एक्स्प्लोर

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा 17 वर्षांनंतर निकाल, हेमंत करकरेंनी केला होता प्रकरणाचा तपास; मालेगावकरांच्या 'त्या' आठवणी ताज्या

Malegaon Blast Case Verdict: मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाच्या निकालाच्या निमित्ताने एटीएस प्रमुख स्वर्गीय हेमंत करकरे यांची आठवण मालेगावकरांना झालेली आहे.

Malegaon Blast Case Verdict: 29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगाव शहरात झालेल्या भीषण बॉम्बस्फोटाला आज जवळपास 17 वर्षे पूर्ण होत आहेत. भिक्खू चौकात घडलेल्या या स्फोटात सहा निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला, तर शंभरहून अधिक लोक गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे अनेक कुटुंबांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. या प्रकरणाचा निकाल तब्बल 17 वर्षांनंतर आज (31 जुलै) मुंबईतील एनआयएच्या विशेष न्यायालयात जाहीर होणार आहे. या खटल्यात साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह सात आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी, अशी मागणी एनआयएने केली आहे. त्यामुळे आजच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. तर या निकालाच्या निमित्ताने एटीएस प्रमुख स्वर्गीय हेमंत करकरे यांची आठवण मालेगावकरांना झालेली आहे.

तत्कालीन एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांनी मालेगाव बॉम्बस्फोटाचा पूर्ण तपास केला आहे. या हल्ल्यानंतर मालेगावकर जनतेने महानगरपालिकेकडे भिकू चौकातील रस्त्याला हेमंत करकरे मार्ग असे नाव देण्याची मागणी केली होती. आणि त्यानुसार या ठिकाणी हेमंत करकरे मार्ग स्थापन करण्यात आलेला होता. या निकालाच्या निमित्ताने एटीएस प्रमुख स्वर्गीय हेमंत करकरे यांची आठवण मालेगावकरांना झालेली आहे. 

मालेगावमध्ये पोलीस अलर्ट मोडवर

दरम्यान, मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा आज 17 वर्षानंतर एनआयएच्या विशेष न्यायालयात निकाल लागणार आहे. या पार्श्वभूमीवर मालेगाव येथील पोलिस यंत्रणा ॲलर्ट मोडवर आली असून शहरातील भिक्खू चौकासह मुख्य चौका चौकात पोलिस अधिकारी, कर्मचारी, दंगा नियंत्रण पथक आदी मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे. बॉम्बस्फोटाचा निकाल जो येईल तो निकाल स्वीकारून मालेगावकर जनतेने शांतता अबाधित ठेवावी, असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांनी मालेगावकर जनतेला केले आहे. 

मालेगाव स्फोटप्रकरणी आतापर्यंत काय काय घडलं?

- २९ सप्टेंबर २००८ साली रमजान महिन्यात झालेल्या स्फोटात सहा जणांचा मृत्यू तर शंभरहून अधिक जखमी 

- मशिदी जवळ ठेवण्यात आलेल्या दुचाकीचा झाला होता स्फोट 

- भाजप नेत्या साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित तसेच मेजर रमेश उपाध्याय, सुधाकर द्विवेदी, समीर कुलकर्णी, अजय राहिरकर आणि सुधाकर चतुर्वेदी यांच्यावर आहेत आरोप 

- १९ एप्रिल ला सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालयाने ठेवला होता निर्णय राखून

- आरोपींना योग्य ती शिक्षा देण्याची एनआयएची मागणी

- मालेगावात स्फोट घडवून मुस्लिम समाजात भीतीचं वातावरण पसरवून सांप्रदायिक तणाव निर्माण करण्याच कारस्थान असल्याचं एनआयए आहे

- संपूर्ण गटात आरोपींचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचा पुराव्यानिशी स्पष्ट होत असल्याचं एनआयए म्हणणं आहे

- मालेगाव स्फोटांचा सुरुवातीचा तपास हा दहशतवाद विरोधी पथक एटीएस ने केला होता तर 2011 साली  तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे हस्तांतरित करण्यात आला 

