एक्स्प्लोर

MNS Deepotsav 2025: मनसेच्या दीपोत्सवाचं उद्धव ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन, ठाकरे बंधू दिवाळीतच राजकीय धमाका करणार?

MNS Deepotsav 2025: मनसेच्यावतीने मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर दरवर्षी दीपोत्सव साजरा केला जातो, यंदाही दिवाळीच्या अगोदर दीपोत्सव सोहळा संपन्न होणार असून हा सोहळा खास ठरणार आहे.

MNS Deepotsav 2025: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची राजकीय घटना घडणार आहे. मनसे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) पक्षाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवाजी पार्क (Shivaji Park) मैदानावर दीपोत्सव (MNS Deepotsav 2025) सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, यंदाचा दीपोत्सव विशेष ठरणार आहे. कारण, शिवाजी पार्कवरील मनसेच्या दीपोत्सव 2025 सोहळ्याचे उद्घाटन यंदा चक्क शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) करणार आहेत. हा कार्यक्रम आज 17 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 6:30 वाजता होणार आहे. यामुळे ठाकरे बंधू दिवाळीतच राजकीय धमाका करतात की काय? याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. 

उद्धव ठाकरे यांचे नाव मनसेच्या दीपोत्सवाच्या अधिकृत पत्रिकेत छापण्यात आले असून, यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा चांगलीच रंगली आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यातील वाढती जवळीक, एकमेकांच्या घरी होणाऱ्या भेटीगाठी, आणि आता दीपोत्सवाच्या मंचावर होणारी जाहीर एकत्र उपस्थिती, या सर्व घडामोडींचा एकत्रित विचार करता, शिवसेना आणि मनसेच्या संभाव्य युतीच्या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे.

Raj Thackeray Uddhav Thackeray: दोन महिन्यात तब्बल 6 भेटी

गेल्या दोन महिन्यांत ठाकरे बंधूंमध्ये तब्बल 6 वेळा भेटी झाल्या आहेत. त्यातील दोन भेटी या बंद दाराआड झाल्या आहेत. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. त्याआधी उद्धव ठाकरे यांनी 'शिवतीर्थ' या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी भेट दिली होती. या दोन्ही नेत्यांची अशी सलग आणि उघड भेटगाठ ही गेल्या अनेक वर्षांत पाहायला मिळालेली नव्हती.

MNS Deepotsav 2025: दिवाळीतच राजकीय धमाका? 

दरम्यान, आगामी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने शिवसेना आणि मनसे एकत्र येणार असल्याचे आता जवळपास निश्चित मानले जात आहे. केवळ, औपचारीक घोषणा आणि जागावाटप बाकी असल्याचा अंदाज राजकीय जाणकार आणि दोन्ही पक्षातील पदाधिकारी व्यक्त करत आहेत. त्यामुळे, दिवाळीत शिवाजी पार्कवरुनच राजकीय धमाका होतो की काय?असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

Raj Thackeray Uddhav Thackeray Meet : राज-उद्धव यांच्या भेटीगाठी 

5 जुलै- मराठी विजयी मेळावा (राज आणि उद्धव ठाकरे हे 20 वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर आले होते)

24 जुलै - उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसादिवशी राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंच्या घरी शुभेच्छा देण्यासाठी गेले होते.

27 ऑगस्ट - गणेशोत्सवानिमित्त उद्धव ठाकरे हे सहकुटुंब शिवतीर्थवर गेले होते.

10 सप्टेंबर - उद्धव ठाकरे हे संजय राऊत, अनिल परबांसह राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर गेले होते. त्यावेळी त्यांच्यामध्ये अडीच तास चर्चा झाली होती.

5 ऑक्टोबर - राज ठाकरे मातोश्रीवर गेले होते.

12 ऑक्टोबर - स्नेहभोजनासाठी राज ठाकरे कुटुंबासह मातोश्रीवर गेले होते.

आणखी वाचा 

Solapur News: भाजपमध्ये मेगा भरती सुरू; सोलापुरातील चार माजी आमदार करणार भाजपप्रवेश; फडणवीसांच्या बंगल्यावर रात्री गुप्तं खलबतं

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Bajrang Sonawane : माझ्या मुलाचा हात असेल तर स्वतः पोलीस ठाण्यात घेऊन येतो; खा. बजरंग सोनवणेंची भूमिका, पोलीस महासंचालकांच्या निर्णयावर शंका
माझ्या मुलाचा हात असेल तर स्वतः पोलीस ठाण्यात घेऊन येतो; खा. बजरंग सोनवणेंची भूमिका, पोलीस महासंचालकांच्या निर्णयावर शंका
Bharati Pawar : आता नव्या उमेदीनं काम करता येईल, युवकांच्या प्रश्नांसाठी मोठा आग्रह असेल, राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड होताच भारती पवार यांची पहिली प्रतिक्रिया
आता नव्या उमेदीनं काम करता येईल, युवकांच्या प्रश्नांसाठी मोठा आग्रह असेल : भारती पवार

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget