एक्स्प्लोर

Nanded: 'आता तुला फक्त उचललंय, राजकीय नेत्यावर बोलशील तर..' ठाकरे गटाच्या शहरप्रमुखाच्या अपहरणाबाबत धक्कादायक अपडेट

Nanded: नांदेडमध्ये ठाकरे गटाच्या शहरप्रमुखाला बंदूकीच्या धाकानं जबरदस्तीनं गाडीत बसवून नेत अपहरण करण्यात आलं.

Nanded: नांदेडमध्ये ठाकरे गटाच्या शहरप्रमुखाला बंदूकीच्या धाकानं जबरदस्तीनं गाडीत बसवून नेत अपहरण करण्यात आलं. जमीन विक्रीचे धंदे बंद कर, आज तुला उचचले आहे, राजकीय नेत्याबद्दल बोलशील तर याद राख म्हणत जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याची तक्रार केल्यानंतर इतवारा पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. बीडमध्ये सरपंचाचे अपहरण आणि हत्याकांडानंतर महाराष्ट्र हादरला आहे. दरम्यान, नांदेडमध्ये ठाकरे गटाच्या शहर प्रमुखाला जबरदस्ती गाडीत बसवून नेल्याने शुक्रवारी मोठी खळबळ उडाली होती.

या घटनेनंतर शहर पोलिसांनी गस्त लावल्यानंतर अर्ध्या तासात शहरप्रमुखाची सूटका झाली. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शहर प्रमुख गौरव कोडगिरे यांचे शुक्रवारी बाफना टी पॉईंटवरून बंदुकीच्या धाकावर अपहरण करण्यात आले होते. राजकीय नेत्याबद्दल बोलशील तर याद राख, जमीन विक्रीचे धंदे बंद कर अन्यथं जीवे मारेन अशा धमक्या दिल्याचे कोंडगिरे यांनी सांगितल्यानंतर अज्ञात व्यक्तीवर इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचं पोलीस उपअधिक्षक सुशील नाईक यांनी सांगितले आहे.

नक्की घडले काय?

गौरव कोडगिरे हे कामानिमित्त बाफना टी पॉईंट परिसरात गेले होते. यावेळी काही जणांनी बंदूक दाखवत त्यांना गाडीत जबरदस्तीने बसवले आणि चंदासिंग कॉर्नर येथे नेले. तासाभरानंतर त्यांना सोडून दिले. कोडगिरे यांनी सांगितले की, अपहरणकर्त्यांनी त्यांना जमीन विक्रीचे धंदे बंद करण्याचा इशारा दिला आणि जीवे मारण्याची धमकी दिली.याप्रकरणी कोडगिरे यांनी इतवारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. नांदेड पोलीस उपअधीक्षक सुशील नाईक यांनी आरोपींचा शोध सुरू असल्याचे सांगितले. गौरव कोडगिरे हे कट्टर शिवसैनिक असून शिवसेनेच्या ठाकरे गटाचे सक्रिय कार्यकर्ते आहेत.नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी विरोधकांवर आरोप केले होते. सोशल मीडियावरही ते सक्रीय आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

