एक्स्प्लोर

Sanjay Shirsat Discharged : आमदार संजय शिरसाट यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला

Sanjay Shirsat Discharge : संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता. उपचारांसाठी त्यांन मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. चार दिवसांनी त्यांना आज डिस्चार्ज मिळाला.

Sanjay Shirsat Discharged : बाळासाहेबांची शिवसेना (Balasahebanchi Shiv Sena) गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांना लिलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. संजय शिरसाट यांना एक आठवडा घरी आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता. उपचारांसाठी त्यांना एअर अॅम्ब्युलन्सने मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

दरम्यान लिलावती रुग्णालयातील डॉक्टर गोखले आणि राव यांच्या टीमने आमदार संजय शिरसाट यांच्यावर अँजिओप्लास्टी केली. ते चार दिवस लिलावती रुग्णालयात दाखल होते. अखेर आज त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे. डॉक्टरांकडून संजय शिरसाट यांना विश्रांती घेण्याचा आणि जास्त ताण न घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

शिरसाट यांना सोमवारी हृदयविकाराचा झटका
संजय शिरसाट यांना सोमवारी (17 ऑक्टोबर) रात्री हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता. त्यांना तातडीने उपचारांसाठी औरंगाबादमधील सिग्मा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्या ठिकाणी त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर होती. मग शिरसाट यांना पुढील उपचारांसाठी मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. शिरसाट यांना शनिवारपासून अस्वस्थ वाटत होते. त्यातच त्यांनी सोमवारी रात्री हृदयविकाराचा झटका आला.

मंत्रिपद न मिळाल्याने शिरसाट नाराज असल्याची चर्चा
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात झालेल्या बंडात त्यांचा सहभाग होता. शिंदे-फडणवीस यांच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या सरकारमध्ये त्यांचा समावेश होईल अशी अटकळ बांधली जात होती. मात्र, त्यांना मंत्रिपदाची संधी न मिळाल्याने ते नाराज असल्याची चर्चा होती. शिवसेनेत झालेल्या फुटीनंतर संजय शिरसाट यांनी शिवसेना नेतृत्वावर विशेषत: खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली होती. 

शिरसाट यांची राजकीय वाटचाल
संजय शिरसाट हे औरंगाबाद पश्चिम इथले आमदार आहेत. राज्यात झालेल्या सत्तांतरात शिरसाट देखील सामील होते. शिवसेनेचे उमेदवार म्हणून सलग तीन वेळेस विधानसभा निवडणुकीत विजयी झाले आहेत. 2019 मधील विधानसभा निवडणुकीत संजय शिरसाट यांनी भाजपचे बंडखोर उमेदवार राजू शिंदे यांचा 40 हजार 747 मतांनी पराभव केला होता. 

संजय शिरसाट यांची 1985 मध्ये शिवसेनेचे शहर संघटक म्हणून नियुक्ती झाली होती. राज्यात 1995 मध्ये युतीची सत्ता आल्यानंतर मराठवाडा औद्योगिक विकास महामंडळाच्या सदस्यपदी त्यांची निवड करण्यात आली होती. शिरसाट हे 2000 मध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यानंतर 2009 मध्ये पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली आणि विजयी झाले. त्यानंतर सलग तीन वेळेस शिरसाट यांनी विजय संपादन केला. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

