'मुस्लिमांना दुय्यम दर्जाचे नागरिक बनवले', ओवेसींचा पंतप्रधान मोदींवर गंभीर आरोप
Owaisi Slams PM Modi: संसदेच्या अधिवेशनादरम्यान एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी पत्रकारांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप केले आहेत.
Owaisi Slams PM Modi: संसदेच्या अधिवेशनादरम्यान एआयएमआयएमचे (AIMIM) अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी पत्रकारांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले की, ''पंतप्रधान मोदी सावरकर आणि गोळवलकरांच्या धोरणांवर काम करत आहेत. त्यांच्या धोरणावर काम करत त्यांनी देशातील मुस्लिमांना दुय्यम दर्जाचे नागरिक बनवले आहे.''
ओवेसी म्हणाले की, ''केंद्र सरकारच्या स्वानिधी योजनेंतर्गत रस्त्यावरील फेरीवाले, रस्त्यांवर ठेला लावून वस्तू विकणाऱ्यांना कर्ज दिले जाते. आरटीआयच्या उत्तरात माहिती मिळाली आहे की, 32 लाख लोकांपैकी केवळ 331 अल्पसंख्याकांनाच कर्ज दिले गेले आहे.''
देशातील स्वयंरोजगार क्षेत्रात किती टक्के मुस्लिम आहेत?
ते म्हणाले, एनएसओच्या आकडेवारीनुसार, शहरी भागात मुस्लिम 50 टक्के स्वयंरोजगार क्षेत्रात आहेत आणि हिंदू बांधव केवळ 33 टक्के स्वयंरोजगार क्षेत्रात आहेत. शहरी भागातील स्वयंरोजगारात मुस्लिमांचा वाटा 50 टक्के आहे. तर केवळ 331 लोकांनाच कर्ज का देण्यात आले?
उत्तर प्रदेशमध्ये मुस्लिमांचा विश्वासघात कोणी केला?
अशोक राजभर (Ashok Rajbhar) आणि सपा प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले की, दोघे मिळून मला शिवीगाळ करायचे, आता ते आपसात भांडत आहेत. हे फसवे लोक आहेत. त्यांनी मिळून राज्यातील मुस्लिमांचा विश्वासघात केला आहे. हे लोक भाजपला हरवू शकणार नाहीत, असे मी म्हणत होतो. केवळ मुस्लिमांची मते घेऊन त्यांनी आपले दुकान चमकवले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
ISC Result 2022 Declared: आयसीएसई 12वीचा निकाल जाहीर, ठाण्यातील उपासना नंदी देशात पहिली
Kerala High Court : "अविवाहित मातेचे मूलही देशाचा नागरिक, पालक म्हणून जन्म दाखल्यावर फक्त आईचे नाव लिहिण्याचा अधिकार"
Arvind Kejriwal On Employment : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची मोठी घोषणा, पाच वर्षात 20 लाख नोकऱ्या दिल्या जाणार
Agnipath Scheme: पंतप्रधानांच्या या नव्या प्रयोगामुळे देशाची सुरक्षा आणि भविष्य दोन्ही धोक्यात आहे: राहुल गांधी