Agnipath Scheme: पंतप्रधानांच्या या नव्या प्रयोगामुळे देशाची सुरक्षा आणि भविष्य दोन्ही धोक्यात आहे: राहुल गांधी
Agniveer Exam Today: देशभरात आज (24 जुलै) अग्निपथ योजनेंतर्गत हवाई दलासाठी अग्निविरांची भरती परीक्षा घेण्यात येत आहे. या अंतर्गत उत्तर प्रदेशातील कानपूरमधील 17 केंद्रांवर परीक्षा होत असून, यामध्ये 33,150 उमेदवार परीक्षा देत आहेत.
Agniveer Exam Today: देशभरात आज (24 जुलै) अग्निपथ योजनेंतर्गत हवाई दलासाठी अग्निविरांची भरती परीक्षा घेण्यात येत आहे. या अंतर्गत उत्तर प्रदेशातील कानपूरमधील 17 केंद्रांवर परीक्षा होत असून, यामध्ये 33,150 उमेदवार परीक्षा देत आहेत. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा ट्वीट करून या योजनेबाबत केंद्र सरकारला लक्ष्य केलं आहे. ते ट्विर करून म्हणाले आहेत की, देशात दरवर्षी 60 हजार सैनिक निवृत्त होतात. त्यापैकी केवळ 3 हजारांनाच सरकारी नोकऱ्या मिळत आहेत. 4 वर्षांच्या करारावर निवृत्त होणाऱ्या हजारो अग्निवीरांचे भविष्य काय असेल?
राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला असून ते आपल्या ट्विटमध्ये पुढे म्हणाले की, "पंतप्रधानांच्या प्रयोगशाळेच्या या नव्या प्रयोगामुळे देशाची सुरक्षा आणि तरुणांचे भविष्य दोन्ही धोक्यात आले आहे. दरवर्षी 60,000 सैनिक निवृत्त होतात, त्यापैकी फक्त 3000 सैनिक सरकारी नोकरी मिळत आहे. 4 वर्षांच्या करारावर निवृत्त होणाऱ्या हजारो
60,000 सैनिक हर साल रिटायर होते हैं, उनमें से सिर्फ 3000 को सरकारी नौकरी मिल रही है।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 24, 2022
4 साल के ठेके पर हज़ारों की संख्या में रिटायर होने वाले अग्निवीरों का भविष्य क्या होगा?
प्रधानमंत्री की प्रयोगशाला के इस नए Experiment से देश की सुरक्षा और युवाओं का भविष्य दोनों खतरे में हैं।
अग्निवीरांचे भविष्य काय असेल?
तीन सत्रात होत आहे परीक्षा
अग्निवीरांच्या भरतीसाठी घेण्यात येणारी परीक्षा 3 सत्रात घेतली जात आहे. पहिल्या सत्राची परीक्षा सकाळी 8:45 वाजता सुरू होईल. परंतु विद्यार्थ्यांना सकाळी 7:30 वाजताच केंद्रावर पोहोचावे लागेल. दुसऱ्या सत्राच्या उमेदवारांना सकाळी 11:30 वाजता परीक्षा केंद्रावर आणि सत्राच्या शिफ्टच्या उमेदवारांना दुपारी 3:15 वाजता परीक्षा केंद्रावर पोहोचावे लागेल. प्रत्येक सत्रात 625 उमेदवार परीक्षा देतील. ही परीक्षा ऑनलाइन असेल. ही परीक्षा 31 जुलैपर्यंत अनेक टप्प्यांत घेतली जाणार आहे.
दरम्यान, अग्निपथ योजनेंतर्गत लष्कर, हवाई दल आणि नौदलात सैनिकांची भरती होणार आहे. या योजनेंतर्गत दरवर्षी 40 ते 45 हजार तरुणांना सैन्यात भरती करण्यात येणार आहे. त्यांचा कार्यकाळ 4 वर्षांचा असेल आणि त्यांची श्रेणी वेगळी असेल. याअंतर्गत सैन्यात भरती होणाऱ्या तरुणांना अग्निवीर म्हटले जाईल.