रायगडमध्ये कंटेनर पलटी, चालक 1 ठार; भंडाऱ्यात 50 लाखांचा रोड रोलर जाळला
रायगडमध्ये कंटेनर पलटी, चालक 1 ठार; भंडाऱ्यात 50 लाखांचा रोड रोलर जाळला
Photos: अचानक समोर आला खराखुरा वाघ, दुचाकीस्वाराची उडाली भांबेरी; थरारक व्हिडिओ व्हायरल
Photos: अचानक समोर आला खराखुरा वाघ, दुचाकीस्वाराची उडाली भांबेरी; थरारक व्हिडिओ व्हायरल
Video: मला जेवायला दिलं नाही म्हणून मी नाराज; आता नागपूर अधिवेशनाला जाणार नाही; भुजबळ शांतपणे संतापले
Video: मला जेवायला दिलं नाही म्हणून मी नाराज; आता नागपूर अधिवेशनाला जाणार नाही; भुजबळ शांतपणे संतापले
Dhule Crime : पळासनेरच्या जंगलात पैशांचा पाऊस पाडून देतो म्हणून गंडवलं, धुळे जिल्ह्यातील प्रकार
पळासनेरच्या जंगलात पैशांचा पाऊस पाडून देतो म्हणून गंडवलं, धुळे जिल्ह्यातील प्रकार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jitendra Awhad on Parbhani : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी अद्याप कारवाई नाही, आव्हाडांचा हल्लाबोलChhagan bhujbal : हिवाळी अधिवेशन सोडून भुजबळ नाशिकसाठी रवाना, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्याची भेट घेणारPrakash Shendge : Chhagan bhujbal यांना डावलून  Manoj Jarange यांची इच्छापूर्ती कली : प्रकाश शेंडगेDevendra Fadnavis vs Sudhir Mungantiwar : सुधीर मुनगंटीवार-देवेंद्र फडणवीसांची चर्चा, नाराजी दूर?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रायगडमध्ये कंटेनर पलटी, चालक 1 ठार; भंडाऱ्यात 50 लाखांचा रोड रोलर जाळला
रायगडमध्ये कंटेनर पलटी, चालक 1 ठार; भंडाऱ्यात 50 लाखांचा रोड रोलर जाळला
Photos: अचानक समोर आला खराखुरा वाघ, दुचाकीस्वाराची उडाली भांबेरी; थरारक व्हिडिओ व्हायरल
Photos: अचानक समोर आला खराखुरा वाघ, दुचाकीस्वाराची उडाली भांबेरी; थरारक व्हिडिओ व्हायरल
Video: मला जेवायला दिलं नाही म्हणून मी नाराज; आता नागपूर अधिवेशनाला जाणार नाही; भुजबळ शांतपणे संतापले
Video: मला जेवायला दिलं नाही म्हणून मी नाराज; आता नागपूर अधिवेशनाला जाणार नाही; भुजबळ शांतपणे संतापले
Dhule Crime : पळासनेरच्या जंगलात पैशांचा पाऊस पाडून देतो म्हणून गंडवलं, धुळे जिल्ह्यातील प्रकार
पळासनेरच्या जंगलात पैशांचा पाऊस पाडून देतो म्हणून गंडवलं, धुळे जिल्ह्यातील प्रकार
अजित पवारांच्या प्रतिमेला जोडे मारले, छगन भुजबळ समर्थक आक्रमक, दोन दिवसात समर्थकांचा मेळावा
अजित पवारांच्या प्रतिमेला जोडे मारले, छगन भुजबळ समर्थक आक्रमक, दोन दिवसात समर्थकांचा मेळावा
Devendra Fadnavis : फडणवीस म्हणाले, 20 हजारांची लीड द्या, मंत्रिपद देतो; पण, 50 हजारांचं मताधिक्य देऊनही आमदाराला मिळाला डच्चू
फडणवीस म्हणाले, 20 हजारांची लीड द्या, मंत्रिपद देतो; पण, 50 हजारांचं मताधिक्य देऊनही आमदाराला मिळाला डच्चू
Tanaji Sawant: तानाजी सावंतांनी फेसबुकचा डीपी बदलला, शिवसेना नाव अन् चिन्हच हटवलं; नव्या पिक्चरवर कोण?
तानाजी सावंतांनी फेसबुकचा डीपी बदलला, शिवसेना नाव अन् चिन्हच हटवलं; नव्या पिक्चरवर कोण?
Fact Check : शशी थरुर यांच्या पायाला दुखापत झाल्याचा फोटो व्हायरल, वेगवेगळ्या दाव्यांचं सत्य अखेर समोर
शशी थरुर यांच्या पायाला दुखापत झाल्याचा फोटो व्हायरल, वेगवेगळ्या दाव्यांचं सत्य अखेर समोर
Embed widget