साबण, विमबार, गुड नाईट लिक्विड, झाडू, चमचे... छ. संभाजीनगर पालिकेच्या तिजोरीतून आयुक्तांची घरगुती खरेदी
साबण, विमबार, गुड नाईट लिक्विड, झाडू, चमचे... छ. संभाजीनगर पालिकेच्या तिजोरीतून आयुक्तांची घरगुती खरेदी
Walmik Karad & Ajit Pawar: वाल्मिक कराडने वापरलेली गाडी अजितदादांच्या ताफ्यात, बीडमध्ये 'त्या' व्यक्तीकडून पत्रकारांवर पाळत; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक आरोप
वाल्मिक कराडने वापरलेली गाडी अजितदादांच्या ताफ्यात, बीडमध्ये 'त्या' व्यक्तीकडून पत्रकारांवर पाळत; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक आरोप
नोंदणी झाली मात्र खरेदी नाही? धाराशिवमध्ये 27 हजार शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी बाकी, शेतकऱ्यांच्या खरेदी केंद्रावर चकरा
नोंदणी झाली मात्र खरेदी नाही? धाराशिवमध्ये 27 हजार शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी बाकी, शेतकऱ्यांच्या खरेदी केंद्रावर चकरा
वाहनधारकांना दिलासा! डिजिलॉकर आणि एम परिवहन यावरील डिजिटल कागदपत्रे ग्राह्य, वाहतूक पोलिसांना आदेश
वाहनधारकांना दिलासा! डिजिलॉकर आणि एम परिवहन यावरील डिजिटल कागदपत्रे ग्राह्य, वाहतूक पोलिसांना आदेश
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbra : मुंब्य्रात हिंदी भाषिक फळविक्रेता आणि तरुणांमध्ये वाद चिघळला,  मराठी तरुणाविरोधात तक्रारPune : नाराज Chhagan Bhujbal आणि Sharad Pawar एकाच व्यासपीठावरABP Majha Headlines : 7 AM : 03 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सWalmik Karad : SIT कडून सरपंच हत्येचा तपास, बसवराज यांनी वाल्मिक कराडची पावने दोन तास केली चौकशी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
साबण, विमबार, गुड नाईट लिक्विड, झाडू, चमचे... छ. संभाजीनगर पालिकेच्या तिजोरीतून आयुक्तांची घरगुती खरेदी
साबण, विमबार, गुड नाईट लिक्विड, झाडू, चमचे... छ. संभाजीनगर पालिकेच्या तिजोरीतून आयुक्तांची घरगुती खरेदी
Walmik Karad & Ajit Pawar: वाल्मिक कराडने वापरलेली गाडी अजितदादांच्या ताफ्यात, बीडमध्ये 'त्या' व्यक्तीकडून पत्रकारांवर पाळत; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक आरोप
वाल्मिक कराडने वापरलेली गाडी अजितदादांच्या ताफ्यात, बीडमध्ये 'त्या' व्यक्तीकडून पत्रकारांवर पाळत; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक आरोप
नोंदणी झाली मात्र खरेदी नाही? धाराशिवमध्ये 27 हजार शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी बाकी, शेतकऱ्यांच्या खरेदी केंद्रावर चकरा
नोंदणी झाली मात्र खरेदी नाही? धाराशिवमध्ये 27 हजार शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी बाकी, शेतकऱ्यांच्या खरेदी केंद्रावर चकरा
वाहनधारकांना दिलासा! डिजिलॉकर आणि एम परिवहन यावरील डिजिटल कागदपत्रे ग्राह्य, वाहतूक पोलिसांना आदेश
वाहनधारकांना दिलासा! डिजिलॉकर आणि एम परिवहन यावरील डिजिटल कागदपत्रे ग्राह्य, वाहतूक पोलिसांना आदेश
Devendra Fadnavis & Uddhav Thackeray: मोठी बातमी: 'सामना'च्या अग्रलेखातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कौतुक
देवाभाऊ, अभिनंदन! भाजपवर आग ओकणाऱ्या 'सामना'तून देवेंद्र फडणवीसांचं कौतुक
Ind vs Aus 5th Test : रोहित शर्माला वगळण्यात आले की स्वतः विश्रांती घेतली? जसप्रीत बुमराह म्हणाला, आमचा कर्णधार स्वार्थ नाही...
रोहित शर्माला वगळण्यात आले की स्वतः विश्रांती घेतली? जसप्रीत बुमराह म्हणाला, आमचा कर्णधार स्वार्थ नाही...
Upcoming IPO : स्टॅण्डर्ड ग्लासच्या आयपीओची जोरदार चर्चा,सबस्क्रिप्शन सुरु होण्यापूर्वीच जीएमपी 61 टक्क्यांवर
स्टॅण्डर्ड ग्लास लायनिंग टेक्नोलॉजीचा आयपीओ जोरदार चर्चेत, सबस्क्रिप्शनसाठी खुला होण्यापूर्वीच जीएमपी 61 टक्क्यांवर
लाडक्या बहि‍णींचं क्रॉस व्हेरिफिकेशन, 7 दिवसांत स्रुटीनी; आदिती तटकरेंनी सांगितलं कोण गळणार?
लाडक्या बहि‍णींचं क्रॉस व्हेरिफिकेशन, 7 दिवसांत स्रुटीनी; आदिती तटकरेंनी सांगितलं कोण गळणार?
Embed widget