Manoj Jarange : लाडकी बहीण योजना आताच आणायची होती का? कास्ट सर्टिफिकेट निघत नाहीये; मनोज जरांगेंसमोर मराठा विद्यार्थीनीने टाहो फोडला
Manoj Jarange and Maratha Student, Antarwali Sarati : "लाडकी बहिण योजना आताच आणायची होती का? त्याच्यामुळे आम्हाला कास्ट सर्टिफिकेट निघत नाहीये. आमची खूप परवड लागली आहे, आम्हाला टाईम पण मिळत नाही, दहा दिवसात कसं सर्टिफिकेट मिळायचं, पावतीवर रजिस्ट्रेशन करायला सांगत आहेत"
Manoj Jarange and Maratha Student, Antarwali Sarati : "लाडकी बहिण योजना आताच आणायची होती का? त्याच्यामुळे आम्हाला कास्ट सर्टिफिकेट निघत नाहीये. आमची खूप परवड लागली आहे, आम्हाला टाईम पण मिळत नाही, दहा दिवसात कसं सर्टिफिकेट मिळायचं, पावतीवर रजिस्ट्रेशन करायला सांगत आहेत, आम्हाला पावती पण भेटत नाही", असं म्हणत मराठा विद्यार्थीनीने मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange ) यांच्यासमोर टाहो फोडला. अंतरवाली सराटीतील (Antarwali Sarati) आंदोलनस्थळी जात मराठा विद्यार्थीनीने खंत व्यक्त केली. आमचे आई- पप्पा एक लाख फीस देऊ शकत नाही आणि मार्क्स मिळवले ,शिक्षणासाठी सरकारने असा निर्णय का घेतला? मला दहा टक्के आरक्षण आहे तर आम्हाला लागूच करू देत नाहीत,असंही विद्यार्थीनीने सांगितले.
मुलींना शिक्षण मोफत केला आहे, याबद्दल तुमचे कौतुक आणि स्वागत
मनोज जरांगे म्हणाले, दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेतून मी आवाहन केले होते. त्यानंतर Ebc ,ews आणि sbec उमेदवारांकडून परीक्षा शुल्क आणि फिस घेऊ नका असे आदेश दिले आहेत, त्या बद्दल सरकारचे कौतुक करतो. परीक्षा शुल्क आणि शिक्षण शुल्क मुलींना मोफत दिल्याचे परिपत्रक काढलं आहे. मुलींना शिक्षण मोफत केला आहे, याबद्दल तुमचे कौतुक आणि स्वागत करतो. ज्यांनी परीक्षा शुल्क फीस भरलेले आहेत त्यांना ते शुल्क वापस करा, असं आवाहनही मनोज जरांगे यांनी केलं.
आम्ही त्यांना विरोधक मानलं नाही, आमचा विरोधक छगन भुजबळ आहे, असं जरांगे बारस्कर महाराज यांच्याबद्दल बोलताना म्हणाले. केसेस मागे घ्या, आम्ही जातीयवादी नाही. आम्हाला कुणबी प्रमाणपत्र देणे सुलभ करा. आईची जात लेकराला लागत नाही यांची खंत वाटते, असंही जरांगे म्हणाले.
म्ही ओबीसीतून आरक्षण मागत नाही, आम्हीच ओबीसी आहोत
पुढे बोलताना मनोज जरांगे म्हणाले, आम्ही ओबीसीला धक्का लावणार नाही. आम्ही ओबीसीतून आरक्षण मागत नाही. आम्हीच ओबीसी आहेत. कारण आमचा एक भाऊ कुणबी आहे. आमचा दुसरा भाऊ कुणबी नाही. आमची आई कुणबी आहे, आमचा बाप ओपन आहे. आमचं पोरगं कोणाचं आहे? त्याला आईची जात लावाली का बापाची ? की आंतरजातीय विवाह म्हणावं. मला कशाचा मेळ लागेना.
इतर महत्वाच्या बातम्या
मनोज जरांगे यांनी चक्क देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं, म्हणाले छगन भुजबळ...