मालेगाव स्फोट प्रकरणातून निर्दोष सुटका; प्रज्ञा सिंह ठाकूरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, मला आतंकवादी...
Malegaon blast case: 29 सप्टेंबर 2008 मध्ये झालेल्या भीषण बॉम्बस्फोट प्रकरणी न्यायालयाने आज निकाल सुनावला .

Malegaon blast case Sadhvi pradnya: मालेगाव स्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे . केवळ संशयाच्या आधारावर आरोपींना दोषी ठरवलं जाऊ शकत नाही त्यामुळे सर्व आरोपींची निर्दोष सुटका करण्यात येत आहे असं एनआयएच्या विशेष न्यायालयाने सांगितलं . 29 सप्टेंबर 2008 साली मालेगावमध्ये झालेल्या भीषण बॉम्बस्फोट प्रकरणात 6 निरपराध नागरिकांचे प्राण गेले तर शंभरहून अधिक जण गंभीर जखमी झाले होते .या निकालानंतर निर्दोष सुटलेल्या साध्वी प्रज्ञा यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे . तेरा दिवस मला टॉर्चर करण्यात आलं .माझा आयुष्य उध्वस्त केलं . मी सतरा वर्ष अपमानित झाले .मला स्वतःच्याच देशात आतंकवादी ठरवण्यात आलं .संन्यासी आहे म्हणून मी जिवंत आहे अशी प्रतिक्रिया साध्वी प्रज्ञा यांनी दिली .
काय म्हणाल्या साध्वी प्रज्ञा ?
मालेगाव स्पोर्ट प्रकरणी आज न्यायालयाने अंतिम निकाल दिला .यामध्ये सर्व आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली . निर्दोष सुटकेनंतर साध्वी प्रज्ञा म्हणाल्या, 'जेव्हा पहिल्यांदा चौकशीला बोलावलं होतं तेव्हा मी माणुसकीच्या नाते न्यायचा सन्मान करून मी आले होते . 13 दिवस मला टॉर्चर करण्यात आलं माझं आयुष उध्वस्त केलं .मी 17 वर्ष अपमानित झाले .मला आतंकवादी बनवलं स्वतःच्याच देशात ..ज्यांनी मला हे दिवस आणले त्याबद्दल मी काही बोलू शकत नाही .संन्यासी आहे म्हणून मी जिवंत आहे . आरोपीच्या पिंजऱ्यात साध्वी प्रज्ञा भावूक झाल्या .
हिंदुत्वाला आतंकवादाचा नाव देणाऱ्यांना ..
संन्यासी संतदेखील सतत मरते आहे . यांनी देवाला कलंकित केलं . निर्णयानंतर साध्वी प्रज्ञांनी न्यायाधीशांचे आभार मानले .मला ऐकल्याबद्दल मला समजून घेतल्याबद्दल आभार . भगव्याला आंतकवादी म्हटलं . भगव्याचा विजय झाला . हिंदुत्वाचा विजय झाला .ज्यांनी हिंदुत्वाला आतंकवादाच नाव दिलं त्यांना कधी माफ केलं जाणार नाही. असेही साध्वी प्रज्ञासिंह यांनी म्हटलं .
कोणा कोणाला आरोपी ठरवले होते–
1. प्रसाद पुरोहित
2. साध्वी प्रज्ञासिंह
3. समीर कुलकर्णी
4. रमेश उपाध्याय
5. अजय राहिरकर
6. सुधाकर द्विवेदी
7. सुधाकर चतुर्वेदी
8. रामजी कालसंग्रा – फरार
9. शामजी साहू – फरार
10. संदीप डांगे – फरार
11. प्रविण तकलकी – फरार
12. राकेश धावडे - फरार























