एक्स्प्लोर

Mumbai University Senate Election 2024: मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा आज निकाल, युवासेना Vs अभाविप, कोण मारणार बाजी?

mumbai university senate election 2024: मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा आजचा निकाल अनेक अर्थांनी महत्त्वाचा मानला जात आहे. आदित्य ठाकरे यांची प्रतिष्ठा पणाला

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चा असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा निकाल शुक्रवारी जाहीर होणार आहे. सकाळी 9 वाजता मतमोजणीच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात वैध आणि अवैध मतांची विभागणी करुन विजयी कोटा निश्चित करण्यात येईल. त्यानंतर पुढील मतमोजणीला सुरुवात होईल. मुंबईतील राजकीय वर्तुळात वर्चस्व राखण्याच्यादृष्टीने सिनेट निवडणूक (mumbai university senate election) ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते. गेल्या अनेक वर्षांपासून सिनेट निवडणुकीत आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या नेतृत्त्वाखालील युवासेनेने (Yuvasena) वर्चस्व राखले आहे. मात्र, यंदा भाजपप्रणित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (ABVP) सिनेटची निवडणूक जिंकण्यासाठी संपूर्ण जोर लावला आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

आदित्य ठाकरे यांची युवासेना 2018 ची पुनरावृत्ती  करणार की  अभाविप सिनेट निवडणुकीमध्ये मुसंडी मारणार, याचा फैसला आज निकालाच्यावेळी होईल. मुंबई विद्यापीठ फोर्ट येथे सकाळी 9 वाजल्यापासून या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. एकूण 10 जागांसाठी पार पडलेल्या या निवडणुकीत 28 उमेदवार रिंगणात होते.

प्रामुख्याने ठाकरे गटाची युवा सेना विरुद्ध अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अशा पद्धतीची थेट लढत या सिनेट निवडणुकीत पार पडली आहे. दोन वेळा मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणुकीला स्थगिती देण्यात आली होती. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले आणि अखेर 24 सप्टेंबरला मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक पार पडली होती. त्यामुळे आजच्या मतमोजणीत कोण बाजी मारणार याकडे सबंध राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

कोणत्या संघटनेचे किती उमेदवार रिंगणात ?

ठाकरेंची युवा सेना  - दहा जागांवर दहा उमेदवार 

अभाविप - दहा जागांवर दहा उमेदवार  

आठ इतर उमेदवार असे एकूण 28 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत 

मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक उमेदवार  

अभाविप उमेदवारांची नावे

१) हर्षद भिडे (open )
२) प्रतीक नाईक (open 
३) रोहन ठाकरे (open 
४)प्रेषित जयवंत (open )
५) जयेश शेखावत (open )
६) राजेंद्र सायगावकर (SC 
७) निशा सावरा (ST )
८) राकेश भुजबळ ( OBC 
९) अजिंक्य जाधव (VjNT )
१०) रेणुका ठाकूर(महिला )

युवा सेना सिनेट उमेदवार 

प्रदीप सावंत open 
मिलिंद साटम open 
परम यादव open 
अल्पेश भोईर open 
किसन सावंत. Open 
स्नेहा गवळी- महिला
शीतल शेठ   - SC
मयूर पांचाळ - obc 
धनराज कोहचडे - ST
शशिकांत झोरे - NT

एकूण इतर आठ उमेदवार अपक्ष आहेत

 रोहित ढाले (open)
 सुधाकर तांबोळी (open)
 संजय वैराळ  (open )
 जितेंद्र म्हात्रे (open )
 मोहम्मद इरफान अन्सारी (open )
 भूषण गांगडा (ST )
सनील मोसेकर (obc )
 महेश सातपुते (VJNT )

मतमोजणी कशा पद्धतीने होणार ?

* सिनेट निवडणुकीची  मतमोजणीची पद्धत शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या मतमोजणीप्रमाणे आहे 

* सुरुवातीला  मतपत्रिकांची छाननी केली जाईल 

* मतपत्रिकांच्या छाननी मध्ये  मतपत्रिका वैद्य, अवैध (valid /invalid  ठरवल्या जातील )

* मतपत्रिकांची छाननी पूर्ण झाल्यानंतर कोटा ठरवला जाईल  

* पसंती क्रमांकानुसार मतदान झाल्याने त्यानुसारच  मतमोजणी पार पडेल

*  एकूण 7200 मतपत्रिका आहेत. यामध्ये मतपत्रिकांची छाननी  होऊन वैध अवैध मतपत्रिका बाजूला केल्या जातील.  त्यानंतर पाच आरक्षित आणि पाच खुल्या प्रवर्गातील जागांसाठी कोटा ठरवला जाईल. कोटा ठरल्यानंतर पसंती क्रमांकानुसार मतमोजणी सुरू होईल. पहिल्यांदाच सिनेट निवडणुकीची मतमोजणी  सीसीटीव्हीच्या  निगराणीखाली अगदी पारदर्शकपणे होत आहे

आणखी वाचा

आदित्य ठाकरे थेट शरद पवारांच्या भेटीला सिल्व्हर ओकवर; दोघांच्या भेटीत काय घडलं?

मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा मार्ग मोकळा, सर्वोच्च न्यायालयाचा एक प्रश्न, महाराष्ट्र स्टुडंट युनियनकडून याचिका मागे

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget