Narendra Modi : मोदी म्हणाले, ज्यांना जास्त मुलं त्यांना काँग्रेस अधिकार देणार; काँग्रेसचा पलटवार, मुद्दे नसल्याने हिंदू-मुस्लिम करू लागले
Lok Sabha Election : काँग्रेस आदिवासींच्या हिताकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आहे. काँग्रेसचा जाहीरनामा शहरी नक्षलवाद विचारसरणीला बळ देणार असल्याचा आरोपही त्यांनी केला.
Narendra Modi : या देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार हा मुस्लिम लोकांचा असल्याचं काँग्रेसने (Congrss) या आधीच स्पष्ट केलंय, ज्यांना जास्त मुलं त्यांना जास्त संपत्ती मिळेल असा होते असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केला. काँग्रेसने आदिवासींच्या हिताकडे दुर्लक्ष केलं असून त्यांचा जाहीरनामा हा शहरी नक्षलवादाला बळ देणारा आहे असा आरोपही पंतप्रधानांनी केला. काँग्रेसने याला प्रत्युत्तर दिलं असून मोदींकडे काही बोलण्यासारखं नसल्याने पुन्हा त्यांनी हिंदू-मुस्लिम असा वाद सुरू केल्याचा आरोप केला.
राजस्थानमधील बांसवाडा येथे काँग्रेसवर निशाणा साधत पंतप्रधान मोदी म्हणाले, "काँग्रेसचा जाहीरनामा हा माओवादाला चालना देण्याचा प्रयत्न आहे. काँग्रेस आता डाव्यांच्या जाळ्यात अडकली आहे. येथे आलेल्या एका मित्राने सांगितले की, काँग्रेसचा जाहीरनामा बघा. काँग्रेसचं सरकार आले तर तुमच्या मालमत्तेचे ऑडिट होईल. आई आणि बहिणींच्या सोन्याचे आणि दागिन्यांचे मूल्य देखील मोजले जाईल, त्याचं वाटपही हे लोक करतील. देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार हा मुस्लिमांचा आहे असं काँग्रेसने या आधीच म्हटलंय. तुमच्या संपत्तीवर यांचा अधिकार आहे का? हे लोक तुमच्या आया-बहिणींचे मंगळसूत्रही अंगावर राहू देणार नाहीत. भ्रष्टाचार हाच काँग्रेसचे शिष्टाचार आहे.
पंतप्रधान मोदी खोटारडे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यावर काँग्रेसने लगेचच प्रतिक्रिया दिली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटलंय की, "मतदानाच्या पहिल्या टप्प्यानंतर नरेंद्र मोदींनी निराशा आली आहे, त्यामुळे मोदींच्या खोटेपणाची पातळी इतकी घसरली आहे की भीतीपोटी ते आता जनतेला मुद्द्यांपासून वळवू इच्छित आहेत."
पहले चरण के मतदान में निराशा हाथ लगने के बाद नरेंद्र मोदी के झूठ का स्तर इतना गिर गया है कि घबरा कर वह अब जनता को मुद्दों से भटकाना चाहते हैं।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) April 21, 2024
कांग्रेस के ‘क्रांतिकारी मेनिफेस्टो’ को मिल रहे अपार समर्थन के रुझान आने शुरू हो गए हैं।
देश अब अपने मुद्दों पर वोट करेगा, अपने…
काँग्रेस नेते पवन खेरा यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ जारी करून म्हटले आहे की, "देशाचे पंतप्रधान आज पुन्हा खोटे बोलले. निवडणूक जिंकण्यासाठी तुम्ही जनतेला खोटे बोलत राहाल. तुमच्या हमी खोट्या, तुमची विधाने खोटी, तुमची आश्वासने खोटी आहेत. ते म्हणाले काँग्रेस हिंदू-मुस्लिमच्या नावावर खोटे बोलून देशाचे तुकडे करत आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात कुठेही मुस्लिम आणि हिंदू असे शब्द आहेत का ते सांगावेत, अन्यथा तुम्ही खोटे बोलत आहात हे मान्य करा असं आव्हान मी पंतप्रधानांना देतो.
प्रधान मंत्री को चुनौती है कि हमारे घोषणा पत्र में कहीं भी हिंदू मुसलमान लिखा हो तो दिखा दें।
— Pawan Khera 🇮🇳 (@Pawankhera) April 21, 2024
इस तरह का हल्कापन आपकी मानसिकता में, आपके राजनैतिक संस्कारों में है।
हमने तो युवाओं, महिलाओं, किसानों, आदिवासियों, माध्यम वर्ग, श्रमिकों को न्याय की बात कही है।
आपको इस से भी आपत्ति है? pic.twitter.com/6cazOKC1Rk
ही बातमी वाचा: