एक्स्प्लोर

शरद पवारांना चॅलेंज, बाळासाहेबांची आठवण, व्होट जिहाद; शिवाजी पार्कवरुन मोदींचा ठाकरेंवर घणाघात

इंडी आघाडीकडे काय आहे, जेवढी माणसं तेवढ्या घोषणा. इंडिया आघाडीची नजर आपल्या मंदिरांवर आहे, महिलांच्या मंगळसुत्रावर आहे.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत मुंबईतील शिवाजी पार्कवर महायुतीची (Mahayuti) सांगता सभा संपन्न झाली. राज्यातील दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात आणि गर्दीच्या वातावरणात ही सभा पार पडली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी (Narendra Modi) या सभेच्या प्रथमच जाहीर सभांमधील व्यासपीठावर एकत्र आले होते. राज ठाकरेंनी आपल्या भाषणातून पंतप्रधान मोदींकडे काही महत्त्वाच्या मागण्या केल्या, त्यामध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची आपली पहिली मागणी असल्याचं राज यांनी म्हटलं. राज ठाकरेंनंतर पंतप्रधान मोदींनी नेहमीप्रमाणे मराठीतून भाषणाला सुरुवात केली. मोदींनी आपल्या भाषणात विकासाकामांचा उल्लेख करत, पुढील 2047 पर्यंतच्या भारताचे स्वप्न दाखवले. तर, नाव न घेता उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) व शरद पवार यांच्यावरही हल्लाबोल केला. मुंबईतील शिवाजी पार्कवरुन पुन्हा एकदा नकली शिवसेना म्हणत उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं. तसेच, काँग्रेससह इंडि आघाडी म्हणत इंडिया आघाडीवर हल्लाबोल केला.  

इंडी आघाडीकडे काय आहे, जेवढी माणसं तेवढ्या घोषणा. इंडिया आघाडीची नजर आपल्या मंदिरांवर आहे, महिलांच्या मंगळसुत्रावर आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यानुसार तुम्ही तुमच्या मुलांना तुमची संपत्ती देऊ शकणार नाहीत, तुमच्या संपत्तीतील निम्मा हिस्सा त्यांचं सरकार घेणार आहे. व्होट जिहाद वाल्यांना ती संपत्ती देण्याचं काम ते करणार आहेत. काँग्रेसला अस्तित्व वाचवण्यासाठी ही निवडणूक लढवायची आहे. देशातील लाखो गुंतवणूकदार आज मार्केटसोबत जोडले आहेत. पण, इंडी आघाडीवाले जे कट रचत आहेत, त्यांचा उद्देश देशातील गुंतवणूकदारांचा हा विश्वास तोडण्याचं काम करत आहे, असे म्हणत इंडिया आघाडीच्या धोरणांवर व जाहिरनाम्यावर मोदींनी हल्लाबोल केला.  

बाळासाहेबांची आठवण

मुंबई चैत्यभूमीतून प्रेरणा घेते, हे आमचं सरकार आहे ज्यांनी देश व जगभरात डॉ. बाबासाहेबांचे पंचतिर्थ विकसित केले आहेत. शिवतिर्थच्या या भूमीत कधीकाळी बाळासाहेब ठाकरे व वीर सावकरांचा आवाज घुमत होता. मात्र, आज विश्वासघाती आघाडीला पाहून त्यांच्या आत्म्याला किती दु:ख झालं असेल. नकली शिवसेनावाल्यांनी शिवसैनिकांच्या बलिदानाला धोका दिला, सत्तेसाठी ते राम मंदिराला विरोध करणाऱ्यांसोबत गेले. सत्तेसाठी हे मुंबई हल्ल्यानंतर पार्टी करणाऱ्या लोकांसोबत गेले, असे म्हणत नरेंद्र मोदींनी नाव न घेता उद्धव ठाकरेंनाही आपल्या भाषणातून लक्ष्य केलं.  

शरद पवारांना चॅलेंज

मी राष्ट्रवादीच्या नेत्याला चॅलेंज देतो, राहुल गांधी वीर सावरकर यांच्याबद्दल अपशब्द बोलणार नाहीत, असा शब्द घेऊन दाखवा, असे आव्हानच मोदींनी जाहीर सभेतून शरद पवारांना दिले. मी राष्ट्रवादीच्या नेत्यांना चॅलेंज करतो, राहुल गांधींकडून एक स्टेटमेंट असं घेऊन दाखवा, ते आयुष्यभर वीर सावरकर यांच्याबद्दल अवमानजनक शब्द बोलणार नाहीत. मला माहितीय तो शब्द राहुल गांधी देणार नाहीत, कारण निवडणुका संपताच ते पुन्हा वीर सावरकर यांच्याबद्दल अपशब्द बोलणार आहेत, असेही मोदींनी म्हटले. मोदींनी आपल्या भाषणातून नकली शिवसेना म्हणत उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. नकली शिवसेनेचं जेवढं परिवर्तन झालंय, तेवढा बदल देशातील कुठल्याच पक्षात आजपर्यंत झाला नाही, असेही मोदींनी म्हटले.  

हा मोदीच संविधानाचा मोठा रक्षक

आर्टीकल 370 हटवणारा मोदीच संविधानाचा सर्वात मोठा रक्षक आहे, जे आज संविधान डोक्यावर घेऊन नाचत आहेत, त्यांनी संविधानाला अपंगत्व केल्याची टीका मोदींनी केली. पंडित नेहरुंनी चित्रवाले संविधान ठेऊन टाकले, आता हे लोक संविधानच्या पाठित खंजीर खुपसण्याचं काम करत आहेत. दलित, मागास वर्गाचं आरक्षण मी कधीच हटवू देणार नाही, असे मोदींनी म्हटले.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MIDC Manhole Death Special Report : धोधो पावसात मॅनहोलने घेतला बळी, जबाबदार  कोण?Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?Zero Hour Malvan Statue : मालवणमधील शिवरायांचा पुतळा कसा कोसळला? कारणं काय? आरोपी नेमकं कोण?Zero Hour Case Guest Center : संजय राऊतांवर अब्रुनुकसाना खटला दाखल करण्याची गरज होतीच - दमानिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
Embed widget