- सात आरोपींवर आरोप निश्चिती केल्यानंतर 2018 मध्ये प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात झाली

- आरोपींवर युएपीए कायद्याच्या दहशतवादी कृत्य करणे आणि दहशतवादी कृत्य करण्याचा कट रचणे तसेच भारतीय दंड संहितेच्या हत्या, हत्येचा प्रयत्न तसेच धार्मिक तेढ निर्माण केल्याचा आरोप आहे

- सुनावणी दरम्यान सरकारी पक्षाने 323 साक्षीदार तपासले असून त्यातील 37 साक्षीदार फितूर झाले 

- ज्या दुचाकीत स्फोटक ठेवण्यात आली होती ती साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूरची असल्याचा एटीएसचा दावा होता

- २३ ऑक्टोबर २००८ मध्ये साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर अटक करण्यात आली

- त्यानंतर सुरू झालेल्या अटक सत्रात १४ नोव्हेंबर पर्यंत एकूण ११ जणांना अटक करण्यात आली

- एटीएसने या प्रकरणी मोक्का लावला होता मात्र नंतर मोक्का मागे घेण्यात आला

- जानेवारी २००८ मध्ये कट रचण्यात आला असून आरोपींनी फरीदाबाद भोपाळ नाशिक येथे मीटिंग केलाच एटीएसचा दावा होता

- स्फोटांमध्येव RDX चा वापर करण्यात आला होता 

- जम्मू आणि काश्मीर मधील पोस्टिंग दरम्यान आरडीएक्स मिळवल्याचा आणि त्यानंतर सुधाकर चतुर्वेदीच्या घरी बॉम्ब बनवण्यात आल्याचा एटीएसचा आरोप

- चतुर्वेदी आणि रामचंद्र कालासंग्रा यांनी बॉम्ब दुचाकीवर बसून त्यानंतर ती दुचाकी गजबजलेल्या ठिकाणी पार करण्यात आले

- रामचंद्र कलासंग्रा आणि संदीप डांगे अद्याप फरार 

- प्रज्ञा सिंग ठाकूर यांच्या नावावर असलेली मोटरसायकल कलासांग्राच्या ताब्यात होती: NIA 

- मला हा प्रकरणात गोवण्यात आल्याचा साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांचा दावा आहे आपल्या विरोधात पुरावे नसल्याचा कर्नल प्रसाद पुरोहित यांचा दावा आहे

- मोक्का हटवल्यानंतर मोक्का अंतर्गत घेतलेले जबाबांची किंमत जवळ जवळ शून्य

- एटीएसच्या तपासात दोष असल्याचा दावा करत एनआयएने नव्याने काही जबाब नोंदवले होते त्यावेळी देखील काही साक्षीदारांनी आपली साक्ष बदलली 

- प्रथमदर्शनी साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर विरोधात पुरावे नसल्याचे सांगत तिला आरोपींची यादीतून वगळण्याची होती NNIA ची मागणी

- मात्र पुरेसे पुरावे असल्याचे स्पष्ट करत येण्याची मागणी विशेष एनआयए कोर्टाने फेटाळली होती

आणखी वाचा 

Sanjay Raut on Trump Tariff : मोदींच्या जिवश्य, कंठश्य मित्राकडून भारताला दंडीत करण्याचं काम, संजय राऊतांचा घणाघात; म्हणाले, या सरकारला फाXXX मारून ट्रम्पने...

