एक्स्प्लोर

ईशान्य मुंबईत मतदानाच्या दिवशीही गोंधळ, भांडुपमध्ये ठाकरे गटाचे दोन कार्यकर्ते ताब्यात; सुनिल राऊतांनी पोलिसांना झापलं

Mumbai Lok Sabha Election: कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊतांनी पोलिसांना झापलं आहे. 

मुंबई :  मुंबईच्या (Mumbai Lok Sabha Election)  भांडुपमध्ये  (Bhandup)  ठाकरे गटाच्या दोन कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. डमी मशिनचं प्रात्याक्षिक दाखवणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊतांनी पोलिसांना झापलं आहे.   

सुनील राऊत म्हणाले, आमची भूमिका ठाम आहे. ईशान्य मुंबईच्या जनतेने ठरवले आहे संजय दिना पाटलांना दिल्लीला पाठवणार आहे.भारतीय जनता पक्ष आम्हाला प्रचंड त्रास आहे. कालपासून जास्त त्रास देत आहे. आमच्या कार्यकर्त्यांवर दबाव आणला जात आहे. आमच्या कार्यकर्त्यांना अटक केली जात आहे. आमच्या प्रमुख कार्यकर्त्यांना बोलवले जात आहे. आमच्यावर दबाव आणला जात आहे. त्यांना धमकी दिली आहे. आज सकाळी सुद्धा आमच्या कार्यकर्त्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे.  

भाजपला पराभाव दिसतोय म्हणून पोलिसांवर दबाव : सुनील राऊत

सुनील राऊत म्हणाले, पोलीसांनी माझ्याशी चर्चा केली. ते म्हणाले आम्ही निवडणूक कार्यालयात बोलवून नियम समजून घेतो. जर 100 मीटरच्या बाहेर ते मार्गदर्शन करत असतील तर आम्ही त्यांना सोडून देऊ. भाजपला पराभाव दिसतोय म्हणून पोलिसांवर दबाव आहे.  पोलीसांनी निष्पक्ष पद्धतीने काम केले पाहिजे.  

निवडणूक आयोग हे भारतीय जनता पक्षाची शाखा : संजय राऊत

संजय राऊत म्हणाले, निवडणूक यंत्रणा, निवडणूक आयोग पूर्णपणे सत्ताधारी पक्षाच्या पकडीत आहे. तरीही आमच्यासारखे पक्ष जिद्दीने उतरले आहेत. प्रचंड पैशांचे वाटप केले जात आहे. त्यावर काही कारवाई केली जात नाही. निवडणूक आयोग हे भारतीय जनता पक्षाची शाखा म्हणून काम करत आहे. निवडणूक आयोगाची अशी कोणतीही नियमावली नाही. मार्गदर्शन करण्यासंदर्भात काही नियमावली नाही. तरीही इकडचे काही लोक हे पोलिसांवार, अधिकाऱ्यांवर दादागिरी करत आमच्या कार्यकर्त्यांना अटक केली. पोलीस त्यांना घेऊन गेली. पैसे वाटप करणाऱ्यांना अटक केली नाही. 4 जून नंतर त्यांना समजेल की, तुमचा दबाव, तुमच्या पैशाचे वाचप झुगारुन मतदान केले आहे.

कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर संजय राऊत चांगलेच आक्रमक

ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर संजय राऊत चांगलेच आक्रमक झाले. डमी मशीनवर कार्यकर्त्यंकडून मार्गदर्शन करण्यात येत होते. मात्र या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर संजय राऊतांनी या संदर्भात पोलिसांना जाब विचारला आहे. 

हे ही वाचा :

EVM मशीनला हार घालणे शांतीगिरी महाराजांना भोवणार; गुन्हा दाखल होण्याची शक्यता, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मागवली माहिती

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 17 January 2025Baramati Father Killer Son : बापच उठला लेकराच्या जीवावर! 9 वर्षाच्या चिमुरड्याची बापाकडून हत्याWalmik Karad Special Report :कोट्याधीश कराड, पुण्यात घबाड; कराडच्या संपत्तीमुळे ईडीची एन्ट्री होणार?Saif Ali Khan Special Report : सैफ, सेफ आणि सवाल; सैफवरील हल्ल्याचंही राजकारण सुरु

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Embed widget