Manoj Jarange Patil Mumbai Morcha : मनोज जरांगे आझाद मैदानावर उपोषणाला बसताच दोन आमदार भेटीसाठी पोहोचले, तिघांमध्ये खलबतं, नेमकं काय घडलं?
Manoj Jarange Patil Mumbai Morcha : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषणास सुरुवात केली आहे.

Manoj Jarange Patil Mumbai Morcha : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj jarange Patil) यांच्या नेतृत्वाखाली हजारो समाजबांधवांचा महामोर्चा 27 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता अंतरवाली सराटीतून मुंबईकडे (Mumbai Morcha) रवाना झाला होता. आज, 29 ऑगस्ट रोजी सकाळी मनोज जरांगे यांच्यासह हजारो मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत. मनोज जरांगे यांच्या उपोषणाला विरोधी पक्षासह सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून पाठिंबा दिला जात आहे. त्यातच मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर उपोषणाला सुरुवात करताच दोन आमदार त्यांच्या भेटीसाठी दाखल झालेत.
प्रकाश सोळंके, संदीप क्षीरसागरांनी घेतली जरांगेंची भेट
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी मनोज जरांगे पाटील यांची आझाद मैदानावर भेट घेतली. तिघांमध्ये काही काळ चर्चा देखील करण्यात आली. संदीप क्षीरसागर यांनी सुरुवातीपासूनच मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला असून, अलीकडेच त्यांनीही “चलो मुंबई” असा नारा दिला होता. तर मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई आंदोलनाची घोषणा केल्यानंतर प्रकाश सोळंके यांनी या आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी होणार असल्याचे जाहीर केले होते. याच पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली.
काय म्हणाले संदीप क्षीरसागर, प्रकाश सोळंके?
मनोज जरांगे यांच्या भेटीनंतर संदीप क्षीरसागर माध्यमांशी बोलताना म्हणाले की, मला पण मान्य आहे. ते जे करतायेत ते योग्य करतायेत. माझा त्यांना जाहीर पाठिंबा आहे. विरोधीपक्षाचा आमदार म्हणून आम्ही निवेदन देणार आहोत. मनोजदादा जे आवाहन करतील आम्ही तसे करू. विरोधी पक्षाचे आमदार असलो तरीही आम्ही पत्र देऊ. मनोजदादा ओबीसींवर अन्याय झाला तरीही रस्त्यावर उतरतात. महादेव मुंडे यांच्यासाठी सुध्दा ते मैदानात उतरले होते. मनोजदादांच्या भूमिकेला जाहीर पाठिंबा आहे. ज्या गोष्टी राहिल्या त्यासाठी ते आंदोलनाला बसलेत आता पुढे काय होते ते बघू. लोकशाहीत प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे, मी त्यांच्यासोबत आहे, असी त्यांनी म्हटले आहे. तर प्रकाश सोळंके यांनी सरकारने ठाम भूमिका घेण्याची वेळ आली आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
जरांगेंच्या उपोषणाला कोणत्या राजकीय नेत्यांचा पाठिंबा
शिवसेना उद्धव ठाकरे गट
1 ओमराजे निंबाळकर – खासदार, धाराशिव लोकसभा
2 कैलास पाटील – आमदार, धाराशिव-कळंब विधानसभा
3 संजय ऊर्फ बंडू जाधव – खासदार, परभणी लोकसभा
राष्ट्रवादी अजित पवार गट
1) विजयसिंह पंडित – आमदार, गेवराई विधानसभा
2) प्रकाश सोळंके – आमदार, माजलगाव विधानसभा
3) राजेश विटेकर - आमदार पाथरी विधानसभा
4) राजू नवघरे - आमदार- वसमत विधानसभा
शेतकरी कामगार पक्ष
1 डॉक्टर बाबासाहेब देशमुख, आमदार सांगोला विधानसभा
राष्ट्रवादी शरद पवार गट
1 उत्तमराव जानकर, आमदार माळशिरस विधानसभा
2 नारायण आबा पाटील, आमदार करमाळा विधानसभा
3 बजरंग सोनवणे खासदार, बीड लोकसभा
4 संदीप क्षीरसागर आमदार, बीड विधानसभा
मनोज जरांगे पाटील यांच्या नेमक्या मागण्या कोणत्या? (What are the exact demands of Manoj Jarange Patil?)
1. मराठा कुणबी एक आहेत. याची अंमलबजावणी झाली पाहिजे, त्याशिवाय मुंबई सोडणार नाही, असं मनोज जरांगे म्हणाले.
2. हैदराबाद गझेटियर लागू करा...13 महिन्यापासून त्यांचा अभ्यासच सुरू आहे, असं मनोज जरांगेंनी सांगितले. आम्हाला सातारा, बाँबे गॅझेटियर लागू करावे, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली.
3. सगे सोयरेचा अध्यादेश काढून दीड वर्ष झाले, तरी मराठा संयमी आहे. त्याची व्याख्या दिली आहे. ज्याची कुणबी नोंद सापडली आहे त्याचे सगे सोयरे घ्या...सगे सोयरे पोट जात म्हणून घ्या, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली आहे.
4. सरसकट गुन्हे मागे घेणार होते. आमच्यावरच मार खाऊन केसेस झाल्या...अजून केसेस मागे घेतल्या नाहीत. मराठा बांधवांनी आरक्षणासाठी बलिदान दिले आहेत. त्यांचे कुटुंब उघड्यावर आहे, असं मनोज जरांगे म्हणाले.
5. आमचं कायद्यात बसणारे आरक्षण द्या..., अशी मागणी मनोज जरांगेंनी केली.
आणखी वाचा
























