयार होईल, असा खोचक टोलाही जलील यांनी लगावला. 

देशात सर्वात मोठा जल्लोष औरंगाबादमध्ये

औरंगाबादमध्ये सध्या निवडणुकीसाठी खूप चांगला माहोल आहे , 4 जूनला सगळ्यात मोठा विजय माझा होईल. देशात सगळ्यात मोठा जल्लोष औरंगाबाद शहरामध्ये माझा होणार आहे, असा विश्वास जलील यांनी व्यक्त केला. लोकांनी स्पष्ट केलेलं आहे,  2019 वेगळं होतं. आता 2024 ला लोकांनी मनात ठरवलंय, त्यामुळे ते पतंगालाच मतदान करतीली. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतंAjit Pawar Akole Speech : तिजोरीची चावी माझ्या हातात.. अकोल्यात अजितदादांची टोलेबाजीABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 15 November 2024Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
Embed widget