BJP MNS Alliance : मनसेला सोबत घ्यावं हे भाजप आणि शिवसेनेला का वाटतं?
BJP MNS Alliance : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडत असताना, आता भाजप-मनसे पक्षाची अखेर युती (BJP MNS Alliance) होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. याला कारण म्हणजे दोन्ही पक्षातील नेत्यांच्या भेटीगाठी.
BJP MNS Alliance : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडत असताना, आता भाजप-मनसे पक्षाची अखेर युती (BJP MNS Alliance) होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. याला कारण म्हणजे दोन्ही पक्षातील नेत्यांच्या भेटीगाठी. दिल्लीत केंद्रीय अधिवेशनात सहभाग घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)यांची भेट घेतली. एक तास चाललेल्या या बैठकीत आशिष शेलार यांनी भाजप पक्ष श्रेष्ठींचा निरोप आणला होता का? अशी जोरदार करता सुरु आहे. यामुळे लवकरच मनसे महायुतीत सहभागी होण्याची दाट शक्यता आहे.
लोकसभा निवडणुका तोंडावर असताना राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. प्रत्येक पक्ष या निवडणुकीत आपल्याला चांगली प्रगती यावी यासाठी प्रयत्न करत आहे. त्यातच गेल्या अनेक वर्षांपासून फक्त चर्चा असणाऱ्या भाजप-मनसे-शिवसेना युतीची चर्चा अखेर खरी ठरत आहे. याला कारण म्हणजे मनसे नेत्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये भाजप नेते आणि शिवसेना नेत्यांच्या घेतलेल्या भेटीगाठी. या भेटीगाठी जरी सदिच्छा भेटी असल्याचा नेतेमंडळी सांगत असले तरी यामध्ये युती संदर्भात महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत.
सोमवारी सकाळी आशिष शेलार यांनी मनसे अध्यक्ष यांची भेट घेतली आणि पुन्हा महायुतीला नवीन भिडू मिळणार या चर्चा सुरु झाल्या. काही दिवसांपूर्वी मनसे नेते संदिप देशपांडे, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीसांची भेट घेतली . लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने या बैठकीत चर्चा झाल्याचं समोर येतंय.
मनसे भाजप आणि सेनेत आतापर्यंत काय घडलं आणि पूढे काय ?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनसे नेते आणि भाजप, शिवसेना नेत्यामध्ये गेल्या काही महिन्यात युती संदर्भात प्राथमिक चर्चा झाली आहे. या युती संदर्भात तिन्ही पक्षातील काही नेत्यांवर वेगवेगळ्या दृष्टीने विचार करून पुढची चर्चा कशी असेल याबाबत जबाबदारी दिली आहे. आता पुढे या युतीत काही फॉर्म्युलावर आणि समान दिव्याच्या विषयांवर चर्चा हे वरिष्ठ नेते करतील.
केंद्रातून सिग्नल आल्यानंतर पुढील चर्चा होणार आहे
गेल्या काही वर्षांपासून मनसेला भाजप ज्या कारणास्तव जवळ करत नव्हते. ज्याचा फटका निवडणुकात बसू शकणार होता,त्या परप्रांतियांच्या मुद्द्याविषयी मनसे मवाळ झाली आहे. त्यामुळे आता युतीसाठी काही अडचण नसल्याने भाजप आणि शिवसेना मनसेला जवळ करत आहे. मात्र या युती संदर्भात मनसे देखील आपल्या पक्षाचा फायदा होत असेल तरच या युती संदर्भात सकारात्मक आहे,अशी माहिती मिळते.
भाजप आणि शिवसेनेला मनसेला का घ्यावसं वाटतंय सोबत ?
राज ठाकरे हे हिंदुत्ववादी आहेत, हाच तिन्ही पक्षांमधील समान धागा आहे. महाराष्ट्रातील राजकारणात राज ठाकरे यांचे वलय आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ठाकरे ब्रँड हा महाराष्ट्रातील राजकारणात करिष्मा करत आहे,त्यामुळे भाजप आणि सेनेला याचा फायदा होईल. मनसेच्या स्थापनेनंतर गेल्या अनेक वर्षात मतदार टक्केवारी वाढतच चालली आहे. गेल्या काही निवडणुकांमध्ये या वोटिंग बँक चा अनेक पक्षांना चांगलाच फटका बसलाय.
मनसे आणि राज ठाकरे यांना चांगला फायदा होणार
मनसे प्रमुख राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात मागील काही दिवसांत सतत गाठीभेटी होतांना पाहायला मिळत आहे. या दोन्ही नेत्यांच्या भेटीमुळे मनसे आणि शिंदे गट आगामी लोकसभा- विधानसभा निवडणुकीत एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. अशातच राज ठाकरे आणि भाजप नेत्यांच्या देखील भेटीगाठी होतांना पाहायला मिळत आहे, असे सगळे विषय मनसे महायुतीत सहभागी होताना सध्या चर्चिले जात आहेत. लोकसभा निवडणुकीत विरोधक देखील जोरदार तयारी करतात त्यामध्ये महायुती मनसेला सोबत घेऊन जाण्यासाठी आग्रही आहे. मात्र या युती संदर्भात फक्त चर्चा सुरू आहेत. अंतिम निर्णय हा लवकरच होईल. त्यामुळे आगामी काळामध्ये मनसे भाजप शिवसेना युती होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. जर युती झालीच तर राज्याच्या राजकारणात मोठा घडामोडी देखील घडतील.
इतर महत्वाच्या बातम्या