एक्स्प्लोर

Milind Deora Quits Congress LIVE Updates : मिलिंद देवरा यांचा काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा; शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश, सर्व अपडेट्स एका क्लिकवर

Milind Deora Resigns LIVE: मिलिंद देवरा यांचा काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश त्यांनी केला आहे.

LIVE

Key Events
Milind Deora Quits Congress LIVE Updates : मिलिंद देवरा यांचा काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा;  शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश, सर्व अपडेट्स एका क्लिकवर

Background

Milind Deora Resigns LIVE Updates: काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मिलिंद देवरा यांनी काँग्रेस  सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. मिलिंद देवरा 10 माजी नगरसेवक, 25 पदाधिकाऱ्यांसह आज शिंदे गटात प्रवेश केला. दुपारी 2 वाजता वर्षा बंगल्यावर पक्षप्रवेश करण्यात आला.

दक्षिण मुंबई मतदारसंघाबाबत महाविकास आघाडीत काहीशी धुसफूस असल्याचं दिसून येत आहे. ठाकरे गटाकडून वारंवार दक्षिण मुंबई मतदारसंघावर दावा सांगण्यात आल्यापासूनच काँग्रेस नेते नाराज असल्याच्या चर्चा आहेत. अशातच याच नाराजीतून मिलिंद देवरा काँग्रेसची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेत  प्रवेश केला. 

दक्षिण मुंबईतील सध्याची राजकीय परिस्थिती काय? 

2019 साली लोकसभा निवडणूक शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी लढवली आणि मोठ्या मताधिक्यानं जिंकली. त्यावेळी शिवसेना मात्र एकसंध होती आणि शिवसेना-भाजपा युती होती. मात्र, आता शिवसेनेतील प्रबळ नेते एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर मात्र परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. 

दक्षिण मुंबईत एकूण सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. वरळीतून आदित्य ठाकरे (ठाकरे गटाचे आमदार), शिवडी अजय चौधरी (ठाकरे गटाचे आमदार), भायखळा यामिनी जाधव (शिंदे गटाच्या आमदार), मलबार हिल मंगल प्रभात लोढा (भाजप आमदार), कुलाबा राहुल नार्वेकर (भाजप आमदार) आणि मुंबादेवी अमीन पटेल (काँग्रेस आमदार) असं बलाबल सध्या दक्षिण मुंबईत आहे. त्यात आता शिवसेना दोन गटांत विभागली गेली आहे. त्यामुळे मिलिंद देवरांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने, त्यांच्यासाठी नक्कीच फायद्याचं ठरेल, असं दिसतंय. 

दक्षिण मुंबई मतदारसंघात मुख्यतः मराठी, गुजराती, मारवाडी आणि जैन समाजाचे मतदार मोठ्या प्रमाणात आहे. अशातच दक्षिण मुंबई लोकसभेसाठी मिलिंद देवरा एक सुसंस्कृत आणि सुशिक्षित चेहरा ठरतील, हे मात्र नक्की. अशातच देवरांसाठी एक अडचणी मात्र नक्की असेल, ती म्हणजे, लालबाग, काळाचौकी, शिवडी आणि परळ भागांत मराठी मतदार मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे मिलिंद देवरांना दक्षिण मुंबई मतदारसंघातील हा भलामोठा मराठी पट्टा कितपत स्विकारेल हा मोठा प्रश्नच आहे. लालबाग, परळ म्हणजे, एकंदरीत संपूर्ण गिरणगाव गेल्या कित्येत वर्षांपासून शिवसेना आणि विशेषतः ठाकरेंशी एकनिष्ठ आहे. त्यामुळे या पट्ट्यात देवरांना कितपत पसंती मिळेल हा प्रश्नच आहे. अशातच इथे मनसेनं उमेदवार दिला, तर मात्र समीकरण काहीसं बदलू शकतं, एवढं मात्र नक्की. 

16:12 PM (IST)  •  14 Jan 2024

मुस्लिम समाजाचे मौलाना यांचाही शिंदेगटात 

मौलाना जियाउद्दीन शेख
मौलाना नौशाद खान
मौलाना झुबेर खान 
मौलाना झिशान खान 
मौलाना नासिर खान 
मौलाना इरफान खान 
मौलाना रहमान कासिम

16:06 PM (IST)  •  14 Jan 2024

मिलींद देवरांसह आज वर्षावर शिंदे गटात कोणाकोणाचा प्रवेश झाला

सुशिबेन शहा, राज्य महिला आयोग, माजी अध्यक्ष 

प्रमोद मांद्रेकर , माजी नगरसेवक

सुनिल नरसाळे, माजी नगरसेवक

रामवचन मुराई , माजी नगरसेवक

हंसा मारु, माजी नगरसेवक 

अनिता यादव, माजी नगरसेविका
रमेश यादव

गजेंद्र लष्करी, माजी नगरसेवक

प्रकाश राऊत- जनरल सेक्रेटरी मुंबई काॅग्रेस 

सुशिल व्यास , मारवाडी संमेलन अध्यक्ष 

पुनम कनोजिया 

संजय शहा, डायमंड मर्चंट, जैन सेवा संघ- अध्यक्ष 

दिलीप साकेरिया - मुंबई काॅग्रेस राजस्थानी सेल- अध्यक्ष 

हेमंत बावधनकर- निवृत्त पोलिस अधिकारी 

राजाराम देशमुख, सचिव- मुंबई काॅग्रेस - विश्वस्त सिद्धीविनायक मंदीर

त्रिंबक तिवारी- सेक्रेटरी, मुंबई काॅग्रेस कमिटी 

कांती मेहता- ऑल इंडीया जैन फेडरेशन अध्यक्ष

८५ वर्षीय काॅग्रेसचे कार्यकर्ते जवाहरभाई मोतीचंद यांचा शिंदे गटात प्रवेश

16:00 PM (IST)  •  14 Jan 2024

Milind Deora : आज काँग्रेससोबत नातं तोडतोय - मिलिंद देवरा 

मी काँग्रेस सोडेन असं कधीच वाटलं नव्हतं. पण आज माझ्या कुटुंबाचं काँग्रेससोबतचं 55 वर्षांचं नातं मी तोडतोय

15:59 PM (IST)  •  14 Jan 2024

Milind Deora : काँग्रेससोबतचं नातं का तोडलं, मलिंद देवरा यांचे स्पष्टीकरण 

मी काँग्रेससोबतचं नातं का तोडलं?

- मी पक्षाच्या आव्हानात्मक काळात काँग्रेससोबत 

- माझ्या वडिलांच्या काळातील काँग्रेस आणि आजची  काँग्रेस  यात खूप फरक झाला. 

जर काँग्रेस आणि उबाठा यांनी सकारात्मक, मेरीट आधारित राजकारण केलं असतं तर एकनाथ शिंदे आणि मला आज इथे येऊन बसावं लागलं नसतं

15:36 PM (IST)  •  14 Jan 2024

Milind Deora : मिलिंद देवरा यांचा शिंदे गटात जाहीर पक्षप्रवेश

Milind Deora : मिलिंद देवरा यांचा शिंदे गटात जाहीर पक्षप्रवेश

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kankavli Vidhan Sabha : निवडणूक निकालांसाठी प्रशासनाची जय्यत तयारी, कडेकोट सुरक्षा तैनातNashik Vidhan Sabha : दादासाहेब गायकवाड सभागृहात स्ट्राँग  रूमची उभारणी,प्रशासकीय यंत्रणा सज्जBachchu Kadu On MVA Mahavikas Aghadi :युती आघाडीकडून फोन आले, बच्चू कडूंची माहितीVinod Tawade Update : माझी बदनामी करणाऱ्या नेत्यांना कायदेशीर नोटीस पाठवली - विनोद तावडे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
Embed widget