एक्स्प्लोर

मुंबई प्रभादेवीत शिंदे गट-ठाकरे गटात राडा; बोर्डावरील धनुष्यबाण चिन्हावरुन दोन्ही गटांचे कार्यकर्ते भिडले

Mumbai Prabhadevi : मुंबईतील प्रभादेवीत पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेने विरूद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी आमने-सामने आल्याचं पाहायला मिळत आहे.

Mumbai Prabhadevi Politics : मुंबई : मुंबईतील (Mumbai News) प्रभादेवीत शिंदे गट (Shinde Group) आणि ठाकरे गट (Thackeray Group) पुन्हा आमनेसामने आला. फूटपाथवर लावलेल्या बोर्डावरील धनुष्यबाणाचं चिन्ह ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी काढल्याचा आरोप शिंदे गटानं केला आहे. स्थानिक आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांनी स्वखर्चातून बोर्ड बसवल्याचा दावा शिंदे गटानं (Shinde Group) केला आहे. मात्र, सत्तांतरानंतर इतर राजकीय पक्षांचे पदाधिकारी होर्डिंग लावत होते. त्यातच ठाकरे गटानं अहुजा टॉवर इथल्या होर्डिंगवरील धनुष्यबाण चिन्ह हटवल्याचा आरोप शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. 

मुंबईतील प्रभादेवीत पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेने विरूद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी आमने-सामने आल्याचं पाहायला मिळत आहे. प्रभादेवी भागात फुटपाथवर लावण्यात आलेल्या होर्डिंगवरील धनुष्यबाण हे चिन्ह ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांनी रात्रीच्या वेळेस काढल्यानं स्थानिक शिवसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. 

फुटवरील हा बोर्ड स्थानिक शिवसेना आमदार सदा सरवणकर यांनी स्वखर्चातून बसवण्यात आल्याचा दावा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. मात्र, सत्तांतरानंतर त्यावर इतर राजकिय पक्षाचे (ठाकरे गट)चे पदाधिकारी होर्डिंग लावत होते. यावर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी यापूर्वीही आक्षेप घेऊन, स्थानिक पोलिसांना पत्र व्यवहार करत ही बाब निदर्शनास आणून दिली असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, मंगळवारी रात्री ठाकरेंचे पदाधिकारी मध्यरात्री 11 च्या सुमारास आहुजा टॅावर येथील शिवसेना पक्षाच्या होर्डिंगवरील धनुष्यबाण हे चिन्ह काढून तिथून हटवल्याचं समोर आलं आहे. 

नेमकं काय घडलं? 

फुटपाथवर लावण्यात आलेल्या होर्डिंगवरील धनुष्यबाणाचं चिन्ह कापून तिथून पळ काढताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसैनिकांनी ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना रंगेहाथ पकडलं असल्याचीही माहिती मिळत आहे. त्यावेळी आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना खडसावत धनुष्यबाण चिन्ह का काढलं? याबाबत जाब विचारला. पण, काहीच उत्तर मिळालं नाही. अखेर शिवसेनेचे शाखाप्रमुख संतोष तेलवणे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर माहीम पोलीस ठाण्यात ठाकरे गटाचे पदाधिकारी शैलेश माळी, अमर लब्देसह अन्य एकावर अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे.                                                

पाहा व्हिडीओ : Mumbai Prabhadevi : बोर्डावरील धनुष्यबाण चिन्ह ठाकरे गटाने काढल्याचा शिंदे गटाचा आरोप            

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
Aditi Tatkare : दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
SSC & HSC Board Exam : दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhagan Bhujbal Stylish Look : गॉगल,मफ्लर, शूज ते कडक ब्लेजर...स्टार्सना टक्कर देणारा भुजबळांचा लूक!Chhagan Bhujbal NCP Adhiveshan Shirdi :नाराजी दूर झाल्याचा प्रश्नच नाही...छगन भुजबळांचं मोठं वक्तव्यAjit Pawar Shirdi : राष्ट्रवादीच्या अधिवेशनासाठी अजितदादा शिर्डीत, साईंच्या चरणी नतमस्तकNCP Ajit Pawar Shirdi : 500 पदाधिकाऱ्यांना निमंत्रण,दादांची रांगोळी; NCPच्या शिबिराची तयारी पाहा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
Aditi Tatkare : दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
SSC & HSC Board Exam : दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
Chhagan Bhujbal : पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
Chhagan Bhujbal : पहिल्यांदाच पंकज दिसताच चर्चा सुरु झाली, पण तटकरेंनी विनंती करताच नाराज छगन भुजबळही अधिवेशनाला पोहोचले
पहिल्यांदाच पंकज दिसताच चर्चा सुरु झाली, पण तटकरेंनी विनंती करताच नाराज छगन भुजबळही अधिवेशनाला पोहोचले
Nashik Accident : कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
Dhananjay Munde : प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
Embed widget