Narayan Rane : खाईन तर तुपाशी, मी अडीच लाखांच्या रेकॉर्डब्रेक मतांनी विजयी होणार; नारायण राणेंचा विश्वास
Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Election : आतापर्यंत सर्व पदं ही रेकॉर्डब्रेक करून मिळवली आहेत, आताही ठाकरे गटाच्या विनायक राऊत याचं डिपॉझिट जप्त करणार असं केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले.
सिंधुदुर्ग: आयुष्यात सगळी पदं ही रेकॉर्ड ब्रेक करून मिळली आहेत, त्यामुळे मला अडीच लाख मताधिक्यांने विजय अपेक्षित असल्याचा विश्वास केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी व्यक्त केला. खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी असं वक्तव्यही नारायण राणे यांनी केलंय. सिंधुदुर्ग-रत्नागिरीमध्ये विनायक राऊत यांनी काहीही काम केलं नसल्याचा आरोपही नारायण राणे यांनी केला. सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून (Ratnagiri Sindhudurg Lok Sabha constituency) महायुतीने अद्याप त्यांचा उमेदवार जाहीर केला नसला तरी नारायण राणे यांनी मात्र प्रचार सुरू केल्याचं दिसतंय.
खाईत तर तुपाशी, नाहीतर उपाशी
नारायण राणे त्यांच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले की, खाईन तर तुपाशी, नाहीतर उपाशी. आतापर्यंत मी सर्व पदं ही रेकॉर्ड ब्रेक करून मिळवली आहेत. आताही सिंधुदु्र्गमधून मला किमान अडीच लाख मतांनी विजय मिळाला पाहिजे.
विनायक राऊत यांचं डिपॉझिट जप्त करणार
विनायक राऊत याच डिपॉझिट मला जप्त करायचं आहे, ठेकेदारांनी पैसे दिले नाहीत म्हणून खासदार विनायक राऊतने या भागात काम केलं नाही, काम न केल्यामुळे खासदारकीचा पन्नास टक्केहून अधिक निधी शिल्लक राहिल्याचा आरोप नारायण राणे यांनी केली.
किरण सामंत हे लंबी रेस का घोडा
रत्नागिरी सिंधुदुर्गच्या उमेदवारीवरून नारायण राणे आणि किरण सामंत यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू असून किरण सामंत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना फडणवीसांकडे गेलेला माणूस रिकाम्या हाताने परत येत नाही असं आमदार नितेश राणे म्हणाले. ते म्हणाले की, किरण सामंत हे लंबी रेस का घोडा आहेत. महायुतीचे आम्ही सगळे कार्यकर्ते एकत्र काम करत आहोत. या ठिकाणाहून महायुतीचा उमेदवार निवडून यावा यासाठी
काम करत आहोत.
उमेदवारीवर अंतिम निर्णय अमित शाह घेणार
अमित शाहांची येत्या 24 एप्रिलला रत्नागिरीत सभा आयोजित करण्यात आली आहे. कोकणातील या जागेवर भाजपचं विशेष लक्ष आहे. या ठिकाणाहून भाजपकडून नारायण राणे तर शिवसेनेकडून उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत इच्छूक आहेत. महायुतीकडून अद्याप उमेदवाराची घोषणा करण्यात आली नाही.
रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवर महायुतीचा तिढा कायम असून या जागेवर केंद्रीय मंत्री अमित शाह हे दोन दिवसात निर्णय घेणार असल्याची माहिती आहे. तोपर्यंत नारायण राणे आणि किरण सामंत यांनी शांत राहावं अशा सूचना देवेंद्र फडणवीसांनी दिल्याची माहिती आहे.
रत्नागिरीच्या भाजपच्या जागेवर जो उमेदवार दिला जाईल तो निवडून येण्यासाठी आमचा प्रचार सुरू असल्याचं नारायण राणे यांनी म्हटलंय. तर देवेंद्र फडणवीस यांना कोणीही भेटू शकतो असं वक्तव्य त्यांनी किरण सामंत यांच्या भेटीवर केलं आहे.
ही बातमी वाचा: