एक्स्प्लोर

Mumbai BEST Election Result: बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'आम्ही पैशांच्या

Mumbai BEST Election Result: आमचे 12 हजार कर्मचारी तरीही एका आठवड्यात भाजपच्या पैशांच्या प्रचंड ओघाने गणित बदललं; बेस्ट पतपेढीच्या निवडणूक निकालानंतर ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया

Mumbai BEST Election Result: गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय असलेल्या दी बेस्ट एम्प्लॉईज को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीचा (BEST Election 2025) निकाल अखेर जाहीर झाला आहे.  या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनेलचा दारुण पराभव झाला. ठाकरे बंधूंच्या पॅनेलला 21 पैकी एकही जागा जिंकता आली नाही. हा ठाकरे गट आणि मनसेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी भाष्य केले आहे. बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत भाजपने पैशांचा प्रचंड वापर केला. या पैशासमोर आम्ही हरलो, असे मत सुहास सामंत यांनी व्यक्त केले.

बेस्ट पतपेढी निवडणूक झाली, त्याचा निकाल काल आला. आम्ही दुर्दैवाने हरलो.  जे जिंकले त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. गेल्या नऊ वर्षांमध्ये आम्ही बेस्ट पतपेढी ज्या उंचीवर नेऊन ठेवली ती उंची टिकवून ठेवा. बेस्टच्या कर्मचाऱ्यांची सेवा करा, एवढीच विनंती मी करतो, असे सुहास सामंत यांनी म्हटले. या निवडणुकीत हे सगळं कसं काय घडलं, हे माहिती नाही. माझ्याकडे स्वत:कडे बेस्टचे 12 हजार कर्मचारी आहेत. मात्र, गेल्या आठवड्यात पैशांचा प्रचंड ओघ आला. त्यापुढे आम्ही टिकू शकलो नाही. मला वाटलं कर्मचारी पैसे घेऊन मतदान करणार नाहीत. मी बेस्ट वाचवण्यासाठी जे प्रयत्न करतोय, त्यामुळे कर्मचारी माझ्यासोबत राहतील, असे वाटले होते. पण हल्ली ट्रेंडच बदलला आहे. आम्ही पैशांच्या बाबतीत आणि संपर्क साधण्यात कमी पडलो, अशी स्पष्ट कबुली सुहास सामंत यांनी दिली. भाजपने या निवडणुकीत प्रचंड पैसा, अधिकारांचा वापर आणि संपूर्ण यंत्रणा उतरवली होती. साध्या पतपेढीच्या निवडणुकीत भाजप सर्व ताकदीनिशी उतरतो, ही वाखाणण्याजोगी गोष्ट आहे. पण ही चिंतेची गोष्टही आहे, त्यांच्यापासून सावध राहिले पाहिजे. जेव्हा भाजपला कुठली गोष्ट मिळत नाही, तेव्हा अशाप्रकारे सत्तेचा आणि पैशांचा वापर करतात आणि समोरच्याला हतबल करतात, असे सुहास सामंत यांनी म्हटले.

Sanjay Raut on BEST Election Result: बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निकालावर संजय राऊतांची प्रतिक्रिया, म्हणाले...

बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीच्यादृष्टीने लिटमस टेस्ट म्हणून पाहिले जात होते. मात्र, ठाकरे बंधूंना 21 पैकी एकही जागा जिंकता आली नाही. याविषयी प्रतिक्रिया विचारली असता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी फार बोलण्यास नकार दिला. ही स्थानिक स्तरावरील छोटी निवडणूक आहे. बेस्टमध्ये कोणती युनियन मजबूत आहे, यावर ही गणितं अवलंबू आहेत. ठाकरे ब्रँड हा कधीही संपणार नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले.

आणखी वाचा

बेस्ट निवडणुकीच्या मतमोजणीत ट्विस्ट, मध्यरात्री पुन्हा मतं मोजली अन् निकाल बदलला, नेमकं काय झालं?

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
Prashant Kishor On Sunil Tatkare Sunetra Pawar NCP Politics: प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
अजितदादांना न्याय कधी मिळणार? राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर काँग्रेसचं आंदोलन, सूरज चव्हाणांसोबत बाचाबाची, पोलीस घटनास्थळी
अजितदादांना न्याय कधी मिळणार? राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर काँग्रेसचं आंदोलन, सूरज चव्हाणांसोबत बाचाबाची, पोलीस घटनास्थळी
कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसी जागेवर निवडणूक लढवणाऱ्यांना माझं समर्थन नाही; मनोज जरांगे पाटलांचं मोठं वक्तव्य 
कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसी जागेवर निवडणूक लढवणाऱ्यांना माझं समर्थन नाही; मनोज जरांगे पाटलांचं मोठं वक्तव्य 

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maratha Reservation: अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
Mumbai High Court On FDA: तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDA ला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDA ला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
Thailand Crime: नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
Ramandeep Singh Married to Charlie Chauhan : भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?
भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?
Prashant Kishor On Sunil Tatkare Sunetra Pawar NCP Politics: प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
Rishabh Pant News : 3 वर्षांपासून इकडेतिकडे भटकतोय... ऋषभ पंत भावूक, मध्यरात्री 1 वाजता मुख्यमंत्र्यांना मागितली मदत, नेमकं प्रकरण काय?
3 वर्षांपासून इकडेतिकडे भटकतोय... ऋषभ पंत भावूक, मध्यरात्री 1 वाजता मुख्यमंत्र्यांना मागितली मदत, नेमकं प्रकरण काय?
सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर तैनात पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू; नेमकं घडलं काय?
सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर तैनात पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू; नेमकं घडलं काय?
Rekha Fitness Transformation:'रेखा आधी जाड होती, पण नंतर..' रेखाच्या भावोजींनी सांगितला ट्रान्सफॉर्मेशनचा किस्सा; म्हणाले..
'रेखा आधी जाड होती, पण नंतर..' रेखाच्या भावोजींनी सांगितला ट्रान्सफॉर्मेशनचा किस्सा; म्हणाले..
Embed widget