Manoj Jarange Patil Maratha Mumbai Morcha LIVE: आंदोलनाला एक दिवसांची मुदतवाढ, मनोज जरांगेंची 7 वाजता पत्रकार परिषद
Manoj Jarange Patil Maratha Mumbai Morcha LIVE: मनोज जरांगे पाटील हे सकाळी दहाच्या ठोक्याला मुंबईतील आझाद मैदानात दाखल झाले. मनोज जरांगेंनी मराठा आरक्षण आंदोलनाची हाक दिली आहे.
LIVE

Background
Manoj Jarange Patil Maratha Mumbai Morcha LIVE : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे सकाळी दहाच्या ठोक्याला मुंबईतील आझाद मैदानात दाखल झाले. मनोज जरांगेंनी मराठा आरक्षण आंदोलनाची हाक दिली आहे. मुंबईतील आझाद मैदानात पोहोचताच, जरांगेंनी आंदोलकांना शांततेत आंदोलन करण्याचं आवाहन केलं. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा एकदा मुंबईची वाट धरली आहे. जरांगेंसह मराठा कार्यकर्ते मोठ्या संख्येने मुंबईत पोहोचले आहे. या आंदोलनासाठी आझाद मैदानात जय्यत तयारी करण्यात आलीय. मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. तर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीतही बदल करण्यात आले आहेत.
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला 1 दिवसांची मुदतवाढ, मुंबई पोलिसांचा निर्णय
जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या परवानगीबाबत मुंबई पोलिस दलातील वरिष्ठ पातळीवरील अधिकारी निर्णय घेतला. आज आंदोलकांकडून करण्यात आलेल्या वाहतूक कोंडीबाबत काही नियम व अटींच्या पार्श्वभूमीवर उद्याची परवानगी दिली गेली. उद्याच्या आंदोलनासाठी परवानगी मिळावी यासाठी आझाद मैदान पोलिसांकडे अर्ज करण्यात आला आहे. परवानगीबाबत पोलिस दलातील वरिष्ठ पातळीवर निर्णय घेण्यात आला.
मनोज जरांगेंची 7 वाजता पत्रकार परिषद
मनोज जरांगे पाटील 7 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत, आझाद मैदानात सुरू असलेल्या आंदोलनाची दिशा स्पष्ट करणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आव्हानाला ही मनोज जरांग पाटील उत्तर देणार आहेत.
























