एक्स्प्लोर

MNS on Hindi Compulsion: मनसैनिकांनी राज ठाकरेंच्या आदेशाची वाटही पाहिली नाही, हिंदी सक्तीवरुन ॲक्शन मोडमध्ये, हिंदी भाषेची पुस्तकं फाडून पेटवली

Raj Thackeray on Hindi: राज ठाकरेंच्या तोंडातून शब्द बाहेर पडायचा अवकाश मनसैनिक ॲक्शन मोडमध्ये, हिंदी पुस्तकं फाडून पेटवली. मुंबईत मनसेच्या हिंदी भाषाविरोधा आंदोलनाला सुरुवात

Raj Thackeray on Hindi Compulsion: राज्यातील शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून तिसऱ्या भाषेच्या माध्यमातून  हिंदी भाषेची सक्ती करुन पाहणाऱ्या महायुती सरकारवर मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) तुटून पडले आहेत. राज ठाकरे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत मनसे राज्यात हिंदीची (Hindi) सक्ती करुन देणार नाही. राज्य सरकारने धोरण बदलले नाही तर संघर्ष अटळ असेल, त्याला मनसे (MNS) जबाबदार राहणार नाही. या इशाऱ्याला राज्य सरकार आव्हान समजत असेल तर समजावे, अशी गर्जना राज ठाकरे यांनी केली. राज ठाकरे यांच्या या पत्रकार परिषदेनंतर मुंबईत लगेचच पडसाद उमटताना दिसले. (Maharashtra School Hindi Language Compulsion)

राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतनंतर मनसे सैनिक आक्रमक झाले. मनसेचे सरचिटणीस मनोज चव्हाण यांच्या नेतृत्त्वाखाली मुंबईत हिंदी भाषेच्या पुस्तकाची होळी करण्यात आली. यावेळी मनसैनिकांनी  हिंदी पुस्तकांचे पहिले आणि शेवटचे पान फाडून ते जाळून चाकले.  महाराष्ट्रात हिंदीची सक्ती चालणार नाही, असे   मनसे सरचिटणीस मनोज चव्हाण यांनी सांगितले. राज ठाकरेंच्या या पत्रकार परिषदेनंतर हिंदी भाषेच्या सक्तीविरुद्धच्या आंदोलनाचे लोण राज्यभरात पसरण्याची शक्यता आहे. राज्यातील शाळा नुकत्याच सुरु झाल्या आहेत. त्यामुळे आता शाळांकडून पहिलीपासूनच्या विद्यार्थ्यांना हिंदी विषय शिकवला जाणार का?, हे बघावे लागेल. बाजारपेठेत हिंदीची पुस्तकं विकलीच कशी जातात आणि शाळांमध्ये हिंदी शिकवलीच कशी जाते, हे आम्ही बघू, असा इशाराच राज ठाकरे यांनी दिला आहे. त्यामुळे शाळांमध्ये हिंदी शिकवण्याबाबत मनसे आक्रमक झाल्यास राज्य सरकार काय भूमिका घेणार, हे पाहावे लागेल. हिंदी भाषेविरुद्ध आक्रमक झालेल्या मनसेविरोधात पोलिसांनी कारवाई केल्यास हे आंदोलन आणखीच भडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता राज्य सरकार हा प्रश्न कसा हाताळणार, हे पाहावे लागेल.

MNS against Hindi: भांडूपमध्ये हिंदी पुस्तकांची होळी, दुकानदारांना वॉर्निंग

शाळेत हिंदी भाषा शिकवण्याच्या विरोधात राज ठाकरे यांची पत्रकार परिषद पार पडताच, मनसैनिक मुंबईत आक्रमक झाले आहेत. भांडुप-कांजूरमार्ग परिसरात पुस्तक विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये जाऊन मनसैनिकांनी हिंदी भाषेची शालेय शिक्षणाची पुस्तक शोधून फाडून आणि जाळून टाकली. शालेय शिक्षणातील हिंदी भाषेची पुस्तके विक्रीसाठी ही ठेवू नये अशी ताकीद मनसैनिकांनी दुकानदाराना दिली.

Raj Thackeray: उत्तरेतील आयएएस अधिकाऱ्यांच्या लॉबीचा हिंदी सक्तीसाठी दबाव: राज ठाकरे

हिंदी भाषा सक्तीचा विषय येत नाही. उत्तरेत काही राज्यात ही भाषा वापरली जाते. त्यांना त्यांची स्थानिक बोली भाषा संपवू द्यायची नाही. सध्या कागदी घोडे नाचवत आहे. जर भाषा सक्ती नाही तर मग पुस्तक छपाई कशासाठी करत आहात? उत्तरेतील लोकांना सुसंस्कृत महाराष्ट्र काबीज करायचा आहे त्यासाठी भाषा सक्ती केली जात आहे. उत्तरेतील आयएएस अधिकाऱ्यांना मुंबईत सहज काम करता यावे, यासाठी विशिष्ट लॉबीच्या माध्यमातून त्रिभाषा धोरणाच्या नावाखाली हिंदी भाषेच्या सक्तीचे धोरण रेटले जात आहे, असा आरोप राज ठाकरे यांनी केला.

आणखी वाचा

उत्तरेतील लोकांना सुसंस्कृत महाराष्ट्र काबीज करायचाय; भाषेचा सन्मान राखणार नसाल तर संघर्ष अटळ; राज ठाकरेंचा सरकारला थेट इशारा

मोदी-शाहांच्या राज्यात हिंदी सक्ती नाही, मग महाराष्ट्रात का, आव्हान असेल तर आव्हान समजा, राज ठाकरेंचा एल्गार, हिंदीला विरोध

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

About the author अजय माने

अजय माने
Read More

महत्त्वाच्या बातम्या

5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
फडणवीस आणि शिंदेमुळेच उपोषणाची वेळ, जरांगे पाटलांचा आरोप, म्हणाले, सिरसाटांचा आडमुठेपणा शिंदेंना नडणार 
फडणवीस आणि शिंदेमुळेच उपोषणाची वेळ, जरांगे पाटलांचा आरोप, म्हणाले, सिरसाटांचा आडमुठेपणा शिंदेंना नडणार 
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर

Embed widget