Mukhyamantri Teerth Darshan Yojana : मोठी बातमी : मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेच्या पहिल्या टप्यासाठी 18 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
Mukhyamantri Teerth Darshan Yojana : योजनेसाठीचे अर्ज गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी व सहायक आयुक्त कार्यालयात उपलब्ध आहेत.
Mukhyamantri Teerth Darshan Yojana : महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिक जे 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत, त्यांना भारतातील तीर्थश्रेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी 'मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना' सुरू करण्यात आली आहे. या योजनेतील पात्र व्यक्तींच्या प्रवासाचा, राहण्याचा व भोजनाचा खर्च शासना मार्फत करण्यात येणार असून जळगाव जिल्हयासाठी 1000 व्यक्तींना याचा लाभ देण्यात येणार आहे.
पहिल्या टप्यासाठी श्रीराम मंदिर, अयोध्या हे तीर्थक्षेत्र निश्चित
पहिल्या टप्यासाठी श्रीराम मंदिर, अयोध्या हे तीर्थक्षेत्र निश्चित करण्यात आलेले आहे. या योजनेचे अर्ज ऑफलाईन पध्दतीने गटविकास अधिकारी, पंचायत समिती, मुख्याधिकारी, नगरपरिषद / नगरपंचायत किंवा सहायक आयुक्त, समाज, कल्याण, कार्यालय पत्ता: डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, मायादेवी मंदिरासमोर, महाबळ रोड, जळगाव जळगाव येथे सादर करावेत. सदर योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ही दिनांक 13 सप्टेंबर, 2024 रोजी सायंकाळी 06.00 वाजेपर्यंत देण्यात आली होती. परंतू सदर मुदत दिनांक 18 सप्टेंबर, 2024 पर्यत वाढविण्यात येत आहे
योजनेसाठीचे अर्ज गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी व सहायक आयुक्त कार्यालयात उपलब्ध
योजनेसाठीचे अर्ज गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी व सहायक आयुक्त कार्यालयात उपलब्ध आहेत. उदिष्टापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास लाभार्थ्याची लॉटरी पध्दतीने निवड करण्यात येईल. दिनांक 18 सप्टेंबर, 2024 पर्यत 60 वर्षे व त्यावरील जेष्ठ नागरीकांनी सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन योगेश पाटील, सहायक आयुक्त, समाज कल्याण, जळगाव यांनी केले आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी काय आहेत अटी?
60 वर्षे किंवा त्याहून अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ मिळेल.
महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणं आवश्यक
कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.50 लाख रुपयांपेक्षा कमी असावं.
महाराष्ट्र राज्याचं अधिवास प्रमाणपत्र नसेल तर 15 वर्षांपूर्वीचं रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, जन्माचा दाखला (महाराष्ट्रातील) यापैकी कोणतंही एक प्रमाणपत्र असायला हवं.
महाराष्ट्रातील सर्व धर्मांमधील ज्येष्ठ नागरिकांना राज्यासह देशभरातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची संधी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेच्या माध्यमातून संधी मिळत आहे. या योजनेनुसार ज्येष्ठ नागरिकांना प्रति व्यक्ती 30 हजार रुपयांचं अनुदान मिळेल. यामध्ये प्रत्यक्ष प्रवास, भोजन, निवासासाठीच्या खर्चाचा समावेश आहे. 2.50 लाख रुपयांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या नागरिकांनाच या योजनेचा लाभ मिळेल.
इतर महत्वाच्या बातम्या