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune NCP : अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
Nashik Municipal Election 2026 : नाशिक महानगरपालिका: प्रभाग निहाय पक्षीय उमेदवारांची 'अशी' होणार लढत, उमेदवारांची यादी एका क्लिकवर
नाशिक महानगरपालिका: प्रभाग निहाय पक्षीय उमेदवारांची 'अशी' होणार लढत, उमेदवारांची यादी एका क्लिकवर
Tanaji Sawant : तुळजाभवानीच्या भक्तांना आता प्रसाद म्हणून ड्रग्जची पुडी दिली जाईल; तानाजी सावंत यांचा भाजपवर घणाघात
तुळजाभवानीच्या भक्तांना आता प्रसाद म्हणून ड्रग्जची पुडी दिली जाईल; तानाजी सावंत यांचा भाजपवर घणाघात
Gold Silver Price : ट्रम्प यांच्या एका कृतीनं चांदीच्या दरात 8000 रुपयांची वाढ, सोनं किती महागलं? जाणून घ्या 
ट्रम्प यांच्या एका निर्णयानं गुंतवणूकदारांची स्टॉक्स क्रिप्टोकडे पाठ, सोने चांदीचे दर किती वाढले?

व्हिडीओ

Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Gulabrao Patil Jalgaon : मला सर्वांसोबत आय लव यू करावं लागतं गुलाबराव पाटलांची तुफान फटकेबाजी
Meghana Bordikar Parbhani : परभणीत भाजपचाच महापौर होणार! मेघना बोर्डीकरांनी व्यक्त केला विश्वास
Asaduddin Owaisi Amravati Speech: मुलं जन्माला घालण्याच्या विधानावरुन ओवैसींचा राणा,भागवतांवर निशाणा
ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune NCP : अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
Nashik Municipal Election 2026 : नाशिक महानगरपालिका: प्रभाग निहाय पक्षीय उमेदवारांची 'अशी' होणार लढत, उमेदवारांची यादी एका क्लिकवर
नाशिक महानगरपालिका: प्रभाग निहाय पक्षीय उमेदवारांची 'अशी' होणार लढत, उमेदवारांची यादी एका क्लिकवर
Tanaji Sawant : तुळजाभवानीच्या भक्तांना आता प्रसाद म्हणून ड्रग्जची पुडी दिली जाईल; तानाजी सावंत यांचा भाजपवर घणाघात
तुळजाभवानीच्या भक्तांना आता प्रसाद म्हणून ड्रग्जची पुडी दिली जाईल; तानाजी सावंत यांचा भाजपवर घणाघात
Gold Silver Price : ट्रम्प यांच्या एका कृतीनं चांदीच्या दरात 8000 रुपयांची वाढ, सोनं किती महागलं? जाणून घ्या 
ट्रम्प यांच्या एका निर्णयानं गुंतवणूकदारांची स्टॉक्स क्रिप्टोकडे पाठ, सोने चांदीचे दर किती वाढले?
Zomato Deepinder Goyal brain device: झोमॅटोच्या मालकाने डोक्यावर हायफाय टेक्नॉलॉजी असलेलं डिव्हाईस लावलं, नेमकं काय काम करतं?
झोमॅटोच्या मालकाने डोक्यावर हायफाय टेक्नॉलॉजी असलेलं डिव्हाईस लावलं, नेमकं काय काम करतं?
'बिनविरोध' संकल्पना लोकप्रतिनिधी कायद्यात नाही; मनसेची हायकोर्टात याचिका, असीम सरोदेंनी दिली माहिती
'बिनविरोध' संकल्पना लोकप्रतिनिधी कायद्यात नाही; मनसेची हायकोर्टात याचिका, असीम सरोदेंनी दिली माहिती
Share Market : शेअर बाजारातील तेजीला ब्रेक, नववर्षात पहिल्यांदाच सेन्सेक्स अन् निफ्टीत घसरण, ट्रम्प कनेक्शन समोर
शेअर बाजारातील तेजीला ब्रेक, नववर्षात पहिल्यांदाच सेन्सेक्स अन् निफ्टीत घसरण, ट्रम्प कनेक्शन समोर
महंत उपोषणाला बसण्याची कुणकुण; पोलीस बंदोबस्तात, तिसगावात अवैध कत्तलखाने भुईसपाट
महंत उपोषणाला बसण्याची कुणकुण; पोलीस बंदोबस्तात, तिसगावात अवैध कत्तलखाने भुईसपाट
Embed widget